घमघमत्या संध्याकाळी निशीगंध उमलला होता
बागेत झुकून क्षणी एका म्हटलास, "लग्न करशील का?"
बोलले न काही तेव्हा पण आता सांगू पाहे
त्या महागहन प्रश्नावर मी विचार करते आहे
अध्यापन माझे काम, दर साल परीक्षा घेते
पण या तुझिया प्रश्नाचे उत्तर मज अवघड वाटे
करी प्रयत्न पारखणीचा, हर मुद्दा परखुन पाहे
त्या महागहन प्रश्नावर मी विचार करते आहे
एकदा पाहिले तुजला घालता कुणाशी वाद
मुळी ऐकवला मज नाही तो शिव्याभरा संवाद
मुखी तुझ्या का बरे सांग अशी गटारगंगा वाहे ?
या महागहन प्रश्नावर मी विचार करते आहे
एकदा आपण दोघेही मज साडी घेण्या गेलो
पंचवीस रुपयांसाठी भांडलास परत मग आलो
तर तू खरा
चारचौघांत असशील
गप्पा होत असतील
माझ्या आठवणी येतील
कुणालाही नकळत
पापण्या ओलावून जातील
...तर त्यात काय
पाऊस बरसत असेल
मन तरसत असेल
तसाच बाहेर जाउन
खड्ड्यातल्या लाल पाण्यात
माझीच छबी पहाशील
...तर त्यात काय
नणंद-जाऊ सासुबाई
मेव्हणे आणि दीर
सोबत सारे असून
एकाकी तू होशील
मला शोधत हिंडशील
...तर त्यात काय
ऒफिसात, बाजारात
लोकलच्या धडधडाटात
टीव्हीच्या कोलाहलात
जिथे जिथे आवाज तिथे
माझा स्वर धुंडशील
...तर त्यात काय
पण जेव्हा आपला बाळ
हिरमुसलेला असेल
आईच्या विरहात
व्याकूळसा दिसेल
मूक रूदन करत
कोप-यात जाउन बसेल
त्याक्षणी जर तू
आली तल्लफ चहाची
रात्री दोन-अडीच वाजता कधीतरी हलकेच मी जागतो
निद्रा पुनश्च प्रसन्न होईतोवर खिडकीतूनी झाकतो
थंडीची मधुझुळुक देइ काटा हळुवारसा सौम्य हा
तो तर सोबतीस आणी आपुल्या वाफ़ाळलेला चहा
मित्राकडॆ, टपरीवरी, कधी घरी सोडीत नाके धुर
चाखिन मारत दीर्घ दीर्घ भुरके करिता मी भुर्र भुर्र भुर
आईच्या हातचा जसा प्रिय मला प्याला वहिनीच्या तसा
मळकट टपरीवानही देतसे समाधान होईलसा
लाईट, स्ट्रोंग अन कधीतरी करपट आणि धुरकट
प्रियेचा जर हात त्यास लागे म्हणेन मी सुरमट
ताजा पेपर साथीला जर असे वाढेल मग लज्जत
पान्चट चायही देइल खुमार धोनी असेल जिंकत
भेट सेलेब्रिटीची
काव्य
कवींना असते काही वेगळंच पहाण्याची शक्ती
रवीसुद्धा जे न पाही ते पहाण्याची युक्ती
आकाश पांघरुन जग शांत झोपलंय असं त्यांना भासतं
कवींच्या दृष्टीनं आकाश कधी पांघरूण तर कधी समुद्र असतं
चंद्रिकेची बनते नाव, चांदण्या प्रवासी
खरंच हे कवीलोक म्हणजे स्वप्नपूरचे रहिवासी
**
सत्य
माझ्या दृष्टीनं आकाश हे फक्त छत
क्षितिज भिंत
माझा पंधरा वर्षांचा मुलगा हे भविष्य
छोटं बाळ, बायको
मजूरी हेच आयुष्य
**
स्वप्न
मी कधीचा विसरलोय स्वप्नांचं रुप
मुलाच्या डोळ्यांत मात्र पाहिलेत मी खूप
उगीच शान्पट्टी नाय चालायची
भंकस करायची नाय
बोलेतो तुमच्या आणि माझ्यात
लै फरक हाय
मै है बारा वर्षाचा
तुमी तीस, चाळीस, साठीचं असाल
रोज मी सिग्रेटीची पाच पाकिटं सपिवतो
हे ऐकुन काय हसाल
रातच्याला पेग बी घेतो
नशा चढंस्तवर पेतो
निप्चित पडुन -हायल्यावर
मागनं मालक येतो
एक वाजतोय झोपताझोपता
सकाळ माझी हुती चार वाजता
होटेलातली टेबलं खुर्ची लावायची
इडली डोशाची वाटणं वाटायची
दंड अशे भरुन येत्यात राव
भंकस न्हाई करायची
च्यामायला दिवसभर
भजी-वड्याचे तुकडे, खरकटी साफ करायची
कदी कचरा काढताना गि-हाइकाला झाडू लागला तर
त्याचीबी थप्पड खायची
सायेब.....! उगीच शान्पट्टी नाय चालायची
जर्द तो हिरवा रावा
खुणावतो मन-भावा
उडता उडता घाली
साद मनीच्या ठावा
*
एकच कारण त्याचे
मूळ त्याचे माझ्या घरचे
जरी पेरु तिथले खातो
मज मम बागेची स्मृती देतो
*
घेउन डाळ भिजलेली
बाबा त्याला भरवतात
सय त्या घासाची येते
जो भरविती माझ्या मुखात
*
पाटावर बसवून जेंव्हा
आई घालते तया स्नान
माझ्याही बालपणीच्या
बुडगंगेची आठवण
*
तो हिरवा प्यारा रावा
जरी घरी वसतीला दूर
उशीवरचा कशिदा त्याचा
करी आठवणींनी चूर
*
कॊलेज पुरे करण्याला
मी वसतीगृहात रहाते
(चाल: स्वर आले दुरुनी )
सर आले दुरुनी
गेल्या सगळ्या त्या मैतरणी ||
खुर्चीत उसासे साऱ्यांचे
होस्टेलमधील त्या पोरांचे
कुजबुजही नव्हती पोरींची
धुसफुसही नव्हती कोणाची
ऐशा रमलेल्या त्या स्थानी ||
वर्गात मनोरथ किति रचले
गालावर हासू पाघळले
काही हृदयातचि ते घुसले
बाणांतुनी स्पंदन जाणवले
झेली सुंदर मैत्रीण कुणी ||
प्रतिसाद सरांचा तो न कळे
अवसान परी का पूर्ण गळे
संधीच न मिळता पोरांचे
घबराट पुन्हा सर ते दिसले
चहाडी चुगली का केली कुणी ||
कुबडा कुरूप काळा
गाउन गोडसे गीत
मनमंदिरात मुलाच्या
सांडतो सौरभी स्मित
रंगतो रेशीमधागा
उबदार उष्ण उशीत
बापडे बाळ बहकते
ओलावून अंगाईत
मुकी माता मूकाश्रूंनी
भिजविते भुईच्या भाळा
हा हाच हवा हमेशा
कुबडा कुरूप काळा
चमचमत्या स्वप्नांत गढून गेलो
एकच क्षण ऒक्सिजनच्या नळीशी चाचपडलो
आणि चमचमत्या स्वप्नांत गढून गेलो
*
करोडपती होण्याच्या अभिलाषेने
कौन बनेगाच्या पाय-या चढून गेलो
अमिताभजींच्या एकेक सवालाची वाट लावली
पाच कोटीचा सवाल शेवटी आला
काय करू कसे करू करत एका क्षणी अंदाज मारला
तीर निशाण्यावर बरोबर लागला
करेक्ट उत्तर ताडून गेलो
नोटांच्या वर्षावात बुडून गेलो
आणि पुन्हा चमचमत्या स्वप्नांत गढून गेलो
*
विंबल्डनची नशीली हिरवळ
प्रतीस्पर्धी नदाल राफेल
असा केला त्याने खेळ
मला वाटले माझी भरलीच वेळ
पण मीही नव्हतो कम ग्रेट
सर्व्हिस ब्रेक करुन घेतला सेट
घरच्यांची मागणी वाढलीय
सेक्रेटरी, घरच्यांची मागणी वाढलीय
पन्नास लाखांची गरज येउन पडलीय
जी सरकार, मग हुकूम काय!
ऒर्डर काढा आणखी काय
एपीसी मलिकला दाखवा उस्मानाबाद
शर्माला औरंगाबाद
पाटीलला पुणे
पण सरकार, मुंबईत
ते आहेत खुशीत
त्यांना काहीच नाही उणे
म्हणून तर दुस-या गावाची करुन द्या भेट
आणि फेरबदलीसाठी आठ लाखाचा लावा रेट
फेरबदली करताना याला पुणे, त्याला उस्मानाबाद अन त्याला औरंगाबाद
हजर होण्यासाठी काढा व्हीप
चार्ज घेतल्याची करुन घ्या खात्री
मुंबई मागायला परत येतीलच तेव्हा
दहादहा पेटीची लावा कात्री
सरकार, हे चोपन लाख होत्यात