कविता

सैरभैर

Submitted by pradyumnasantu on 29 December, 2011 - 16:00

सैरभैर

आज ५ जुन
उद्या मान्सून
उद्याच यायचं भेटायला तर
ये होउन मुसळधार
वेळीच पाउस सुरू होण्याचं
सुख आहे अपरंपार

नाही तर असं कर
उष्म्यानं हैराण माझी आई ठेवते बर्फाची पिशवी माथ्यावर दुपारी
तू होउन ये ती पिशवी
नाहीतरी तुझं येणं तिच्यासाठी वळवाच्या सरी
जिवलग टपो-या गारा बिलोरी

किंवा दुपारी येणारा पोष्टमन बन तू
जसा थकलेला तो
माझ्या व्हरांड्यात विसावतो
मी दिलेलं सरबत पिउन पुन्हा भटकंतीला जातो
मला वाटतं सेवा घडली देवाची
किंवा तू पोष्टमन बनलीस तर देवीची

नाहीतर हो प्राध्यापक कोठुरकर
माझे अर्थशास्त्राचे लेक्चरर
क्लास आहे त्यांचा उद्या बाराला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

१)

Submitted by Ramesh Thombre on 25 December, 2011 - 05:40

रात्री एकटच झोपल्यावर हळूच
छातीवर फुंकर घालणारी बोचरी थंडी ...
अन सकाळी उठल्यावर ...
इस्त्रीच्या शिल्लक राहिलेल्या एकमेव
शर्टची तुटलेली गुंडी.

आठ दिवसांपासून एकाच जागी
झोपलेलं अस्ताव्यस्त अंथरूण ...
अन तिथेच बेडवर कोपऱ्यात
उघडं पडलेलं मळकट पांघरूण

किचनओट्याशेजारील मोरीत
पडलेली खरकटी भांडी ...
अन कधीकाळी ताजी असलेली
फ्रीझमधील सडलेली भाजी.

वर्तमानपत्रांपासून दूर पडलेल्या
रंगीत साप्ताहिक पुरवण्या ...
अन कपाटातील एकावर-एक पडलेल्या
पुस्तकातील अगणित कहाण्या.

झोपेच्या प्रयत्नात हजारदा
बदललेली कुशी ...
अन शेजारीच पडलेली
आणखी एक उशी.

बाथरूम मधील

गुलमोहर: 

सांडू शेटचा फोन आलाय ....S S

Submitted by Ramesh Thombre on 19 December, 2011 - 12:36

मुंबई मधल्या एका चाळीत,
राहत असतो सांडू शेट.
चाळीमधूनच हलवत असतो,
सगळे सगळे धंदे थेट.
सांडूशेटचा धाक मोठा,
गल्लोगल्ली पेरला आहे.
सांडूशेटच्या धाका पुढं,
दिल्लीचा राजा हरला आहे.
सांडूशेटचे पंटर सारे ...
गल्लोगली हिंडत असतात.
जगण्याच्याच हप्त्यासाठी
ज्याला त्याला भांडत असतात ...

सांडू शेटचा फोन आलाय ....S S
एक नवी धडकी असते ....
अक्खा दिवस गल्ल्यांमध्ये
हप्त्यानंतर कडकी असते.
सांडू शेठ मुंबई मध्ये,
कुठल्या गल्लीत राहत असतो.
सांडू शेट मुंबई मधून,
सगळं कसं पाहत असतो ?
ज्याला त्याला प्रश्न असतो,
शेट कसा दिसत असेल ...?
एवढा हप्ता पाहून मग ...
शेट कसा हसत असेल ?

गुलमोहर: 

होत नाही ती छटा !

Submitted by pradyumnasantu on 18 December, 2011 - 10:21

होत नाही ती छटा !

निळ्याची निळाई
आकाश पांघरी
गहराई मात्र तुझ्या नेत्रां

लालाची लाली
चोचीला मिट्ठूच्या
लालाचा गंज मात्र शस्त्रां

प्रणया गुलाबी
अचूक तो रंग
गुलाबी थंडी जाणवी गात्रां

रंगांचा खजिना
रंगपेटीमध्ये
मैत्रीची बहार तुजपाशी मित्रा

रंग मिसळले
शब्द आकळले
तरी कसा साकारु मनाच्या चित्रा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वप्न

Submitted by मोहना on 11 December, 2011 - 17:50

हे स्वप्न
माझं की तुझं
कुणास ठाऊक कुणाचं?
आपण मात्र काम करायचं
स्वप्नामध्ये रंग भरायचं
ह्याच कामात मी रमले होते
पुढे पुढे जात होते
तुझ्या पाऊलखुणांचा मागोवा घेत होते
शेजारीच तर माझ्या पावलांच्या
खुणा होत्या
आणि तू मात्र प्रारंभालाच उभा होतास
स्वप्नासारखा!

गुलमोहर: 

रिपोर्टिंग फ्रॉम एएमआरआय कोलकाता स्मशानभूमी २०११

Submitted by pradyumnasantu on 10 December, 2011 - 18:04

रिपोर्टिंग फ्रॉम एएमआरआय कोलकाता स्मशानभूमी २०११

आम्ही सारे गेलोत जळून
मी बोलतोय एएमआरआय इस्पितळाच्या स्मशानभूमीतून
आम्ही किती जण म्हणता?
कोणी पत्रकार म्हणे नव्वद, कोणी त्र्याण्णव, कोणी पंच्याण्णव
शंभरी नाही झडली
आमच्या सा-या सचिन, महिंदरची
नव्वदीतच विकेट पडली
पण मी म्हणतो फरक काय?
एखाद दुसरा जळका पाय
तुटका हात,भेजा फ्राय

फिंगर-चिप्स इन बॊयलिंग ऒइल
शतक काय
कधीही होउन जाईल

समजा आग लागलीच नसती
आम्ही सरतच होतो कणकण
आमच्या आमच्या आजारपणाशी
आमचे चालूच होते रण

म्हणूनच आमचे हे मरण
जीवाला लाऊन घ्यायचे काय कारण?
तुम्ही तुमचे काम करा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जाईचे फूल

Submitted by संजय पठाडे on 30 November, 2011 - 22:18

हसरे चांदणे
नभातून सांडले
जाईच्या फुलात
गंध ओले ओले

शुभ्र-शुभ्र फुले
चांदण्यात नहाली
जाईची काया
टंच भरलेली

फुलांची कांती
ओठ स्पर्शू गेले
ह्रदयात काहूर
अंग शहारलेले

शरदाच्या चांदण्यात
जाईचे मोहरणे
तुझ्या-माझ्या मनात
प्रितीचे बहरणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असे वाटते...!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हातून सुटले सारे काही असे वाटते
आयुष्याला अर्थच नाही असे वाटते

सगळे विसरून पुढेच जावे असे ठरवले
शल्य तरीही उरात राही, असे वाटते

अशक्य स्वप्नांचे मनातील ओंगळ बोजे
फेकून द्यावे दिशांस दाही, असे वाटते

नकोत गुंते आठवणींचे, नको अडकणे
जगणे व्हावे पुन्हा प्रवाही, असे वाटते...!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

चापट गालाले लागते

Submitted by जीएस on 26 November, 2011 - 10:16

'Prediction is very difficult, especially about the future' - Neils Bohr

' पान '

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऑफिसच्या खिडकी बाहेर पिंपळाचे मोठ्ठे झाड होते. रोज दुपारी जेवण झाल्यावर खिडकीतून बाहेर बघत बसले कि, पिंपळाची पानं पडताना दिसायची. पिंपळाचे पानं कधीच झाडावरून 'टपकन' खाली पडत नाही. ते फांदीपासून विलग झाले कि हवेत किमान २-३ गिरक्या घेउन मगच जमिनीवर टेकते. मला तो छंदच जडला होता, सुटलेले पानं कुठे जाऊन पडते ते बघण्याच्या. असेच कधीतरी बघता बघता हि कविता सुचली.

रोजच बघतो पक्षी नवे
उंच उडणारे थवेच थवे
मनात असते नभी झेपावे
घेउन भरारी, मजेत गावे

त्याच फांद्या, तीच पाने
तेच तेच ते नकोच जिणे
तोडून सारे पाश जावे
रोज नव्या वल्लरी वसावे

आज अचानक काय हे घडले
वाऱ्याने मज अलगद खुडले

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता