Submitted by गजानन on 19 March, 2017 - 13:59
नमस्कार,
जी औषधे नेहमी थंड तपमानात ठेवावी लागतात अश्या औषधांकरता प्रवासात कोणती कूलर बॅग वापरावी? त्यात जास्तीत जास्त किती काळाकरता औषधे थंड राहू शकतात? आठ-दहा दिवसांच्या प्रवासाकरता जर मध्ये कुठेच फ्रिजची व्यवस्था नसेल तर कोणती कूलर बॅग वापरणे फायद्याचे आणि सोयीचे ठरेल? मी नेटवर शोधाशोध केली तर ३० तास कुलींगकरता आठ हजार रुपये वगैरे किंमतीच्या बॅगा उपलब्ध आहेत. तुम्हा कोणाला अश्या बॅगा वापरायचा अनुभव असेल तर तुमचे अनुभव जरूर मांडा.
अनेक धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गजानन, जी औषधे थंड तपमानात
गजानन, जी औषधे थंड तपमानात ठेवायची आहेत, ती त्या त्या ठिकाणी मिळण्यासारखी नाहीत का. इतका काळ सलग थंड तपमान ठेवणारे साधन कुठले असणार ?
थर्मोकोल च्या बॉक्स मधे कोरडा बर्फ ठेवून थोडेफार तपमान राखता येईल, पण कोरडा बर्फही सगळीकडे मिळणे कठीण आहे. त्यापेक्षा त्या त्या ठिकाणी केमिस्ट कडून घेतलीत तर चांगले असे मला वाटते.
ही औषधे परदेशी प्रवासासाठी
ही औषधे परदेशी प्रवासासाठी न्यायची आहेत का? २००० साली माझे वडील भारतातून आले त्यांच्याकरता पुण्यातून स्थानिक केमिस्टने थर्मोकोल आणि ड्राय आईस मधून इन्शूलिन पाठवले होते ते ३६ तास व्यवस्थित टिकले. सध्या काय अलाऊड आहे आणि काय नाही त्याची कल्पना नाही पण तेंव्हापेक्षा तंत्रज्ञान पुढे गेले असावे. हा प्रश्न इन्शूलिन किंवा कॉमन औषधांचा असेल तर सहसा स्थानिक औषधालयांसाठी अवघड नसतो.
आता प्रवास कुठे, कसा यावर ते
आता प्रवास कुठे, कसा यावर ते अवलंबून आहे. भारतातल्या प्रवासात बर्फ उपलब्ध होणे मुश्किल आहे. लांबच्या प्रवासासाठी तुम्हाला पॉवर्ड कुलिन्ग बॅग शोधावी लागेल.
http://www.ebay.com.au/itm/12v-car-travel-cool-box-bag-cooler-portable-f...
यासारखी बॅग पुण्यात मिळायला हरकत नाही. त्याचा फायदा हा की गाडीतही (बस, कार) तुम्ही औषधे थंड ठेऊ शकतात. साधारण अँबियन्ट टेंपरेचर खाली १०-१२ डिग्री पर्यन्त आपण तपमान राहू शकते, त्याखाली पाहिजे असल्यास मात्र हा उपाय कुचकामी ठरेल.
>>त्यापेक्षा त्या त्या ठिकाणी केमिस्ट कडून घेतलीत तर चांगले असे मला वाटते.<< दिनेशदा भारतात खरच हे शक्य आहे का....??? या गल्लीतल्या डॉक्टर ची औषधे दुसर्या गल्लीतील केमिस्ट कडे मिळत नाही..
अजय पण बर्याचदा भारतातल्या
अजय पण बर्याचदा भारतातल्या प्रिस्किप्शन वर सिंगापुर, अमेरिकेत औषधे देत नाहीत. काही इन्सुलीन बाहेर मिळत नाहीत. मिक्सटार्ड ३०/७० सिंगापुरात बॅन आहे.
प्रतिसादांकरता सर्वांना
प्रतिसादांकरता सर्वांना मनापासून धन्यवाद.
प्रवास भारतातच करायचा आहे. पण स्थानिक दुकानांत सगळी औषधे मिळतील याची खात्री वाटत नाही. औषधे किंवा पर्यायी औषधे स्थानिक दुकानांमध्ये मिळतील असे समजून चालले तरी जेंव्हा तो पॅक पाचसहा किंवा जास्त दिवस पुरणारा असतो (उदा. इन्शुलिन) तेंव्हा तो साठवायचा प्रश्न सतावतोय.
तंत्रज्ञान पुढे गेले असावे <<< हो ना. म्हणूनच काही चांगला पर्याय आहे का याची चौकशी करावी असे वाटले.
http://www.amazon.in/dp
http://www.amazon.in/dp/B00NCZHX50/ref=pd_lpo_sbs_dp_ss_2/252-3207598-60...
हे बघा. यात आईस बॅग ठेवतात बहुदा.
चंबू. इन्शुलिन मिळू शकते पण
चंबू. इन्शुलिन मिळू शकते पण अगदी लहान गावात मिळेल का ते बघावे लागेल.
माझी आई इन्शुलिन पेन वापरते, ते ठेवायला एक खास बॅग असते. १२/१४ तासांच्या प्रवासात ( तोही सहसा एसी कोचने )
करताना काही खास काळजी घ्यावी लागत नाही.
धन्यवाद दीपस्त, दिनेश.
धन्यवाद दीपस्त, दिनेश.