मेन्स फॅशन,हेअरस्टाईल्स,दाढी,लेटेस्ट ट्रेंड्स!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 August, 2017 - 03:17

मायबोलीवर स्त्रीया बरेचदा फॅशन ,कपडे,हेअरस्टाईल यावर धागे काढुन चर्चा करताना दिसतात.आवडते कपडे कुठे मिळतात,ऑनलाईन कोणत्या वेबसाईट चांगल्या आहेत यावर चर्चा होताना दिसते.बर्याच चांगल्या चर्चा असतात या.
पण मायबोलीवर पुरुषांसाठी असा कुठलाही धागा नाही.तसा विभाग नाही.नुकताच मी स्वतः चा मेकोव्हर केला,लांब केस कापून स्लीक्ड बॅक अंडरकट हेअरस्टाईल ठेवली. लेटेस्ट फॅशन ट्रेंड चाळताना मायबोलीवर फार काही मिळालं नाही ,म्हणून हा प्रपंच.
इथे हेअरस्टाईल ,मेन्सवेअर,फूटवेअर ,लेटेस्ट मेन्स फॅशन ट्रेंडस यावर चर्चा अपेक्षीत आहे.अगदी केस गळायला लागल्यावर तुम्ही काय केलेत.पुर्ण टक्क्ल असेल तर त्यावर मॅच होणारे कपडे.लांब केस ठेवायचे असल्यास करायच्या स्टाईल्स.
दाढी अनेक पुरुष ठेवत आहेत सध्या,लाटच आली आहे .तर तुम्ही दाढी ठेवता का ,कशी ठेवता,कोणती स्टाईल हे अपेक्षीत आहे.
व्हा सुरु!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दररोज आंघोळ केल्यावर दाढी करतो, >> ट्राय केलं पाहिजे. पण आंघोळ झाल्यावर मी शेव करायला विसरुन जाईन असं वाटतं.
पुर्वी कोणीतरी शॉवर मध्ये शेव करतो लिहिलेलं आणि इब्लिसनी धुतलेलं ते आठवलं. Biggrin

>>फिटींग मॅटर करते..<<

कंबर आणि लांबी बरोबर साइझची मिळाली तर आणि काय फिटिंग पाहिजे?..

>>हो मी पण आंघोळ झाल्यावरच दाढी करतो.<<

ब्रश - चहा - टॉय्लेट - व्यायाम - दाढी - शॉवर हा वर्षानुवर्षे ठरुन गेलेला सिक्वेंस मोडला कि दिवस बेक्कार जातो... Proud

ओ दादा, इकडे सगळे लोक कंबर आणि लांबीच्या मापात बसत नाहीत ना....
34 कंबर ठीक असेल तर थाईज ना घट्ट होते,
थाईज ना नीट फिट होणारी 36 साईझ कंबरेला लूज होतो...
(* माझी कंबर 34 आणि 36 दोन्ही नाही) Happy
अजून पण लै फिटिंगस च्या गंमती असतात, आता इकडे लेडीज बायका येतात जातात म्हणून लिहीत नाही
ट्रायल रूम मध्ये पॅन्ट घालून 2 3 आसने करून कम्फर्ट लेवल पाहायची आणि मगच पॅन्ट "होते" असे डिक्लेर करायचं Happy

कंबर आणि लांबी बरोबर स्ट्रेट, लूज, स्लिम इत्यादी फिटिंगही असतात ना? ऑनलाईन हवं ते फिटिंग मिळतं, दुकानात हवी ती साईझ, फिटिंग आणि रंग मिळेल तो सुदिन असं होतं.
मी जिन्स शिवाय ट्राउझर वापरत्च नाही त्यामुळे कुठेही घ्या काही फरक पडत नाही.

अर्थात वेगवेगळ्या ब्रॅन्डची फिटिंग वेगवेगळी असतात. मी पण ऑनलाईन अजून कधी घेतली नाहिये.

>>34 कंबर ठीक असेल तर थाईज ना घट्ट होते, थाईज ना नीट फिट होणारी 36 साईझ कंबरेला लूज होतो...<<

लुझ फिट, रेग्युलर फिट, स्लिम फिट हा प्रकार अस्तो कि नाहि?

ते सगळे वेअरीअशन्स धरून हो....
अमुक ब्रँड ची स्लिम फिट किती स्लिम आहे हे अंगात घातल्याशिवाय कसे कळेल?
एखाद्या ब्रँडची स्लिम फिट 36 लागते, पण रेग्युलर फिट 34 लागते...
प्रत्येक ब्रँड, आणि स्टाईल नुसार माप लक्षात ठेवुन , (assuming 2 खरेद्या मध्ये स्वतःचे आणि ब्रँडची मापे बदलली नाहीयेत,) ऑनलाइन खरेदी जमत नाही बाबा

>>एका लिवाईजच्या ५११ मध्ये पण वेगवेगळ्या कापडात वेगवेगळे फिटींग येते <<

जीन्स सोडा इवन ड्रेस स्लॅक्स सुद्धा लुझ, रेग्युलर, स्लिम (बिग अँड टॉल सोडुन) कॅटेगोरीज मध्ये मिळतात...

राज ५११ ही लिवाईज ची स्लिम फिट जीन्स आहे. म्हणजे म्हणतात की ही एक स्टाईल आहे पण त्यात पण फिटींग मध्ये फरक पडतो.

अग्रीड. मी ते वरचं वाक्य जीन्स बरोबर इतर पँट्स मध्ये हि वेगळे फिटिंग्ज ऑप्शन्स असतात हे सांगायला कोट केलं होतं... Happy

सिम्बा ते फीटींगबाबत २-३ आसने घातल्याशिवाय समजत नाही यावर सहमत.. उठबस व्यवस्थित झाली पहिजे .. मी तर ट्रायल रूमच्या बाहेर चकरा मारतो, पुढची शॉपिंग ती पँट चढवूनच करतो. माझ्यामते पँट घातल्यावर पँट घातलीच नाहीये अशी फिलींग येईल ती सर्वात बेस्ट फिटिंग..

घातल्यावर पँट घातलीच नाहीये अशी फिलींग येईल ती सर्वात बेस्ट फिटिंग.. >> हे आपलं त्या ह्याला लागू होतं. Wink पँटला पण लागू होतं का ? Biggrin

हो होतं .. माझ्या काही फेवरेट पँटस आहेत, ज्या मी वर्षानुवर्षे वापरत आहेत.. अगदीच बाहेर घालण्याच्या लायकीच्या नाही उरल्या तरी घरी वा खाली भाजी आणायला जाताना वापरतो. त्यांच्यावर माझा जीव असण्याचे कारण हेच. कमालीची फिटींग आहे, जणू माझ्या शरीराच्या प्रत्येक आकाराउकारानुसारच बनवली आहे.. आणि अशी पॅंट मिळायला नशीब लागते.. जसे ते ईंडियन आयडॉल ऑडीशनमध्येच अनू मलिक एखाद्याला बोलतो ना, की तुझ्यात टॉप तीन मध्ये पोहोचायचे पोटेंशिअल आहे. तसे काही पँटबाबत ट्रायलरूममध्येच मला समजले की या आपल्या फेव्हरेट पँटस होणार.. फार क्वचित असे होते की नवीन पँट घातल्याचा अनकम्फर्टनेस जाणवतच नाही Happy

आणि हो. हेच स्पोर्टस शूजनाही लागू... म्हणून वर्षानुवर्षे काही शूज मळले तरी आपण घालतच असतो.

माझ्यामते पँट घातल्यावर पँट घातलीच नाहीये अशी फिलींग येईल >> चेक करत जा रे घरातून बाहेर पडताना रोज घातली आहे का नाहि पँट ते Wink

जीन्स सोडा इवन ड्रेस स्लॅक्स सुद्धा लुझ, रेग्युलर, स्लिम (बिग अँड टॉल सोडुन) कॅटेगोरीज मध्ये मिळतात... > >राज +१. एकदा एखाद्या ब्रेंड चा फिट नि साईझ लक्षात आली कि online घेतल्यावर अजून तरी problem आलेला आठवत नाही. हेच च्यामारी fab india, खादी ग्राहोद्योग, cotton world वगैरे बाबत केलेले तर अंगाशी आले. उदा. असा हस्ते परहस्त खरेदी करून आणलेला फॅब चा पायजमा घातल्यावर कु. ऋ. च्या नसलेल्या पँटसारखे झाले. फरक एव्हढाच कि पायजमा खरच उतरून गेला. नशीब closet मधेच होतो Lol

ब्रश - चहा - टॉय्लेट - व्यायाम - दाढी - शॉवर हा वर्षानुवर्षे ठरुन गेलेला सिक्वेंस मोडला कि दिवस बेक्कार जातो... >> माझ्या वडिलाना ही सवय होती, सुतकाचे दिवस सोडले तर ते कधिही दाढी न करता राह्त नसत, अमावस्या श्रावण सुद्धा कधी त्यानी पाळले नाही, माझ्याकडे येताना हॉल्ट मधे शेव्ह करायचा त्याचा प्लॅन होता, पण विमानात शार्प गोष्टी अलाउड नाहित म्हटल्यावर त्याचा प्र्चन्ड हिरमोड झाला होता... त्याना मी braun इलेक्टिक शेवर घेवुन दिला होता, बाय्काना भारी पैठणि किवा दागिना मिळाल्यावर जितका आनद होइल तस त्यान्च झाल होत.
सॉरी ! विषयान्तर झाले असेल तर...

अमुक ब्रँड ची स्लिम फिट किती स्लिम आहे हे अंगात घातल्याशिवाय कसे कळेल?

हे अगदी बरोबर आहे. मला शर्ट ४२, ४४ किंवा ४४ स्लिम फिट लागतात. घालून बघितल्याशिवाय कळत नाही. पूर्वी सध्यापेक्षा बारीक होतो तेव्हा फक्त ४२ वापरायचो. बहिणीला तोच नंबर आठवतो माझ्यासाठी शर्ट घेताना. बहुतेक ४२ च्या स्लीव्ज तोकड्या होतात. मग ते फॉर्मल शर्टपण बाह्या दुमडून कोपरापर्यंत आणून वापरतो.

रच्याकने २ पँटी ईस्त्रीला दिल्या आहेत असं आमच्याकडे सर्रास म्हणायचे. Proud लग्न झाल्यावर बायकोने टोचून टोचून ट्राउजर बोलायला शिकवलं Happy

रोज रोज दाढी करायचा जाम कंटाळा येतो. शेवर+ट्रीमर घ्यायचा विचार आहे पण नेमका कुठला घ्यावा हे कळत नसल्याने घेतला नाहीये.
काही सजेशन्स?

माझा भाऊ खुप स्टायलिश अन फॅशन बाबत जागरुक का काय ते आहे.

अख्खा दिवस फिरुन एखादा कपडा वा वस्तु घेतला तरी आम्ही आमचे नशिब समजतो
सगळं कसे एक्दम ब्रान्डेड लागते म्हणुन मला तरी हे पटत नाही की मेन्स फॅशन बाबत ऊदासिन असतात

ऑनलाईन शुज खरचं ट्राय करा चांगले मिळतात अन नही जमले तर रिटर्न करता येतात

रोज रोज दाढी करायचा जाम कंटाळा येतो. शेवर+ट्रीमर घ्यायचा विचार आहे पण नेमका कुठला घ्यावा हे कळत नसल्याने घेतला नाहीये.
काही सजेशन्स?
Submitted by नानाकळा on 4 August, 2017 - 23:54>>>>>>>
नोवा नावाची एक बोगस कंपनि आहे त्यांचे ट्रीमर घेऊ नका.फिलिप्सचे १०००च्या पुढे आहेत ,फ्लिपकार्टच्या ॲपवर रिव्हू असतात ते वाचावे असे सूचवतो.
टीप- ट्रीमरने ०.४ mm इतकीच दाढी खरडली जाते ,घासून होत नाही.पांढरी दाढी.असेल तर चेहर्यावर पीठ सांडल्याचा लुक येतो.

फ्लिपकार्टच्या ॲपवर रिव्हू असतात ते वाचावे असे सूचवतो.

>>> फ्लिपकार्टवरचेच वाचायचे असते तर इथे कशाला विचारले असते? आय अ‍ॅम नॉट फ्रॉम स्टोन एज ब्रो. Happy Wink

युजर रिव्यु वाचून ठरवणे ही एक जुनी (आउट ऑफ फॅशन नाही) प्रथा झाली आहे आता... नेटवर असलेल्यांनाच लोक नेटवरचे रिव्यू वाचा चे सल्ले देतात तेव्हा विचित्र वाटतं.... असो. डोन्ट माइन्ड!
------------------
शेवर वापरणार्‍या अनुभवी कडून सल्ला अपेक्षित आहे.

वर बर्‍याच पोस्टस मधे ऑनलाइन शॉपिंग केलं तर फिटिंगचा भरोसा नसतो या बद्दल काथ्याकुट झाला आहे. पण लोकांनो, जर तुम्ही ब्रॅन्डस वापरत असाल तर आधी शो रुममधे ट्राय करुन मग कोणता साइझ आणि कोणता पॅटर्न छान फिट होतो हे पाहु शकता ना. मग पुढे ऑन लाइन vs शो रुम कॉस्ट कंपॅरिझन करायची. बर्‍याच वेळा ऑनलाइनवर चांगले डिस्काउंट्स असतात त्यामुळे आपला साइझ व्यवस्थित माहित असेल तर ऑनलाइन घेणं बेनेफिशिअल असतं. पुरुषांच्या डेनिम्स कमीत कमी साडे चार - पाच हजारच्या असतात त्यावर १०% मिळाले तरी फायदाच की.
( हे फक्त ब्रँड्स घेत असाल तरच शक्य आहे. नॉन ब्रॅडेड असेल तर ऑनलाइन शॉपिंग रामभरोसे)

. पण लोकांनो, जर तुम्ही ब्रॅन्डस वापरत असाल तर आधी शो रुममधे ट्राय करुन मग कोणता साइझ आणि कोणता पॅटर्न छान फिट होतो हे पाहु शकता ना. मग पुढे ऑन लाइन vs शो रुम कॉस्ट कंपॅरिझन करायची.

>> हे असं लोक आजकाल करायला लागलेत ते मला नैतिकदृष्ट्या चुकीचं वाटतं. शोरुमवाल्याने भांडवल उभारुन, त्यावर व्याज भरुन, लोकांना नोकरीवर ठेवून, विज पान्यापासून, सर्व सरकारी कर भरुन कायदेशीरपणे एक शोरुम स्वतःचा धंदा सन्मानाने करता यावा म्हणून सुरु केलेले असते. त्याने उभारलेल्या व्यवस्थेचा गैरवाजवी फायदा घेणे म्हणजे एक प्रकारची चोरी आहे. सुविधांची चोरी. तिथे कपडे / वस्तू पसंत आले नाहीत तर ठिक पण तिथे जाऊन ट्राय करायची सुविधा फुकट उपभोगायची आणि दहा वीस टक्के वाचवायला (जी शोरुमच्या सुविधेचीच किंमत असते) ऑनलाइन शॉपिंग करायची हे योग्य नाही. असो. जैसी जिसकी सोच!

Pages