जापान मधे 'ब्रेड' ला 'पान' म्हणतात. आणि तिथं 'आपलं' पान मिळत नाही.
हे म्हणजे त्या 'बँडबाजाबारात' मधल्या 'व्यापार मे नो प्यार!' सारखं आहे, "जापान मे नो पान."
त्यामुळे जापानला असताना एखाद्याला "जा पान ला" असं म्हटलं, तरी काही उपयोग नाही. खरंच नाही.
जपान्यांचं असलं सगळं मला काही केल्या कळत नाही.
- मी जापान सोडून येण्याच्या बहुविध कारणांपैकी 'पान' हे एक!
एकदा आमच्या एका जापानी क्लायंटाला भारतीय व्यंजनं खाण्याची लय हुक्की आली. मग आम्ही नेहेमीप्रमाणे
* इंटरव्युऽ करत करत खाणं उरकू लागलो. आता माणसानं गप खावं, जेवणानंतर त्या पां.शु. नॅपकिनला हात पुसावेत, निघावं. (बरं हात धुवावेत. पां.शु. नॅपकिननं म्हणावे तितके सोच्छ होत नाहीत..) पण नाही. मला पानाची आठवण यायलाच हवी होती. आणि ती क्लायंटाला बोलून दाखवायलाच हवी होती.
"चारेक वर्षाच्या मुलाला त्याचा हात पोचणार नाही इतक्या उंचीवरचा एक नेहेमी बंद असणारा कप्पा थोडासा किलकिला उघडा दिसावा आणि नेमकं तेव्हाच त्यावर प्रकाश पडून आतुन काहीतरी चमकावं!!!"
-ते बघताना त्या मुलाचा चेहेरा जसा चमकेल, अगदी तस्साच! क्लायंटाचा चेहेरा तसाच चमकला!
"नानीऽ !?" क्लायंट उवाच.
----> हा क्लायंट एक नंबरचा बायल्या होता. "नानीऽ" वगैरे अगदी लाडात म्हटला, तशी भितीच वाटली होती.
आता त्याच्या 'अगोबाईऽ ते काय आणिऽऽ!?'चं उत्तर सांगायला हवं.... पाऊण-एक सेकंदानंतर कपाळाला हात लागलाच होता.
"हाप्पानो नाकानी मासारा गा आरिमास! सोरेओ थाबेरु तो कुचीकारा आकाई ज्यु-स गा देमास!!! "
- माझ्या तेव्हाच्या जापानी ज्ञानाला शोभेल इतपत मी त्याला सांगितलं. एका अर्थाने चुनाच लावला.
कारण त्याचा शब्दशः अर्थ "झाडाचं पान असतं, ज्यात मसाला घातलेला असतो. ते खाल्लं की तोंड लाल होतं."
- म्हणजे रक्त येतं का रे भाऊऽ??
- म्हणजे कुठलंही कच्चं पान खातात का रे भाऊऽ??
- ओह! हम्म्म्म!! म्हणजे कच्चा तंबाखु का रे भाऊऽ??
- म्हणजे मेरुआना का रे भाऊऽ??
----> नाही!!! :|
----> नाही. पान म्हणजे पानाचं पान. कुठलंही नाही.
----> नाही. पान म्हणजेऽ पानाचं पान. त्यात मग चुना असतो. कॅल्शिअम!
कात असते. ते खाल्लं की खाल्लेलं पचतं.
---->अरे तुझ्या!!? पचन आणि मेरुआनाचा काय संबंध??
थांब! इंटरनेटवर चल, दावतो तुला:- पान कशाशी खातात ते...
कंपनीत पोचेपर्यंत "नानीऽ" ची टकळी चालूच होती. देशात असतो तर ह्याच्या तोंडात पान कोंबून ती बंद करता आली असती, पण.... असो..
कंपनीत पोचलो. आणि थेट कंप्युटरजीला सांगितलं.. "गूगल" --> "पान" --> "इमेजेस"
*आता पुरावा नाही राहिला, पण तेव्हा आलेले फोटोही असले अतरंगी. :|
"मेरुआना~ मेरुआना~ " क्लायल्या टाळ्या पिटत ओरडू लागला. एकाला दुसरा सामिल झाला आणि मी त्या दिवशी तिथुन लवकर तोंड काळं केलं होतं...
काय करणार दिसलेल्या सगळ्या फोटोंमधे पानाची शेतं दिसत होती. आणि पानवाले असे मिशीवाले उघडेबंब..
अधेमधे भारतवारी झाली की "पंधरा दिवसात अधाशाप्रमाणे असलं सगळं करून घेणं" नियमितपणं होत राहिलं.
हे म्हणजे त्या डीडीएलजे मधल्या सिमरन सारखं आहे.
बाऊजी : "जाऽ पुत्तर, जी ले अपणी जंदगी~~~ "
सिमरन : "बाऊजी!! पैरी पोना बाऊजी.."
... वगैरे.."
ह्या पंधरा दिवसात दाबेली, उत्ताप्पा, टोस्ट-कॉफी, माटला कुल्फी असं एकाच संध्याकाळी खाऊन झालं, की मग वेळ यायची ती पानाची!
मग बाकीचे खाण्याचे पैसे कोणीही दिलेले असोत! पान घेऊन देणार तो आमचा "सोमाणी!"
कॉलेज मधे असल्यापासूनची सवय. रविवारी रात्रीचं जेवण झालं की याची पावलं हळुहळू वळणार त्या पानवाल्याकडं.
"अबेऽ, आमच्या घरी दिवाळीला स्पेशल रसम असते, त्यात स्पेशल पान बनतं. आमच्या घरीच बनतं. ते सगळे खातातच. " ही एक वाक्याची कथा त्याच्याकडून हजारदा ऐकली तरी परत ऐकायचा मोह आवरत नाही, आणि वर हसण्याचाही.
--> "बनतं" म्हणजे आप्पोआप्प का रे भाऊऽ?? वगैरे पाचकळपणा चालू होतो.
तर सोमाणीबरोबर खाल्लेलं पान म्हणजे "कलकत्ता खुशबु चटनी"!
* ते अवतरण चिन्हातलं "चटणी" म्हणून वाचू नये.
बाकी वेळा घरी लोकांसाठी पान आणताना आणलं ते 'बनारस'! किंवा मग तोंडात टाकल्या क्षणी विरघळणारं "मघई!"
ते १२०-३०० वगैरे काय्तरी असतं! एवढी माहिती होती, पण पुढे कधी विचारावंसंही वाटलं नाही आणि खावं तर त्याहुन नाही.
हल्लीच देशात लॉङटर्म परत आलो आणि जीवाचं पुणं करं सुरु झालं. मग काय? रोज तुडुङ्ब जेवण आणि त्यावर 'फुलचंद' पान!
- देशात उकाडा फार वाढल्यामुळं अंगात उष्णता वाढते असं लक्षात आलं होतं, पण जेवणानंतर नेमानं खाऊ लागलेल्या त्या शीतल, सुगंधी, सुमधुर 'फुलचंद' पानामुळं जेवणानंतरचं चालणं सुसह्य होऊ लागलं होतं.
इथं बेसावध वाचकांना 'फुलचंद म्हणजे काय रे भाऊऽ?' असा इष्टप्रश्न पडलाच असेल.
----> 'फुलचंद' पान म्हणजे नेहेमीचंच पान, जोपर्यंत त्यात 'किवाम' टाकला जात नाही, तोपर्यंत!
किवाम म्हणजे "तेरे बातोंमे किवाम की खुशबु है, तेरा आना भी गरमीयों की लू हैऽ. कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना! " वाला किवाम.
** किवाम की किमाम असा एशी एक शंका आहेच...
तर हे फुलचंद विकत कसं घ्याचं? तर असं: -
फुलचंद हे ' सादा ' असतं, किंवा असतं 'नुसतं फुलचंद!'
सादा फुलचंद हे आपल्या मघई सारखंच. खाचं आणि गिळाचं... मी नेहेमी हेच घेतो.
'नुसतं फुलचंद' मात्र गिळलं की संपलं...
तरुणांमधे 'नुसत्या' फुलचंदचे किस्से फेमस आहेत. बेसावध लोकांवर कॉलेजच्या वयात असे फुलचंदचे प्रयोग केले जातात. ते गिळताच काही क्षणातच जादू होते आणि मग उचकी पासून, उलटी पासून नानाविध प्रकार घडतात. जे नंतर सांगून त्या बेसावधाला लाज आणता येते.. ह्यातली गोम म्हणजे त्यातला किवाम अर्थात भाजलेला किंवा तत्सम प्रक्रिया केलेला तमाकू!
- मीही हा प्रयोग अनुभवला आहे. :|
'पानात पडेल ते पवित्र मानुन खावं!' हे आमच्या साळंमदली शिकवण सांगते. घरीही नियमितपणं तोच चुना लावला गेला असल्याने 'पानात पडलेलं नेहेमीच गोड मानुन खात आलो आहे.. किंवा गिळत आलो आहे म्हणा.
परवा असंच झालं. अ-क्सा-श्रे-दे कंपनीबरोबर भ-र-पे-ट खाणं झालं. इतकं मस्त खाणं झाल्यावर मग पानाचा घाट घातला गेलाच. मी मागवलं 'फुलचंद सादा!' आणि मघई प्रमाणे पान पवित्र केलं.
मनातलं कुतुहल इष्टव्यक्तिंसमोर इष्टसमयी उघडं केलं, की हमखास उत्तर मिळतं हा अनुभव असल्याने 'अ' सरांना विचारणा केली.. "हे फुलचंद म्हणजे काय असतं?" खरं तर मला त्याला 'इन्व्हेण्टरचं नाव का रे भाऊऽ?" असं विचारायचं होतं.
ह्यातही व्हेटरन असलेल्या सरांनी सांगितलं, "फुलचंद म्हणजे तंबाखु वालं पान..."
"हो. ते म्हणजे किवाम वालं. माझं साधं आहे.." मी.
"नाही. " - अ. "फु. म्हणजे तं. त्यात कि. घातलं की अजून जास्ती तं."
........... मी ते फु. चावणं थांबवलं, आणि मघईगिरी तर त्याहून आधी!
"तरीच मगाचपासून म्हणतोय, काहीतरी वेगळं वाटतंय. जरा, ज~रा गरगरतंय... " पान थुंकत मी म्हटलं...
'अज्ञानात सुख असतं!' ऐकलं होतं. फुलचंद साहेबांमुळे नवंच समजलंय.
आता मी म्हणतो - 'अज्ञानात सुख नव्हे, अज्ञानात तंबाखू!'
- - - समाप्त - - -
गरगरण्याचं कारण मी लागलीच विषद वगैरे केलं होतं. पण अ-क्सा लोक ऐकून घेण्याच्या पलिकडे गेल्याने मी ते गिळून टाकलं.
कारणः - कधी कधी आपल्या आधी एखाद्याने किवाम वालं पान सांगितलं, आणि पान बनवणार्याने हात नीट न स्वच्छ करता आपलं पान बनवलं, तर आपण गरगरू शकतो.
उष्णता: - उन्हाळा उष्ण असतोच. त्याबरोबर कात आणि नकळत खाल्लेला तंबाखूदेखिल..
* इंटरव्युऽ : - बेसावध वाचकांसाठी विपुपोच ऋक्षा पाठणेत येईल.
'अगोबाईऽ ते काय आणिऽऽ!?'चं
'अगोबाईऽ ते काय आणिऽऽ!?'चं
चुना लावणे... जबरी
मस्त पंचेस हाणलेत...!
मस्त जमलंय विनोदी लिखाण . आवडेश
भारीच * इंटरव्युऽ : - बेसावध
भारीच
* इंटरव्युऽ : - बेसावध वाचकांसाठी विपुपोच ऋक्षा पाठणेत येईल.>>>
तुफान जमला आहे...... कलकत्ता
तुफान जमला आहे......:G
कलकत्ता मीठा सुद्धा असेच......
फुलचंद खाणे आणि खायला घालणे असे दोन्ही किस्से केलेले आहेत. भलतीच मजा असते
लय भारी !
लय भारी !
चांगलं लिहिलयसं .( चांगला
चांगलं लिहिलयसं .( चांगला चुना लावलायं )
पानात पडेल ते पवित्र मानुन
पानात पडेल ते पवित्र मानुन खावं
जा पान ला ... या ... असं
जा पान ला ... या ... असं जटिनीबै म्हणतील
मस्तरे ऋयामा.
(No subject)
चांगलाय. पानवाल्याकडेही लोटा
चांगलाय. पानवाल्याकडेही लोटा असतो हे लक्षात असू द्या
बेसावध वाचकांसाठी विपुपोच रिक्षा >>>> नsssssssको. आवरा!!!
(No subject)
हो हो सायो, फोटूत एक लोटा
हो हो सायो, फोटूत एक लोटा दिसतोय खरा. पण तो रिकामा नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.
मास्तर, अहो क चा ख, त चा थ करायचा सोडा की (आतातरी)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
:d
(No subject)
प्रचंड आवडला..!
प्रचंड आवडला..!
लई भारी ! लोटा
लई भारी !
लोटा
लई भारी !
लई भारी !
ऋयामा भारी आहे. जपानात असताना
ऋयामा भारी आहे. जपानात असताना माझा एक त्रिकुट ग्रुप आहे. तिघेही पानाचे दर्दी. त्यामुळे भारतात जी ले जिंदगी चा शेवट हे पान सामान घेऊनच होत असे. कलकत्ता शेकडा पान, खुशबु, चटनी, नवरतन ओरीजनल किवाम, पक्की सुपारी, हरी पत्ती, चुना व बाबा १६० हे कंपल्सरी होते. त्याशिवाय जपानमधे एंट्री मिळत नसे व आणले नाही तर फाऊल धरला जात असे.
असो. आता त्या फुलचंदविषयी खुलासा. हे पान या नावाने मुखत्वे फक्त पुण्यात मिळते. मंडईमधल्या एका पानवाल्याकडे हा फुलचंद नावाचा माणुस रोज असे विशिष्ठ पान खात असे. दिवसाला १०० वगैरे. मग त्या पानवाल्याकडे येणार्या गिर्हाईकाला कलकत्ता साधा, खुशबु, चटनी, नवरतन किवाम, काली सल्ली, लवंग ईलायची अशी भलीमोठी यादी वाचुन पान खाण्याऐवजी अरे फुलचंदसेठका एक पान देना हे म्हणणे सोप्पे जात असे. हेच शेठ नंतर जवाहर पान (आचार्य अत्रे सभागृह) येथे पान खायला लागले, नंतर कावेरी, पोर्टीको वगैरे. सध्या फक्त फुलचंद पान असेच प्रचलित आहे.
आमचा पान प्रवास शुक्रवार पेठेतील मौनी पानवालापासुन सुरु झाला मग मंडई, जवाहर, गणराज, कावेरी, पोर्टीको, रविराज असा प्रवास करत सध्या मयुर पावभाजी इथपर्यंत पोचला आहे. मध्यंतरी गणराज (हा जवाहर पानवाल्याचा भाचा. फुटीरवादी होऊन याने वेगळी चुल बांधली) पाशी पान खाताना त्याला सहज विचारले तुला इथे येऊन किती वर्ष झाली रे? त्याचे १५-१६ वर्ष हे उत्तर ऐकुन आमच्या तोंडातुन गेले अनेक वर्ष रसनिश्पत्ती झाल्याचे लक्षात आले.
झकास.
झकास.
भारी लिवलय
भारी लिवलय
(No subject)
(No subject)
नमस्कार
नमस्कार
काय सॉल्लीड पंचेस!!! मस्त
काय सॉल्लीड पंचेस!!! मस्त लिहिलयंस
मस्त रे ऋयाम.. तुझ्या विनोद
मस्त रे ऋयाम.. तुझ्या विनोद बुद्धीला धुमारे फुटत आहेत..
ऋयामा!!!
ऋयामा!!!
लै भारी ऋयाम. केपी- मस्त
लै भारी ऋयाम.
केपी- मस्त माहिती.
भारीच की! मस्तायेत
भारीच की! मस्तायेत पंचेस...अजून लिवा...
>> नानीऽ.... हा बायकी टोन इतका इरिटेटिंग असतो....
Pages