Submitted by pradyumnasantu on 16 January, 2012 - 17:14
तर तू खरा
चारचौघांत असशील
गप्पा होत असतील
माझ्या आठवणी येतील
कुणालाही नकळत
पापण्या ओलावून जातील
...तर त्यात काय
पाऊस बरसत असेल
मन तरसत असेल
तसाच बाहेर जाउन
खड्ड्यातल्या लाल पाण्यात
माझीच छबी पहाशील
...तर त्यात काय
नणंद-जाऊ सासुबाई
मेव्हणे आणि दीर
सोबत सारे असून
एकाकी तू होशील
मला शोधत हिंडशील
...तर त्यात काय
ऒफिसात, बाजारात
लोकलच्या धडधडाटात
टीव्हीच्या कोलाहलात
जिथे जिथे आवाज तिथे
माझा स्वर धुंडशील
...तर त्यात काय
पण जेव्हा आपला बाळ
हिरमुसलेला असेल
आईच्या विरहात
व्याकूळसा दिसेल
मूक रूदन करत
कोप-यात जाउन बसेल
त्याक्षणी जर तू
त्याला हसवशील
माझ्या आठवणींमधून
मुक्त करशील
गंमतजंमत करून
फिरायलाही नेशील
’मी तुझे बाबा
मीच तुझी आई’
असे वागशील
...माझ्या प्रियकरा
...तर तू खरा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आईच्या विरहात व्याकूळलेल
आईच्या विरहात
व्याकूळलेल बाळ>>>या कल्पनेवर लिहिलेली कविता,पण अशी परिस्तिथी कुठल्याही बाळावर येऊ नये.
विभाग्रजजी: आपल्याप्रमाणेच
विभाग्रजजी:
आपल्याप्रमाणेच कवीलाही वाटते. मात्र ही कविता जितकी एखाद्या व्याकुळलेल्या बाळाची आहे, तितकीच त्याचे महत्व सांगणा-या आईची आहे आणि अशा परिस्थितीत सापडलेल्या वडिलांचीही आहे.
छान कविता....आवडली
छान कविता....आवडली
दिपकजी: आपण नेहमीच कौतुक
दिपकजी: आपण नेहमीच कौतुक करता, उत्तेजन देता. अत्यत आभारी आहे.
’मीच तुझे बाबा मीच तुझी
’मीच तुझे बाबा
मीच तुझी आई’
असे वागशील
...माझ्या प्रियकरा
...तर तू खरा >>>> इथे कवितेचं सारं सार आहे.... छान
खुप आवडली.. !!!
खुप आवडली.. !!!
माय गॉड ! प्रद्युम्न, फार
माय गॉड ! प्रद्युम्न, फार मोठी झेप आहे तुमची या कवितांच्या विश्वात. उण्यापुर्या तीन एक महिन्यांपूर्वी सुरुवात करून तुम्ही इतके विषय आणि तेही इतक्या स॑मर्थपणे कवितांमधे मांडलेत ते तुमच्या निरिक्षणशक्तीचे आणि त्या त्या भावनांमधे स्वतःला पूर्णपणे इन्वॉल्व्ह करण्याच्या एबिलिटीचे निदर्शक आहेत. वरचं शेवटचं कडवं तर तुम्ही नुकत्याच प्रकाशित केलेल्या 'मास्टरपीस' कवितेप्रमाणे मास्टरपीस आहे. असेच खूप खूप लिहा. शुभेच्छा.
फारच अर्थपूर्ण संवेदनाक्षम...
फारच अर्थपूर्ण संवेदनाक्षम... आवडली..
अप्रतीम मांडणी... कविता खूप
अप्रतीम मांडणी... कविता खूप आवडली.
मस्त
मस्त
आई-बाबांचे मर्म सांगणारी
आई-बाबांचे मर्म सांगणारी सुंदर रचना.... खूप हृदयस्पर्शी......
आवडली कविता,खुप खुप आवडली
आवडली कविता,खुप खुप आवडली .(तुमच्या कवितेत नेहमिच एक साधेपणा, निष्पापपणा असतो तोच आवडतो )
तुमच्या सगळ्या कवितेत तुमचं
तुमच्या सगळ्या कवितेत तुमचं संवेदनशील मन जाणवते. कारण दुसर्यांच्या दु:खाशी समरस झाल्याशिवाय अशा भावना व्यक्त करता येत नाहीत. बाळ,आई आणि बाबा सगळ्यांच्या भावना खूप छान मांडल्या आहेत.
उल्हासजी: धन्यवाद्.कवितेचे
उल्हासजी: धन्यवाद्.कवितेचे सार चोख ओळखलेत
असल्याच अर्थाची एक दुसरी
असल्याच अर्थाची एक दुसरी कविता तुमचीच आहे ना? ती स्त्री फोटोमध्ये असते, ती बोलते वैगेरे?
पाषाणभेदजी: तो मी नव्हेच
पाषाणभेदजी: तो मी नव्हेच
.. वेगळा अविष्कार... आवडला
.. वेगळा अविष्कार... आवडला
फार उत्तम पद्धतीने इथे तुम्ही
फार उत्तम पद्धतीने इथे तुम्ही कल्पना मांडली आहे. कवितेमधील कारुण्य ओळींपेक्षा त्यातल्या भावाने पोहोचणे हे अतिशय अवघड असते आणि इथे तुम्ही अतिशय सहजपणे करून दाखवले आहे....... खूपच आवडली.