पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
सगुण रुपाने येऊन द्यावे दर्शन या भक्तासाठी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
किती जन्म मी तिष्ठलो स्वामी तुमच्या भेटीसाठी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
फिरलो अगणिक कृष्णा तिरावर तुम्हास शोधण्यासाठी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
तव दर्शनास आसुसल्या माझ्या नयनांच्या ज्योती
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
किती कोटी नाम जप केले तुम्हास भेटण्यासाठी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
धाऊन या हो लवकर या भक्ताच्या प्रेमापोटी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
तुम्हीच ना माय माझी गुरुवर जरी न जन्मलो मी पोटी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
आईबाप टाकुन गेले ना मज स्वामी तुमच्या ओटी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
स्मर्तगामी या ब्रिदास जागुनी दर्शन द्यावे लौकिकार्थी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
या हो लवकर स्वामी लेकिस ह्या माहेरी नेण्यासाठी
सोमवार, ३०/१२/२०२४ , २०:०६ hrs.
अजय सरदेसाई (मेघ)