जापान मधे 'ब्रेड' ला 'पान' म्हणतात. आणि तिथं 'आपलं' पान मिळत नाही.
हे म्हणजे त्या 'बँडबाजाबारात' मधल्या 'व्यापार मे नो प्यार!' सारखं आहे, "जापान मे नो पान."
त्यामुळे जापानला असताना एखाद्याला "जा पान ला" असं म्हटलं, तरी काही उपयोग नाही. खरंच नाही.
जपान्यांचं असलं सगळं मला काही केल्या कळत नाही.
- मी जापान सोडून येण्याच्या बहुविध कारणांपैकी 'पान' हे एक!
एकदा आमच्या एका जापानी क्लायंटाला भारतीय व्यंजनं खाण्याची लय हुक्की आली. मग आम्ही नेहेमीप्रमाणे
* इंटरव्युऽ करत करत खाणं उरकू लागलो. आता माणसानं गप खावं, जेवणानंतर त्या पां.शु. नॅपकिनला हात पुसावेत, निघावं. (बरं हात धुवावेत. पां.शु. नॅपकिननं म्हणावे तितके सोच्छ होत नाहीत..) पण नाही. मला पानाची आठवण यायलाच हवी होती. आणि ती क्लायंटाला बोलून दाखवायलाच हवी होती.
"चारेक वर्षाच्या मुलाला त्याचा हात पोचणार नाही इतक्या उंचीवरचा एक नेहेमी बंद असणारा कप्पा थोडासा किलकिला उघडा दिसावा आणि नेमकं तेव्हाच त्यावर प्रकाश पडून आतुन काहीतरी चमकावं!!!"
-ते बघताना त्या मुलाचा चेहेरा जसा चमकेल, अगदी तस्साच! क्लायंटाचा चेहेरा तसाच चमकला!
"नानीऽ !?" क्लायंट उवाच.
----> हा क्लायंट एक नंबरचा बायल्या होता. "नानीऽ" वगैरे अगदी लाडात म्हटला, तशी भितीच वाटली होती.
आता त्याच्या 'अगोबाईऽ ते काय आणिऽऽ!?'चं उत्तर सांगायला हवं.... पाऊण-एक सेकंदानंतर कपाळाला हात लागलाच होता.
"हाप्पानो नाकानी मासारा गा आरिमास! सोरेओ थाबेरु तो कुचीकारा आकाई ज्यु-स गा देमास!!! "
- माझ्या तेव्हाच्या जापानी ज्ञानाला शोभेल इतपत मी त्याला सांगितलं. एका अर्थाने चुनाच लावला.
कारण त्याचा शब्दशः अर्थ "झाडाचं पान असतं, ज्यात मसाला घातलेला असतो. ते खाल्लं की तोंड लाल होतं."
- म्हणजे रक्त येतं का रे भाऊऽ??
- म्हणजे कुठलंही कच्चं पान खातात का रे भाऊऽ??
- ओह! हम्म्म्म!! म्हणजे कच्चा तंबाखु का रे भाऊऽ??
- म्हणजे मेरुआना का रे भाऊऽ??
----> नाही!!! :|
----> नाही. पान म्हणजे पानाचं पान. कुठलंही नाही.
----> नाही. पान म्हणजेऽ पानाचं पान. त्यात मग चुना असतो. कॅल्शिअम!
कात असते. ते खाल्लं की खाल्लेलं पचतं.
---->अरे तुझ्या!!? पचन आणि मेरुआनाचा काय संबंध??
थांब! इंटरनेटवर चल, दावतो तुला:- पान कशाशी खातात ते...
कंपनीत पोचेपर्यंत "नानीऽ" ची टकळी चालूच होती. देशात असतो तर ह्याच्या तोंडात पान कोंबून ती बंद करता आली असती, पण.... असो..
कंपनीत पोचलो. आणि थेट कंप्युटरजीला सांगितलं.. "गूगल" --> "पान" --> "इमेजेस"
*आता पुरावा नाही राहिला, पण तेव्हा आलेले फोटोही असले अतरंगी. :|
"मेरुआना~ मेरुआना~ " क्लायल्या टाळ्या पिटत ओरडू लागला. एकाला दुसरा सामिल झाला आणि मी त्या दिवशी तिथुन लवकर तोंड काळं केलं होतं...
काय करणार दिसलेल्या सगळ्या फोटोंमधे पानाची शेतं दिसत होती. आणि पानवाले असे मिशीवाले उघडेबंब..
अधेमधे भारतवारी झाली की "पंधरा दिवसात अधाशाप्रमाणे असलं सगळं करून घेणं" नियमितपणं होत राहिलं.
हे म्हणजे त्या डीडीएलजे मधल्या सिमरन सारखं आहे.
बाऊजी : "जाऽ पुत्तर, जी ले अपणी जंदगी~~~ "
सिमरन : "बाऊजी!! पैरी पोना बाऊजी.."
... वगैरे.."
ह्या पंधरा दिवसात दाबेली, उत्ताप्पा, टोस्ट-कॉफी, माटला कुल्फी असं एकाच संध्याकाळी खाऊन झालं, की मग वेळ यायची ती पानाची!
मग बाकीचे खाण्याचे पैसे कोणीही दिलेले असोत! पान घेऊन देणार तो आमचा "सोमाणी!"
कॉलेज मधे असल्यापासूनची सवय. रविवारी रात्रीचं जेवण झालं की याची पावलं हळुहळू वळणार त्या पानवाल्याकडं.
"अबेऽ, आमच्या घरी दिवाळीला स्पेशल रसम असते, त्यात स्पेशल पान बनतं. आमच्या घरीच बनतं. ते सगळे खातातच. " ही एक वाक्याची कथा त्याच्याकडून हजारदा ऐकली तरी परत ऐकायचा मोह आवरत नाही, आणि वर हसण्याचाही.
--> "बनतं" म्हणजे आप्पोआप्प का रे भाऊऽ?? वगैरे पाचकळपणा चालू होतो.
तर सोमाणीबरोबर खाल्लेलं पान म्हणजे "कलकत्ता खुशबु चटनी"!
* ते अवतरण चिन्हातलं "चटणी" म्हणून वाचू नये.
बाकी वेळा घरी लोकांसाठी पान आणताना आणलं ते 'बनारस'! किंवा मग तोंडात टाकल्या क्षणी विरघळणारं "मघई!"
ते १२०-३०० वगैरे काय्तरी असतं! एवढी माहिती होती, पण पुढे कधी विचारावंसंही वाटलं नाही आणि खावं तर त्याहुन नाही.
हल्लीच देशात लॉङटर्म परत आलो आणि जीवाचं पुणं करं सुरु झालं. मग काय? रोज तुडुङ्ब जेवण आणि त्यावर 'फुलचंद' पान!
- देशात उकाडा फार वाढल्यामुळं अंगात उष्णता वाढते असं लक्षात आलं होतं, पण जेवणानंतर नेमानं खाऊ लागलेल्या त्या शीतल, सुगंधी, सुमधुर 'फुलचंद' पानामुळं जेवणानंतरचं चालणं सुसह्य होऊ लागलं होतं.
इथं बेसावध वाचकांना 'फुलचंद म्हणजे काय रे भाऊऽ?' असा इष्टप्रश्न पडलाच असेल.
----> 'फुलचंद' पान म्हणजे नेहेमीचंच पान, जोपर्यंत त्यात 'किवाम' टाकला जात नाही, तोपर्यंत!
किवाम म्हणजे "तेरे बातोंमे किवाम की खुशबु है, तेरा आना भी गरमीयों की लू हैऽ. कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना! " वाला किवाम.
** किवाम की किमाम असा एशी एक शंका आहेच...
तर हे फुलचंद विकत कसं घ्याचं? तर असं: -
फुलचंद हे ' सादा ' असतं, किंवा असतं 'नुसतं फुलचंद!'
सादा फुलचंद हे आपल्या मघई सारखंच. खाचं आणि गिळाचं... मी नेहेमी हेच घेतो.
'नुसतं फुलचंद' मात्र गिळलं की संपलं...
तरुणांमधे 'नुसत्या' फुलचंदचे किस्से फेमस आहेत. बेसावध लोकांवर कॉलेजच्या वयात असे फुलचंदचे प्रयोग केले जातात. ते गिळताच काही क्षणातच जादू होते आणि मग उचकी पासून, उलटी पासून नानाविध प्रकार घडतात. जे नंतर सांगून त्या बेसावधाला लाज आणता येते.. ह्यातली गोम म्हणजे त्यातला किवाम अर्थात भाजलेला किंवा तत्सम प्रक्रिया केलेला तमाकू!
- मीही हा प्रयोग अनुभवला आहे. :|
'पानात पडेल ते पवित्र मानुन खावं!' हे आमच्या साळंमदली शिकवण सांगते. घरीही नियमितपणं तोच चुना लावला गेला असल्याने 'पानात पडलेलं नेहेमीच गोड मानुन खात आलो आहे.. किंवा गिळत आलो आहे म्हणा.
परवा असंच झालं. अ-क्सा-श्रे-दे कंपनीबरोबर भ-र-पे-ट खाणं झालं. इतकं मस्त खाणं झाल्यावर मग पानाचा घाट घातला गेलाच. मी मागवलं 'फुलचंद सादा!' आणि मघई प्रमाणे पान पवित्र केलं.
मनातलं कुतुहल इष्टव्यक्तिंसमोर इष्टसमयी उघडं केलं, की हमखास उत्तर मिळतं हा अनुभव असल्याने 'अ' सरांना विचारणा केली.. "हे फुलचंद म्हणजे काय असतं?" खरं तर मला त्याला 'इन्व्हेण्टरचं नाव का रे भाऊऽ?" असं विचारायचं होतं.
ह्यातही व्हेटरन असलेल्या सरांनी सांगितलं, "फुलचंद म्हणजे तंबाखु वालं पान..."
"हो. ते म्हणजे किवाम वालं. माझं साधं आहे.." मी.
"नाही. " - अ. "फु. म्हणजे तं. त्यात कि. घातलं की अजून जास्ती तं."
........... मी ते फु. चावणं थांबवलं, आणि मघईगिरी तर त्याहून आधी!
"तरीच मगाचपासून म्हणतोय, काहीतरी वेगळं वाटतंय. जरा, ज~रा गरगरतंय... " पान थुंकत मी म्हटलं...
'अज्ञानात सुख असतं!' ऐकलं होतं. फुलचंद साहेबांमुळे नवंच समजलंय.
आता मी म्हणतो - 'अज्ञानात सुख नव्हे, अज्ञानात तंबाखू!'
- - - समाप्त - - -
गरगरण्याचं कारण मी लागलीच विषद वगैरे केलं होतं. पण अ-क्सा लोक ऐकून घेण्याच्या पलिकडे गेल्याने मी ते गिळून टाकलं.
कारणः - कधी कधी आपल्या आधी एखाद्याने किवाम वालं पान सांगितलं, आणि पान बनवणार्याने हात नीट न स्वच्छ करता आपलं पान बनवलं, तर आपण गरगरू शकतो.
उष्णता: - उन्हाळा उष्ण असतोच. त्याबरोबर कात आणि नकळत खाल्लेला तंबाखूदेखिल..
* इंटरव्युऽ : - बेसावध वाचकांसाठी विपुपोच ऋक्षा पाठणेत येईल.
सहीच लिहिलयस... आवड्लं
सहीच लिहिलयस... आवड्लं
वाचल्याबद्दल धन्यवाद
वाचल्याबद्दल धन्यवाद
>लोटा
>बेसावध वाचकांसाठी विपुपोच रिक्षा >>>> नsssssssको. आवरा!!!
चला. ईष्ट वेक्तिंनी णोंद घेतली... ईणोद पावण झाला..
सूचना : कृपया लेखनाकडे लक्ष द्यावे. रिक्षा नव्हे ऋक्षा. धा वेळा लिवा.
केपी!! लय भारी! हे माहिती नव्हतं एकदम दर्दी दिसताय !! झकास!
>>>> नानीऽ.... हा बायकी टोन इतका इरिटेटिंग असतो....
नाहीतर काय...
-@आभार्स!
(No subject)
भारीच की!! पहिल्याच
भारीच की!!
पहिल्याच परीच्छेदापासून पंचेस एकदम लय भारी बसलेत. 'जापान में नो पान', 'जा पान ला' एकदम भारी... मस्त!!
मला काल कसा दिसला नाही हा लेख?
तरी मी म्हटलं याच्या विपूत अचानक पानाचे फोटो का बरं आले?
(सर, कोणीतरी तुम्हाला एक पानासंबंधी प्रश्न विचारला होता, तो आठवला
आय होप, 'कोणीतरी' हे वाचतंय )
ऋयामा मस्तच रे!
ऋयामा मस्तच रे!
भारीच!
भारीच!
(No subject)
(No subject)
भारी लिहीलंय!
भारी लिहीलंय!
आभारी आहे >> (सर, कोणीतरी
आभारी आहे
>> (सर, कोणीतरी तुम्हाला एक पानासंबंधी प्रश्न विचारला होता, तो आठवला फिदीफिदी
आय होप, 'कोणीतरी' हे वाचतंय डोळा मारा )
>>
इष्ट वेक्तींनी पाहिलेले दिसत नाही. अओ आता काय वगैरे...
@आभार्स!
(सर, कोणीतरी तुम्हाला एक
(सर, कोणीतरी तुम्हाला एक पानासंबंधी प्रश्न विचारला होता, तो आठवला फिदीफिदी
आय होप, 'कोणीतरी' हे वाचतंय डोळा मारा )>>>
याला म्हणतात खा ख का
ऋयाम, लेख भारीच
(No subject)
लै भारी........ ते १२०-३००
लै भारी........
ते १२०-३०० वगैरे काय्तरी असतं! एवढी माहिती होती, पण पुढे कधी विचारावंसंही वाटलं नाही आणि खावं तर त्याहुन नाही. मग काय पान खाल्लंस तू?
(सर, कोणीतरी तुम्हाला एक
(सर, कोणीतरी तुम्हाला एक पानासंबंधी प्रश्न विचारला होता, तो आठवला फिदीफिदी
आय होप, 'कोणीतरी' हे वाचतंय डोळा मारा )<<<<
अरे खरंच की....
कसली लेट पेटलीये माझी......
पानात पडेल ते पवित्र मानुन
पानात पडेल ते पवित्र मानुन खावं
जा पान SSSSS लव्ह इन टोकियो
जा पान SSSSS लव्ह इन टोकियो !
ऋयामसेठ मझा आ गया. या हाप्पा वाल्या संवादांचा थोड्या फार फरकाने आम्ही पण अनुभव घेतलेला.
कापोकाकाच्या त्या त्रिकुटामधे आमची पण एन्ट्री असायची कधी कधी (त्यामुळे त्यास कधी कधी ? चौकडी असे समजावे)
बाद्वे, आमच्या कुलदेवतेला जाताना खुप पाने (१०० ते ५००) आणि पानाचे साहित्य (साधेच) घेऊन जातो.
तिकडे पाने आणि सगळे साहित्य मोठ्या खलात घालून कुटून त्याचा देवीला नैवेद्य आणि भक्तांना प्रसाद दिला जातो.
त.टि. : बर झालं मी हे कधी जापान्यांना सांगितलं नाही.
> मग काय पान खाल्लंस तू?
> मग काय पान खाल्लंस तू?
प.तो.पा. बद्दल चाल्लंय नव्हे!!! ??
महेश सान, चौकडी म्हणाची की म्हण्जे
@आभार्स!
अरे हे कसं काय मिसलं?
अरे हे कसं काय मिसलं?
मस्तच ऋयाम .... हे कस बर मिसल
मस्तच ऋयाम .... हे कस बर मिसल मी?
प्रकाटाआ
प्रकाटाआ
अचाट रे पानाला सन्मान दिलास
अचाट रे पानाला सन्मान दिलास तु
जर्बेराच्या सलाद पानावरून
जर्बेराच्या सलाद पानावरून एकदम फुलचंद पानाची आठवण झाली आणि त्याबद्दल कुणी माबोवर लिहीले आहे का पाहण्यासाठी शोध मोहीम घेतली तेव्हा हे सापडले.
सध्या मी जाम प्रेमात आहे किमाम फुलचंदच्या....विशेषत जड जेवणानंतर हे पान खाल्लायवर जी काय ब्रम्हानंदी टाळी लागते त्याला तोड नाही.
केपी - जबरदस्त माहीती. मलाही खूप दिवस कुतुहल होते फुलचंदच्या नावामागचे. पण फक्त पुण्यातच मिळते हे पान असे नाही. पार अगदी सातारा-कोल्हापूरमध्येही मिळते.
बाहेरच्या राज्यात मात्र आपल्याला काय हवेय हे निवडून सांगावे लागते. उत्तरेच्या मानाने दक्षिणेत त्यामानाने शौकिन नाहीत. हैदराबाद एक सणसणीत अपवाद. पण तिथे आपल्याला हवे असलेले पान समजाऊन सांगणे हीच एक मोठी टास्क आहे.
Pages