आली तल्लफ चहाची

Submitted by pradyumnasantu on 14 January, 2012 - 17:51

आली तल्लफ चहाची

रात्री दोन-अडीच वाजता कधीतरी हलकेच मी जागतो
निद्रा पुनश्च प्रसन्न होईतोवर खिडकीतूनी झाकतो

थंडीची मधुझुळुक देइ काटा हळुवारसा सौम्य हा
तो तर सोबतीस आणी आपुल्या वाफ़ाळलेला चहा

मित्राकडॆ, टपरीवरी, कधी घरी सोडीत नाके धुर
चाखिन मारत दीर्घ दीर्घ भुरके करिता मी भुर्र भुर्र भुर

आईच्या हातचा जसा प्रिय मला प्याला वहिनीच्या तसा
मळकट टपरीवानही देतसे समाधान होईलसा

लाईट, स्ट्रोंग अन कधीतरी करपट आणि धुरकट
प्रियेचा जर हात त्यास लागे म्हणेन मी सुरमट

ताजा पेपर साथीला जर असे वाढेल मग लज्जत
पान्चट चायही देइल खुमार धोनी असेल जिंकत

दुर्दैवे आज मम घरी कोणीही नाही पहा
वाजुन चार निघाले, मज हवा गरमागरम कप चहा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ते सगळं ठीक आहे हो. पण आज धोनी महाराजानी तिसरा झक्कू घेतला तेव्हा सकाळच्या चहाचा घोट नरडीचा घोट घेतोयसं वाटलं.

चहा

चहा मनापासून आवडत नाही त्यामुळे तल्लफ काय असते ते माहीत नाही. कविता त्यामुळे एन्जॉय करू शकले नाही.