Submitted by pradyumnasantu on 5 January, 2012 - 11:52
जर्द तो हिरवा रावा
खुणावतो मन-भावा
उडता उडता घाली
साद मनीच्या ठावा
*
एकच कारण त्याचे
मूळ त्याचे माझ्या घरचे
जरी पेरु तिथले खातो
मज मम बागेची स्मृती देतो
*
घेउन डाळ भिजलेली
बाबा त्याला भरवतात
सय त्या घासाची येते
जो भरविती माझ्या मुखात
*
पाटावर बसवून जेंव्हा
आई घालते तया स्नान
माझ्याही बालपणीच्या
बुडगंगेची आठवण
*
तो हिरवा प्यारा रावा
जरी घरी वसतीला दूर
उशीवरचा कशिदा त्याचा
करी आठवणींनी चूर
*
कॊलेज पुरे करण्याला
मी वसतीगृहात रहाते
आई-बाबांना आठवता
राव्यात घुसमटून रडते
*
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मनभावन काव्य
मनभावन काव्य
तो हिरवा प्यारा रावा जरी घरी
तो हिरवा प्यारा रावा
जरी घरी वसतीला दूर
उशीवरचा कशिदा त्याचा
आणी आठवणींना पूर>>>>>सुंदर आठवण.
सुंदर कविता.......
सुंदर कविता.......
पाषाणभेद, विभाग्रज, दिपक आपले
पाषाणभेद, विभाग्रज, दिपक आपले प्रतिसाद ही तर एक सुंदर साठवण. आभार.
घुसमट छान व्यक्त झाली आहे.
घुसमट छान व्यक्त झाली आहे.
हळवा मुड आहे आज,प्रत्येक
हळवा मुड आहे आज,प्रत्येक कडव्यातुन ते जाणवतं.(अगदी उत्कटपणे ,अंतःकरणातुन आलेली कविता.)