काव्यलेखन

बिदेशिनी : एक स्वैर अनुवाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 January, 2025 - 18:19

२०११ सालच्या मराठी भाषा गौरवदिनानिमित 'केल्याने भाषांतर' नावाचा एक कल्पक उपक्रम घेतला गेला होता. त्यात प्रथमच मी रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांना हात लावायचं धाडस केलं होतं.
उपक्रमाच्या घोषणेसाठी एक आणि उपक्रमात 'Then finish the last song' आणि 'Your questioning eyes' या 'Gardner' या काव्यसंग्रहातल्या त्यांच्या छोटेखानी कविता निवडल्या होत्या.

बोलावते गाव फिरुनी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 January, 2025 - 00:06

पैसे चार कमवाया, या शहरात आलो मी
सांडले गाव मागे अन, गर्दीत विरलो मी
सरले निवांत जगणे , इथे कसा रमलो मी ?
घेऊनी नवा चेहरा हा,माझ्यातला हरवलो मी

गर्दीत कुणा माणसाला, पुसले कुशल कधी मी
तुसडा कटाक्ष बोलला, अनोळखी गावंढळ मी
साहून हेटाळणी अशी, नकळत बदललो मी
गंधहीन कागदी फुलात रानफुल हरवलो मी

या वाकड्या नळाच्या, पाण्याची रितच न्यारी
सारीच माणसे वाकडी, समीकरण मांडतो मी
अन् देवासही चारित्र्य दाखला मागतो मी
विक्षिप्त वागणे माझे, त्याचा गर्व करितो मी

शब्दखुणा: 

घेईन रजा

Submitted by जिओ on 18 January, 2025 - 09:02

घेईन रजा गावाला जाण्यासाठी
परतून जुन्या त्या क्षणांत रमण्यासाठी
मी गावाला जाईन खूप काळाने
भेटेन वृद्ध आजीस तिथे प्रेमाने

काढेल दृष्ट ती थरथरत्या हाताने
घेईल जवळ ती मला खूप प्रेमाने
वाढेल करून मग गरम भाकरी भाजी
देईल छानशी फळे खायला ताजी

फिरण्यास जरा जाईन नदीच्या काठी
धावेन पुन्हा मी गुरावासरां पाठी
पाहीन रांग ती पक्ष्यांची उडताना
ते सूर्यबिंब मावळतीला झुकताना

स्मरतील खुणा मग बालपणीच्या न्याऱ्या
करतील मनाला आनंदित त्या साऱ्या
जाईल मनाची निघून मरगळ सारी
लाभेल मनाला नवीन छान उभारी

शब्दखुणा: 

शुभ्र मनाचा कागद – माझा नवीन गजलसंग्रह - लवकरच

Submitted by आनंदयात्री on 14 January, 2025 - 01:57

नमस्ते! मी नचिकेत जोशी, कधीकाळी मायबोलीवर फार अॅक्टिव होतो (माझं लेखन माझ्या प्रोफाइलमध्ये सापडेल - https://www.maayboli.com/user/1899/created).
माझी गजललेखनाची सुरुवात इथेच झाली, इतर उत्तम लिहिणाऱ्यांच्या गजल वाचून, त्यावरच्या चर्चा वाचून शिकत गेलो, त्यामुळे गजल-कवितेच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर मायबोलीची आठवण येतेच.

माझा पहिला संग्रह ‘चांदणे जागेच आहे’ २०१८ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर आता दुसरा संग्रह ‘शुभ्र मनाचा कागद’ लवकरच येतोय. त्यासाठी ही पोस्ट.

काठावर अज्ञाताच्या

Submitted by अनन्त्_यात्री on 11 January, 2025 - 09:03

आदिस्फोटाने अपार
ऊर्जा-द्रव्य ओसंडले
ज्ञेय-अज्ञेय द्वैताने
भवताल पछाडले

कृष्ण ऊर्जा, कृष्ण द्रव्य,
कोडी पल्याड तर्काच्या
हुलकावण्या देतात
काठावर अज्ञाताच्या

किती गुह्ये अद्यापही
चराचरात दाटली
वाटे एक सुटले तो
नवी पुढ्यात ठाकली

अंतहीन अज्ञाताचे
प्रज्ञा करी दोन भाग
एक ज्ञेय- कष्टसाध्य
दुजा अज्ञेय- अथांग

गाव सोडले होते

Submitted by किरण कुमार on 10 January, 2025 - 02:15

बिनधास्त उभा तो वाडा हळहळणारा
वर पिंपळ थकला तेथे सळसळणारा
ते जळमट काही प्रवेशद्वारापाशी
तृण उंच वाढले बिलगे तरु पर्णांशी

पोपडे जरासे भिंतीवरती ओले
अन् धाप टाकुनी उदास खिडकी बोले
निखळले कसे हे अलगद वासे काही
ते वैभव सारे जिथे द्यायचे ग्वाही

ती विहीर जेथे जमायचे बघ खेडे
वाजायाचे ते रहाट करकर वेडे
देव्हारा तिथला कसा पोरका झाला
चढविली कशी ना कुणी फुलांची माला

मी धावत सुटलो स्वप्नांच्या त्या पाठी
ना मिटली तरिही चिंतेची ती आठी
बैसतो स्मृतीच्या त्याच नदीच्या काठी
मी बालपणाला पुन्हा जगायासाठी

प्राजक्ताची शिकवण

Submitted by वैशाली अ वर्तक on 6 January, 2025 - 01:35

शिकवण प्राजक्ताची*

टपोरे शुभ्र प्राजक्त
फुलले मम अंगणी
किती मोहक रूपाने 
पाहता आनंद  मनी

देठ शोभते केसरी
शुभ्र पाकळ्या मोहक
 पडे  सहज भुवरी
सडा चित्ताला वेधक.

गर्द हरित पर्णात
शोभे प्राजक्त सुंदर
सडा पाहुनिया वाटे
वेचूया ओंजळभर 

अल्प काळाचे आयुष्य
आनंद देणे दुसऱ्यास
घ्यावी शिकवण त्याची
उपयोगी जगण्यास

वेचली प्राजक्त फुले
अर्पिली श्रीहरी चरणी
  दिसे शोभिवंत देवा-ही
आनंदात मनोमनी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मृत्यू

Submitted by वैशाली अ वर्तक on 5 January, 2025 - 02:30

मृत्यू 

जगी काहीच नाही निरंतर 
 नसे कसली शाश्वती 
जीवन पण ,असे क्षणभंगुर 
करिता विज्ञानाने कितीही प्रगती 

किती ही करा प्रयत्न 
टिकविण्याची जरी आस
प्रत्येक वस्तूला , व्यक्तीला
नाश हा असतोच खास 

उत्पत्ती वाढ  आणि  अंत 
या तीन्ही क्रिया होणार 
पण   हेच नित्य निरंतर 
 अमर्त्यची शाश्वती  नसणार

जलचरसृष्टी  पण नाही निरंतर 
ते पण नाही  शाश्वत 
जो पर्यंत श्वास चाले
जीवन असे अविरत

करा विचार जीवनाचा
क्षण क्षण चालला निसटून
काळ चालला सदैव पुढे 
जशी निसटते वाळू हातातुन

पंचप्राण हे झाले आतुर

Submitted by Meghvalli on 3 January, 2025 - 12:36

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी

सगुण रुपाने येऊन द्यावे दर्शन या भक्तासाठी

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
किती जन्म मी तिष्ठलो स्वामी तुमच्या भेटीसाठी

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
फिरलो अगणिक कृष्णा तिरावर तुम्हास शोधण्यासाठी

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
तव दर्शनास आसुसल्या माझ्या नयनांच्या ज्योती

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
किती कोटी नाम जप केले तुम्हास भेटण्यासाठी

पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
धाऊन या हो लवकर या भक्ताच्या प्रेमापोटी

अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे

Submitted by वैशाली अ वर्तक on 3 January, 2025 - 01:20

*अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे*

अभिमानी नसावे कधीच
स्व चा अभिमान असावा
भेद जाणू स्वाभिमानी व अभिमानीचा
गर्विष्ठ स्वभाव कधीच नसावा .

असता स्वभावे स्वाभिमानी
तयाचाच मान रहातो जगती
ताठ मानेने जगणे उचित
तरच होते जीवनी प्रगती.

अभिमानी नसावे कधीच
गर्वाने होतो पराजय
बलाढ्य असूनही रावण
मिळवू शकला नाही विजय.

मोडेन, पण नाही वाकणार
स्वाभिमानी वृत्ती असावी
विनयाने शोभावे जीवनी
पण, लाचारता कधी नसावी.

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन