थोडंफार चुरगळलेलं, अन् थोडं उलगडलेलं
पण आयुष्याचं प्रत्येक पान राहु दे भरलेलं
तिथे नसावा अट्टाहास वळणदार अक्षरांंचा
सरळ स्वच्छ भावनांतून पोहचू दे लिहलेलं
कधी काही पानांवरती पाऊसही बरसावा
सुख दुःखाच्या आसवांनी ओलं चिंब भिजलेलं
थोडा त्या पानांना नाविन्याचा गंध असावा
तरी जुनं सुटू नये काळजामध्ये फुललेलं
आयुष्याच्या पानांचा सुगंध सर्वांना मिळावा
पान असावं प्राजक्ताच्या फुलांसंगे गळलेलं
आयुष्याचे पान भरावे आर्त मनस्वी कवितेने
कृतार्थाच्या कृतज्ञतेनेच्या जाणीवेने झुकलेलं
- रोहन
( शशांकजींच्या भक्तिमय रचनांच्या प्रेरणेतून )
ताल धरी पांडुरंग
मनातला भक्तिभाव
प्रगटता कागदावं
भाग्योदय त्याचा झाला
आला आला त्याला जीव
ओळ ओळ रखुमाई
अर्थोअर्थी चंद्रभागा
ताल धरी पांडुरंग
साथ देउनी अभंगा
शाई भक्तिरस प्याली
अक्षरांसी वाचा आली
पान बोलता विठ्ठल
पंढरी दुमदुमली
© दत्तात्रय साळुंके
सळसळली झाडे आणिक
बोलली काहीच नाहीत
काय होते सांगायचे जे
त्यांचे त्यांनाच माहित
सावली हलली जरा ...
अन् कावडसे हलले जरा
सावल्यांतील कवडश्यांना
काय होता अर्थ खरा ..?
मी मनाला ' हो ' म्हणालो
अन् स्वतःला ' जा ' म्हणालो
कवडशातील ऊन झालो
सावलीची खुण झालो
सळसळत्या झाडाचे
एक हळवे पान झालो
- गजानन मुळे
बॅकेच्या पासबुकचे पान
तुझ्यासमोर काय उघडले
तू जणु सुपारीच घेतलीस
मला कर्जबाजारी करायची
मोठा चुना लागल्यावर
माझ्या लक्षात आली
माझी चुक
आता मीही कात टाकली
माणसे ओळखायला शिकलोय
शेवटी तुला सुधारण्याचा
विडा उचलावाच लागला!
जापान मधे 'ब्रेड' ला 'पान' म्हणतात. आणि तिथं 'आपलं' पान मिळत नाही.
हे म्हणजे त्या 'बँडबाजाबारात' मधल्या 'व्यापार मे नो प्यार!' सारखं आहे, "जापान मे नो पान."
त्यामुळे जापानला असताना एखाद्याला "जा पान ला" असं म्हटलं, तरी काही उपयोग नाही. खरंच नाही.
जपान्यांचं असलं सगळं मला काही केल्या कळत नाही.
- मी जापान सोडून येण्याच्या बहुविध कारणांपैकी 'पान' हे एक!
एकदा आमच्या एका जापानी क्लायंटाला भारतीय व्यंजनं खाण्याची लय हुक्की आली. मग आम्ही नेहेमीप्रमाणे