हॉस्टेलमधील पक्षी

Submitted by pradyumnasantu on 5 January, 2012 - 11:52

जर्द तो हिरवा रावा
खुणावतो मन-भावा
उडता उडता घाली
साद मनीच्या ठावा
*
एकच कारण त्याचे
मूळ त्याचे माझ्या घरचे
जरी पेरु तिथले खातो
मज मम बागेची स्मृती देतो
*
घेउन डाळ भिजलेली
बाबा त्याला भरवतात
सय त्या घासाची येते
जो भरविती माझ्या मुखात
*
पाटावर बसवून जेंव्हा
आई घालते तया स्नान
माझ्याही बालपणीच्या
बुडगंगेची आठवण
*
तो हिरवा प्यारा रावा
जरी घरी वसतीला दूर
उशीवरचा कशिदा त्याचा
करी आठवणींनी चूर
*
कॊलेज पुरे करण्याला
मी वसतीगृहात रहाते
आई-बाबांना आठवता
राव्यात घुसमटून रडते
*

गुलमोहर: 
शब्दखुणा: