माझ्या मनाच्या प्रवासाची ही गोष्ट. खूप पूर्वीपासून मी अनिरुद्ध बापूंना ओळखत असले तरी मधल्या काळात मी त्यांना विसरून गेले होते. ताई ने बळे बळे मला तिथे पुन्हा नेलं आणि जणू विसरलेली ओळख नव्याने झाली.....
जसजशी बापू माझ्याकडून भक्ती करून घेत गेले तसतसं मला जाणवायला लागलं की बापू सदैव माझ्या अवती भवती असतात. मी काय बोलते,काय करते, काय ऐकते, काय बघते अगदी माझ्या मनात क्षणा क्षणाला काय विचार येत असतात हेसुद्धा त्यांना सतत कळत असतं. हे पटायला त्यांनी मला असंख्य अनुभव दिले. हे जाणवल्यावर सुरुवातीला थोडसं धाकाने का होईना पण मी स्वतः मध्ये change आणायला प्रयास सुरु केले आणि गम्मत म्हणजे माझ्या प्रत्येक प्रयासाचीसुद्धा पोचपावतीसुद्धा बापूंनी तात्काळ दिली.
या प्रयासाचा एक मोठा भाग होता 'माझ्या चुका accept करणं'. मेडिकल डॉक्टर, परदेशात जॉब , घर अशा अनेक गोष्टींचा अहंकार डोक्यात होता त्यामुळे चुका improve करणं तर लांब राहिलं, माझी चूक काढून दाखवली की मी खवळत असे. पहिली पायरी होती accept करणं आणि कबूल करणं, चुकांबद्दल माफी मागणं . ज्यांच्या बरोबर चुकीचे वागलो असू त्यांची माफी मागणं आणि देवाची माफी मागणं. ज्या ज्या लोकांशी माझं कधी ना कधी बिनसलं होतं त्यांचा मी विचार केला आणि मला जाणवलं की प्रत्येक episode मध्ये माझी स्वतःची सुद्धा काहीतरी चूक होतीच. कधी कमी, कधी अधिक पण मीसुद्धा चुकत होते. मग मी चुका सुधारण्याचा विचार केला. दर वेळी चूक सुधारायला जाताना बापूंना मनात सांगायचे "हे सगळं मी तुमची लाडकी होण्यासाठी करतेय. माझ्याबरोबर चला......मला मदत करा " आणि काय सांगू दर वेळी बापू माझ्यासोबत आले.
प्रत्येक apology ने मला इतकं हलकं केलं. साईसच्चरितात म्हटलंच आहे, 'वैर, हत्या आणि ऋण' यांचं फार ओझं असतं. माझ्या बापूंनी माझ्या डोक्यावरचं एकेक ओझं हलकं केलं. माझ्या प्रत्येक प्रयास मला बापूंच्या अधिकाधिक जवळ घेऊन गेला. आणि या जवळीकी चा आनंद मी कसा वर्णन करू......निखळ निर्मल शब्दातीत..... कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसलेला pure आनंद !!!! मुंगी होऊन मी साखर खाल्ली.
अजूनही मी चुकतेच आहे. अजूनही मी शिकतेच आहे पण मी जरा चुकले, अंबज्ञता (कृतज्ञता) कमी झाली की माझी माउली डोळे वटारते मग मी पुन्हा कान धरते.
लोकं चमत्काराला नमस्कार करतात. बापूंनी माझ्यासाठी केवढा मोठा चमत्कार केला. त्यांनी माझ्या मनात बदल घडवून आणला. 'मनःसामर्थ्यदाता' ब्रीदाला माझा देव जागला. बापूरायाकडे बघताना मला कळलं की तो केवढा मोठा आहे आणि मी किती लहान आहे. मला काहीच कळत नाही हे मला कळलं.
फार काय सांगू .... ऋण ज्ञापक स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे
बुद्धीच्या मदाने उन्मत्त झालो
वितंडवादात अडकुनी गेलो
मीच तो शहाणा ऐसे समजलो
आज तव कटाक्षे अहंशून्य झालो
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो
वाव ! ! !ताई खूप छान लिहिले
वाव ! ! !ताई खूप छान लिहिले आहे.
कावेरि तुझ्या उत्सफूर्त
कावेरि तुझ्या उत्सफूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मस्त लिहीले आहे.
मस्त लिहीले आहे.