मायबोलीवर अश्या प्रकारचा बाफ आहे का माहीत नाही.
काल टीव्ही वर जिंदगी ना मिलेगी दोबारा बघत होते. त्या सिनेमावरून या बाफची कल्पना सुचली.
प्रवास , रोड ट्रिप , सहल ही संकल्पना असलेल्या चित्रपटाबाबत ( मराठी/ हिंदी/ इंग्लिश / अन्यभाषिक असे कोणतेही चालतील ) इथे चर्चा करू..
१) जिंदगी ना मिलेगी दोबारा--
तीन मित्र त्यांच्यापैकी एकाच लग्न ठरल्यावर त्यांनी अगोदरपासून ठरवलेल्या पिकनिकसाठी निघतात . या प्रवासदरम्यान चित्रपटाची कथा उलगडत जाते.
२) हायवे-
लग्न ठरलेल्या युवतीचे अपहरण खंडणीसाठी अपहरण होते. अपहरणकर्त्याबरोबर प्रवास सुरु असताना सुरुवातीच्या खडाजंगीनंतर उलगडत गेलेल्या नात्याची गोष्ट या चित्रपटात आहे.
३) इट प्रे लव्ह -
ज्युलिया रॉबर्ट्सचा सुप्रसिद्ध सिनेमा. विवाहीत असलेली ज्युलिया वैवाहिक जीवनात आलेल्या अपयशानंतर डिव्होर्स घेते आणि स्व च्या शोधात जगप्रवासाला निघते.
४) द दार्जिलिंग लिमिटेड -
वडिलांच्या मृत्यूनंतर तीन भाऊ त्यांच्यातील नात्याचा शोध घेण्यासाठी भारत यात्रा ट्रेनने करतात ती कथा चित्रपटात उलगडत जाते.
वेळेअभावी लिहिण्यात हात आखडता घेतलाय . प्रतिसादात डिटेलवार ओळख होईलच कृपया समजून घेणे .
द चेस - भुरटा चोर एका बड्या
द चेस - भुरटा चोर एका बड्या आसामीच्या लेकीचे अपहरण करतो. नंतर होणारी धमाल बघण्यासारखी आहे. ठोकळा चार्ली शीन मला या सिनेमामुळे आवडू लागला.
द बर्निंग ट्रेन - डॉक्युमेंटेशन करता नमुद केलाय (पल दो पल का साथ हमारा ही कव्वाली मात्र सुंदर आहे)
चोरी चोरी / दिल है के मानता नही
सायन्स फिक्शन्स चालणार असतील तर बरेच प्रवास सापडतील
१. अपोलो१३
२. जर्नी टू द सेंटर ऑफ अर्थ
३. फॅन्टास्टिक वॉएज ......... इ.इ.
बाँबे टू गोवा
बाँबे टू गोवा
१) हायवे - ( हिंदी ) आलिशा
१) हायवे - ( हिंदी ) आलिशा भट्ट आणि रणदीप हुडा. उलगडत गेलेले एक वेगळेच नाते.
२) द वे -स्पेनमधली एक धार्मिक यात्रा पुर्ण करायची मुलाची ईच्छा, वडील पुर्ण करतात. त्याची सुंदर कथा.
३) तिसरी कसम - राज कपूर, वहिदा रेहमान आणि अप्रतिम संगीत. एक नर्तकी आणि एक गाडीवान यांचा एकत्र प्रवास.
the Hollywood animation
the Hollywood animation movie........UP.
this was also a good movie. In this an adventurous journey of a child with old man is shown
पटकन लक्षात आलेले काही १) Mr
पटकन लक्षात आलेले काही
१) Mr and Mrs Iyer - कोंकणा सेन शर्मा न राहुल बोस
२) चेन्नई एक्स्प्रेस - शा खा न दीपिका
नवरा माझा नवसाचा.
नवरा माझा नवसाचा.
दे धक्का नवरा माझा नवसाचा
दे धक्का
नवरा माझा नवसाचा
हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.
हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.
बजरन्गी भाईजान अराउन्ड द
बजरन्गी भाईजान
अराउन्ड द वर्ल्ड इन एट डॉलर
चलते चलते ?
चलते चलते ?
हे असंच एक सर्च करतांना
हे असंच एक सर्च करतांना सापडलं... आयएमडीबीची लिंक आहे
25 Best Travel Movies Of All Time (Films That Will Inspire You To Travel)
लाईफ ऑफ पाय
लाईफ ऑफ पाय
एक मराठी चित्रपट होता.
एक मराठी चित्रपट होता. सत्यकथा होती ती. एक लहान मुलगा घरातून बाहेर पडतो. मग त्याला वाटेत एक बाई आणि ३ लहान मूले भेटतात वगैरे. छान होता तो. नाव विसरलो.
बॉम्बे टू गोवा
बॉम्बे टू गोवा
दिनेशदा, तो मुव्ही "७२ मैल -
दिनेशदा, तो मुव्ही "७२ मैल - एक प्रवास"
जब वी मेट फाइंडींग फॅनी पिकू?
जब वी मेट
फाइंडींग फॅनी
पिकू?
Finding Nemo.
Finding Nemo.
चांगली यादी होतेय. पण नुसती
चांगली यादी होतेय. पण नुसती नाव लिहिण्यापेक्षा त्या चित्रपटाबद्दल दोन ओळी खरडल्या तर जास्त चांगलं
परवा 'धनक' नावाचा नागेश
परवा 'धनक' नावाचा नागेश कुकनुरचा पिक्चर बघितला. मस्त निरागस आहे. लहान मुलांची कामं छान झाली आहेत. राजास्थानातल्या गावात काका काकूंबरोबर रहाणारे बहिण भाऊ. ९ वर्षाचा भाऊ, त्यापेक्षा थोडी मोठी बहिण. हा भाऊ काही वर्षांपासून अंधही आहे (जन्मतः नाही) . भाऊ सलमान फॅन तर बहिण शाहरुख फॅन. एकदा ती भिंतीवर शाहरुखची असंधपणा नाहिसा करण्याकरताच्या सर्जरीची अॅड पाहते आणि भावाला घेऊन त्याला भेटायला निघते. दोघे घरी न सांगता कसा प्रवास करतात ह्याची कहाणी आहे.
रामूचा रोड पाहिलेला तेव्हा
रामूचा रोड पाहिलेला तेव्हा आवडलेला. फर्स्ट हाल्फ मस्त जमलेला. बाजपेयीचे हटके अॅक्टींग आणि या विवेक अंतराचे त्यावर हडबडणे .. फक्त रोडच्या प्रवासात बांधून ठेवलेला उत्कंठावर्धक.. नंतर जरा बोर झाले.
टायटॅनिक हा सुद्धा ट्रॅव्हल मूव्हीजमध्येच आला. प्रवासात जुळणारे प्रेम. ते जास्त आवडले. ईंग्रजी भाषा कळत नसूनही. बोट फुटल्यानंतरचे थ्रिलर वगैरे ते सारे दुय्यम वाटले मग त्यापुढे. किंबहुना त्या इमोशनमुळेच त्याला अर्थ प्राप्त झाला..
बेबी'ज डे आऊट
बेबी'ज डे आऊट
येस्स्स सायो, धनक सिनेमा
येस्स्स सायो, धनक सिनेमा मलाही आवडलेला. ती दोघे लहान मुलं मस्त प्रवास करतात. एकमेकांना चिमटे घेत , सांभाळून घेत पुढे जात राहतात.. नॉर्मली चित्रपटातील मुलं गोगोड दाखवतात. या चित्रपटातली मुलं एकदम रियल वाटतात
मस्तं धागा. तनुजा आणि रणधीर
मस्तं धागा.
तनुजा आणि रणधीर कपूर चा हमराही. दोघेही एकाच नोकरीच्या इंटरव्यू साठी म्हणून प्रवास करतात.
अलीकडचा दिल धडकने दो.
मस्तच धागा, टायटल वाचून पहिला
मस्तच धागा, टायटल वाचून पहिला 'द चेस' आठवला आणि माधव यांनी तो पहिलाच लिहिलाय. टीव्हीवर बघितला होता.
एक साऊथचा मूवी पण आठवला, एकाची बायको तिच्या आईचं ऐकत असते सतत आणि त्यामुळे त्रास होऊन हिरो पळतो घरातून, हिरोईनचा नवरा तिला त्रास देत असतो म्हणून ती पळते आणि बसमध्ये भेटतात. असं वाटत होतं ह्यांचच जमावं पण शेवटी ते आपापल्या जोडीदाराकडे जातात.
ते जुने इविनिंग इन Paris, Night in London येतील का यात. खूप लहानपणी बघितलेत टीव्हीवर.
मराठी हायवे.
बुलेट ट्रेन (जपानी बहुतेक पण डबड इंग्रजी असा टीव्हीवर बघितला) सॉलिड, एकदम थरारक.
धनक बघायला घेतला आत्ताच
धनक बघायला घेतला आत्ताच
माझी ऑल टाइम फेवरीट ट्रॅव्हल
माझी ऑल टाइम फेवरीट ट्रॅव्हल मुव्ही इन टू द वाईल्ड आणि ज्या पुस्तकावरून ती बनवली आहे ते पुस्तकसुद्धा