काठावर अज्ञाताच्या

Submitted by अनन्त्_यात्री on 11 January, 2025 - 09:03

आदिस्फोटाने अपार
ऊर्जा-द्रव्य ओसंडले
ज्ञेय-अज्ञेय द्वैताने
भवताल पछाडले

कृष्ण ऊर्जा, कृष्ण द्रव्य,
कोडी पल्याड तर्काच्या
हुलकावण्या देतात
काठावर अज्ञाताच्या

किती गुह्ये अद्यापही
चराचरात दाटली
वाटे एक सुटले तो
नवी पुढ्यात ठाकली

अंतहीन अज्ञाताचे
प्रज्ञा करी दोन भाग
एक ज्ञेय- कष्टसाध्य
दुजा अज्ञेय- अथांग

Group content visibility: 
Use group defaults

उत्कृष्ट!

(हुलकावण्या देतात येथे हेलकावे घेतात असेही क्षणभर वाचून पाहिले)

छान....
कृष्ण उर्जा, कृष्ण द्रव्य...
रात्र काळी, घागर काळी....छान लय
कृष्ण ....अवघड प्रकरण