Submitted by मोहन की मीरा on 25 December, 2016 - 13:31
मे महिन्यात साधारण ७ दिवसांची लेह लदाख ची सफर करायची आहे. साधारण ग्रुप सहा जणांचा आहे. फक्त बायका आहोत. कोणत्याही टुर कंपनी बरोबर जावेसे वाटत नाही. खुप वर्षांनी जुन्या मैत्रिणी भेटत आहोत. धावाधाव करावीशी वाटत नाही. पण त्याच बरोबरीने वेगळा प्रदेश पहावासा वाटतो आहे. कारगील, श्रीनगर वगैरे ला जायचे नाहिये.
क्रुपया कोणास माहिती असेल तर इथे शेअर करावी
१. साधारण कार्येक्रम काय असावा?
२. कोणती स्थळे मस्ट आहेत.?
३. हॉटेल्स कोणती घ्यावीत?
४. गाईड करावा का?
५. फक्त बायकांनी जायला सेफ आहे ना?
६. एखादे कोणी बुकिंग करुन देते का ?
७. कोणी अशी प्रायव्हेटली टूर केली आहे का?
मुंबई ते लेह विमानाने जाणार. तिकडे मग गाडी करुन फिरणार.
इकडे अनेकांनी अश्या ट्रीप्स केल्या आहेत. ते जरा गाईड करतील का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मोकिमी, जिप्सीने असा धागा
मोकिमी,
जिप्सीने असा धागा काढला होता, त्यावर देखील बरीच माहिती मिळेल. http://www.maayboli.com/node/34511
लडाखला जाणारे श्रीनगर, कारगिल मार्गे जातात कारण त्यामार्गाने समुद्रसपाटीपासुनची उंची हळूहळू वाढत जाते ज्यामुळे आपल्या शरीराला विरळ होत जाणाऱ्या वातावरणाशी जुळवुन घेता येते.
त्यामुळे श्वसनाचा त्रास होत नाही.
एखादे कोणी बुकिंग करुन देते
एखादे कोणी बुकिंग करुन देते का ?>>>>> केसरी,वीणा वर्ल्ड करुन देतात.एतरही करत असतील्,पण माहित नाही.
केदार ह्या आयडीची संपूर्ण
केदार ह्या आयडीची संपूर्ण प्रवास वर्णनाची लेख माला आहे. पण त्यांनी कार ने प्रवास केला होता.
इनफायनाईत हॉलिडेज - फॉलिएज
इनफायनाईत हॉलिडेज - फॉलिएज वाल्यांची ब्रॅंच आहे.. त्यांचा संपर्क करा.. व्यवस्थित अॅरेंज करुन देतील.. आम्ही जून मध्ये त्यांच्या बरोबर जाऊन आलो.. उत्तम व्यवस्था करुन देतात.
डायरेक्ट लेहला जाता येते, दिल्ली लेह विमान सेवा आहे. लेहला पोचल्यावर एक दिवस विश्रांती घेऊन पुढचा प्रवास चालू करावा लागेल
१. साधारण कार्येक्रम काय असावा? -> साधारण ८ दिवसांची टूर आहे.
२. कोणती स्थळे मस्ट आहेत.? -> नुब्रा व्हॅली, पँगाँग लेक, त्सोमोरिरी, लेह मधेच लोकल बर्याच मॉनेस्ट्रीज आहेत त्या दाखवतात. डायरेक्ट लेहला गेलात तर कारगिला पण एक दिवस जाऊन यायला लागेल.
३. हॉटेल्स कोणती घ्यावीत? -> तुमच्या बजेटनुसार हॉटेल्स आहेत.
४. गाईड करावा का? -> तुमचा ड्रायव्हर हाच तुमचा गाईड बर्याच वेळेस असतो, कुठेही स्पेसिफिक गाईडची तुमच्या मागे गर्दी नसते.
५. फक्त बायकांनी जायला सेफ आहे ना? -> हो. एकदम सेफ
६. एखादे कोणी बुकिंग करुन देते का ? -> बरेच जण देतात, मी वरती सांगितले आहेच, गो हॉलिडेज पण करतात बुकिंग
७. कोणी अशी प्रायव्हेटली टूर केली आहे का? -> मायबोलीवर तीन चार धागे आहेत, केदार जोशी, जिप्सी ह्यांनी लिहिलेले.. लेह लडाख असा शोध करा.. आरामात सापडतील लेख... विस्तृत माहिती सह आहेत. आणि त्यांना विपू केलीत की माहिती देतील.
छान माहिती.... जीप्सी ला फोन
छान माहिती....
जीप्सी ला फोन करणार आहे. तो माहिती देइलच....
हिम्कुल्स ..... +१
इशा टूर्स याच नावाची
इशा टूर्स याच नावाची ठाण्यातली टूर कंपनी आहे. तीही कस्टमाईज्ड लेह लडाख पॅकेजेस देते. त्यांच्याकडे जरूर चौकशी करा.
मे महिना म्हणजे तिथे कडाक्याची थंडी असते. तुमची तयारी आहे ना त्यासाठी?
आणि इतक्या लांब जाताय तर एक दिवस द्रासमधल्या विजय स्मारकासाठी (कारगिल) ठेवाच असा आग्रह करते.
मोकिमी devilonwheels.com हे
मोकिमी devilonwheels.com हे फॉलो करा. सगळी माहिती मिळेल.
रीतसर सहल आखून घ्या अशा सहली
रीतसर सहल आखून घ्या अशा सहली आखून देणाऱ्या कित्येक प्रवासी कंपन्या आहेत जे सगळं प्रवासाचं बुकिंग /हॉटेल बुकिंग /स्थळ दर्शन सगळं सगळं आखून देतात . केसरी / वीणा वर्ल्ड /मेक माय ट्रिप या सारख्या मोठ्या कंपन्यांव्यतिरिक्त किती तरी छोट्या कंपन्या तुम्हाला सहल आखून देऊ शकतात . केसरी ची किव्वा कुठल्याही मोठ्या कंपनीची ईटीनरी बघा आणि त्या प्रमाणे स्थळ दर्शन ठरवा
http://www.maayboli.com/node/44788 (तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..)
या धाग्यावर ट्रॅव्हल कंपन्यांच्या लिंक्स आहेत . त्या सगळ्या चांगल्याच आहेत. आजकाल खूप ट्रॅव्हल कंपन्या कस्टमाइज प्याकेज देतात .ट्रिप साठी शुभेछा
लेह वरून डिस्कीट ला जा.
लेह वरून डिस्कीट ला जा. डिस्किट वरून जिप्सी कार्स मिळतात. तुम्हाला ह्युंडेर, खलसर सॅण्ड्युन्स आणि गरम पाण्याचे झरे दाखवतील. लेहचं साइट सीईंग तिथेच उरकून घ्या. खाजगी कार ऑपरेटर्सची युनियन आहे. त्यांचे द्दर ठरलेले असतात. नेटवर नंबर मिळेल शोधाशोध केलीत तर. दिल्लीतूनही बुक करता येते टूर पण खूप फसवाफसवी आहे. त्यापेक्षा रस्त्याने जाणार असाल तर मनालीतूनही बुक करू शकता. मनाली - लेह रस्ता हा खडतर आहे पण रस्त्याने गेल्यास हवामान बदलाचे परिणाम जाणवणार नाहीत.
फक्त बायकांनी जाणे योग्य
फक्त बायकांनी जाणे योग्य नाही,गडबलाल.आमचे मित्र बाईकवर गेले होते.त्यांना जवळपास पाच हजारचा चूना लागला.तुमच्याकडे स्वतःची गाडी नाही.तुम्हाला फसवणुकीला सामोरे जावे लागेल.