हाच हवा हमेशा, कुबडा कुरूप काळा

Submitted by pradyumnasantu on 31 December, 2011 - 17:04

कुबडा कुरूप काळा
गाउन गोडसे गीत
मनमंदिरात मुलाच्या
सांडतो सौरभी स्मित

रंगतो रेशीमधागा
उबदार उष्ण उशीत
बापडे बाळ बहकते
ओलावून अंगाईत

मुकी माता मूकाश्रूंनी
भिजविते भुईच्या भाळा
हा हाच हवा हमेशा
कुबडा कुरूप काळा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी स्वतः मुकी पण माझ्या बाळासाठी गोड गीत गाणारा माझा पती कुरुप असला तरी जमोजन्मी मला लाभावा असे म्हणणारी स्त्री माता की पत्नी!!!
विभाग्रजजी, आभार, व नुतन वर्षासाठी शुभेच्छा!!!