'नारळीपौर्णिमेला आपण पॅंगॉन्ग लेक ला रात्र काढायची' या एका गोष्टीभोवती आमचा लेह-लडाखचा दौरा आखला गेला.'
पारंपरिक टूर्सप्रमाणे नुसतं स्थलदर्शन न करता,जमलं तर एखादा ट्रेकही करावा अशी योजना ठरली. द्रास ला जाईपर्यंत परिस्थितीनुसार सोयीने हलण्याचं देखील नक्की झालं. आणि आम्ही साधारण १३ जण लेह-लडाख च्या दौऱ्यावर जायला तयार झालो.
![IMG_5745.JPEG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33968/IMG_5745.JPEG)
नमस्कार...
गेल्या वर्षीपासून ताडोबाला जायचे होते... पुढे पुढे ढकलत आता या मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात जायचेच आहे...
इथे बरेच जण आपल्या प्रवासाची वर्णने देत असतात..
त्यामुळे मला वाटतं की ईथे व्यवस्थित माहिती मिळेल. मला पर्यटनासाठी जावे वाटण्यात खुप मोठा वाटा या वर्णनाचा व प्रकाशचित्रांचा आहे.
प्रवासाची सुरवात पुण्यातुन होईल, आम्ही दोघे आणि 5 वर्षे वयाची लेक आहे. ४-५ दिवसांची सफर असावी असे वाटते. जाताना कसे जायचे, काय काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करु नये ह्या सर्व गोष्टी बाबत मार्गदर्शन व्हावे.
नमस्कार,
जी औषधे नेहमी थंड तपमानात ठेवावी लागतात अश्या औषधांकरता प्रवासात कोणती कूलर बॅग वापरावी? त्यात जास्तीत जास्त किती काळाकरता औषधे थंड राहू शकतात? आठ-दहा दिवसांच्या प्रवासाकरता जर मध्ये कुठेच फ्रिजची व्यवस्था नसेल तर कोणती कूलर बॅग वापरणे फायद्याचे आणि सोयीचे ठरेल? मी नेटवर शोधाशोध केली तर ३० तास कुलींगकरता आठ हजार रुपये वगैरे किंमतीच्या बॅगा उपलब्ध आहेत. तुम्हा कोणाला अश्या बॅगा वापरायचा अनुभव असेल तर तुमचे अनुभव जरूर मांडा.
अनेक धन्यवाद.
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
माझ्या मनाच्या प्रवासाची ही गोष्ट. खूप पूर्वीपासून मी अनिरुद्ध बापूंना ओळखत असले तरी मधल्या काळात मी त्यांना विसरून गेले होते. ताई ने बळे बळे मला तिथे पुन्हा नेलं आणि जणू विसरलेली ओळख नव्याने झाली.....
मे महिन्यात साधारण ७ दिवसांची लेह लदाख ची सफर करायची आहे. साधारण ग्रुप सहा जणांचा आहे. फक्त बायका आहोत. कोणत्याही टुर कंपनी बरोबर जावेसे वाटत नाही. खुप वर्षांनी जुन्या मैत्रिणी भेटत आहोत. धावाधाव करावीशी वाटत नाही. पण त्याच बरोबरीने वेगळा प्रदेश पहावासा वाटतो आहे. कारगील, श्रीनगर वगैरे ला जायचे नाहिये.
क्रुपया कोणास माहिती असेल तर इथे शेअर करावी
१. साधारण कार्येक्रम काय असावा?
२. कोणती स्थळे मस्ट आहेत.?
३. हॉटेल्स कोणती घ्यावीत?
४. गाईड करावा का?
५. फक्त बायकांनी जायला सेफ आहे ना?
६. एखादे कोणी बुकिंग करुन देते का ?
७. कोणी अशी प्रायव्हेटली टूर केली आहे का?
बऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.
मायबोलीवर अश्या प्रकारचा बाफ आहे का माहीत नाही.
काल टीव्ही वर जिंदगी ना मिलेगी दोबारा बघत होते. त्या सिनेमावरून या बाफची कल्पना सुचली.
प्रवास , रोड ट्रिप , सहल ही संकल्पना असलेल्या चित्रपटाबाबत ( मराठी/ हिंदी/ इंग्लिश / अन्यभाषिक असे कोणतेही चालतील ) इथे चर्चा करू..
१) जिंदगी ना मिलेगी दोबारा--
तीन मित्र त्यांच्यापैकी एकाच लग्न ठरल्यावर त्यांनी अगोदरपासून ठरवलेल्या पिकनिकसाठी निघतात . या प्रवासदरम्यान चित्रपटाची कथा उलगडत जाते.
२) हायवे-
सतत वाचन आणि जंगलातल्या भेटींमुळे पक्षीनिरीक्षणात थोडाफार तरबेज झालो आणि महाराष्ट्र वन खात्यासाठी भिमाशंकर येथे प्रथम वन्य गणनेसाठी त्यांना मदत केली. त्याच वर्षी ताडोबा येथेसुद्धा वाघांची गणना होणार होती त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही गेलो. त्या वेळी महाराष्ट्रात मेळघाट हे एकमेव व्याघ्र प्रकल्प होता आणि ताडोबाचे व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी त्याचे नाव सुचवले गेले होते. यासाठी अतिशय कसून वाघांची गणना करायची होती. यावेळी आम्ही चालत चालत ताडोबाच्या जंगलात वाघांच्या ठशांचा मागोवा घेत होतो. कित्येक किलोमीटर वणवण केल्यावरसुद्धा त्याचा काही ठावठिकाणा लागत नव्हता.