होत नाही ती छटा !

Submitted by pradyumnasantu on 18 December, 2011 - 10:21

होत नाही ती छटा !

निळ्याची निळाई
आकाश पांघरी
गहराई मात्र तुझ्या नेत्रां

लालाची लाली
चोचीला मिट्ठूच्या
लालाचा गंज मात्र शस्त्रां

प्रणया गुलाबी
अचूक तो रंग
गुलाबी थंडी जाणवी गात्रां

रंगांचा खजिना
रंगपेटीमध्ये
मैत्रीची बहार तुजपाशी मित्रा

रंग मिसळले
शब्द आकळले
तरी कसा साकारु मनाच्या चित्रा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आपल्या प्रतेक कवितेत एक बहारदार नजाकत पाहायला मिळतेय
रंग मिसळले
शब्द आकळले
तरी कसा साकारु मनाच्या चित्रा>>>>क्या बात है!