प्राजक्ताची शिकवण

Submitted by वैशाली अ वर्तक on 6 January, 2025 - 01:35

शिकवण प्राजक्ताची*

टपोरे शुभ्र प्राजक्त
फुलले मम अंगणी
किती मोहक रूपाने 
पाहता आनंद  मनी

देठ शोभते केसरी
शुभ्र पाकळ्या मोहक
 पडे  सहज भुवरी
सडा चित्ताला वेधक.

गर्द हरित पर्णात
शोभे प्राजक्त सुंदर
सडा पाहुनिया वाटे
वेचूया ओंजळभर 

अल्प काळाचे आयुष्य
आनंद देणे दुसऱ्यास
घ्यावी शिकवण त्याची
उपयोगी जगण्यास

वेचली प्राजक्त फुले
अर्पिली श्रीहरी चरणी
  दिसे शोभिवंत देवा-ही
आनंदात मनोमनी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

Group content visibility: 
Use group defaults