‘प्रगती’चा प्रवास
Submitted by पराग१२२६३ on 14 December, 2016 - 11:04
बऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.
विषय:
शब्दखुणा: