अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे

Submitted by वैशाली अ वर्तक on 3 January, 2025 - 01:20

*अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे*

अभिमानी नसावे कधीच
स्व चा अभिमान असावा
भेद जाणू स्वाभिमानी व अभिमानीचा
गर्विष्ठ स्वभाव कधीच नसावा .

असता स्वभावे स्वाभिमानी
तयाचाच मान रहातो जगती
ताठ मानेने जगणे उचित
तरच होते जीवनी प्रगती.

अभिमानी नसावे कधीच
गर्वाने होतो पराजय
बलाढ्य असूनही रावण
मिळवू शकला नाही विजय.

मोडेन, पण नाही वाकणार
स्वाभिमानी वृत्ती असावी
विनयाने शोभावे जीवनी
पण, लाचारता कधी नसावी.

अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे
याची द्यावी मनाने ग्वाही
मग यश संपादन करण्यात
कधीच अडचण येणार नाही.

वैशाली वर्तक.

Group content visibility: 
Use group defaults

गर्व वाईट व स्वामिभान चांगला - हा विचार आणि त्यावरील कविता उत्तम. फक्त इथे अभिमान आणि गर्व समानार्थी वापरले आहेत असं वाटलं आणि त्याने गल्लत झाली आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. अभिमान/अभिमानी असणे वाईट नाही. गर्व/गर्विष्ठ वाईट. आपल्या प्रतिज्ञेत "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे" अशी ओळ आहे.