कविता

प्रलय

Submitted by pradyumnasantu on 7 November, 2011 - 13:54

प्रलय

सध्याच्या काळात कवींची आलीय सुनामी

प्रेमकवितांचा होतोय प्रलय

छापून त्या येतातच जरी

नष्ट होत चाललाय आशय

अलंकारांची नाही धमक

विलयास कधीचेच गेले यमक

इथेतिथे सडत पडलेल्या

शिळ्या उपमांचे हेच गमक

ओळखीला वर्षे लोटली

भेटीही झाल्या शेकडा

पण प्रेम व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत

म्हणतोय कवी फाकडा

प्रेयसीला आणलेला शुभ्र गजरा

तसाच गेला सुकून

तिचा केस न केस झाला पांढरा

चान्स कवीचा गेला हुकून

मी विचारणार तुला

कोणी कवी केले रे गाढवा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाहिले तर...

Submitted by samurai on 26 October, 2011 - 07:09

पाहिले तर मजकडे सगळेच आहे ,
फक्त हाती माझिया तव हात नाही

हाय इथल्या या निसर्गाला कुणाची ,
की उरी उरलीच कुठली वाट नाही

केव्हढे भरतीस फेसाळून आले ,
पण किनारी ओढणारी लाट नाही

दूर चाफ्याचे मनोहर झाड आहे ,
फुलूनही त्याचे सुकेपण जात नाही

ती फुक्या काही क्षणांची साथ नव्हती ,
काहुनी कळली तुला ही बात नाही

आसमंती बघ खुणा पुसल्या कधीच्या ,
गोठली चंद्रात पुरती रात नाही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आली आली हो दिवाळी-

Submitted by विदेश on 22 October, 2011 - 22:40

आली आली हो दिवाळी
ही रांगोळी सांगे दारी
स्वागतास सज्ज राहू
प्रकाशात घरोघरी !

सुसंवादी भेटीत त्या
काव्य शास्त्र विनोदाच्या -
एकमेकांना देऊ या
शुभकामना मनीच्या !

करू विना आवाजाने
छान दिवाळी साजरी ,
ठेवू प्रदूषणमुक्त
वसुंधरा ही गोजिरी !

गोडधोड चवदार
खमंगशा फराळात-
भूक गोरगरीबांची
नित्य घेऊया ध्यानांत !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निशा काळे

Submitted by pradyumnasantu on 21 October, 2011 - 18:04

तू माझी निशा
अंगात एकशेदोन ताप होता
तरीही उन्हात भटकणारा
तो एक बाप होता
बायकोनं सोडलेलं.....
घर असं मोडलेलं
पदरात शाळा शिकत्यालं पोर
आनि वय वाढत्याली प्वार
पन काळीज आनि हिम्मत डोंगरावाणी
आत्ता समोर होती त्याची लाडकी काळू राणी
तिला लाडानं म्हणायचा तो काली माया
तिची तुकतुकीत काळीशार काया
खुणाऊन करू लागली इशारा
तवा उंचावून भुवया म्हणाला म्हातारा
आता वाजले की बारा
मला जाऊदे गं घरा
ह्यो धंदा न्हाई बरा
त्यो बग अग्निपतच्या पोस्टरवर नारळगाडीवाला मिथुन
निघालाय नीलमकडं नटून
आन माज्या नशिबी तू निशा काळे
भर उन्हात करतेस चाळे
कसलं गं ते तुझ्या चेह-यावरचं जंजाळ

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जीवनाचे गाणे !

Submitted by विदेश on 20 October, 2011 - 10:53

पूर्व जन्मी पुण्य गाठी
चालू जन्मी पाप पाठी

गॅस नाही हो मिळत
घास नाही तो गिळत

पेट्रोलचा किती जाळ
रॉकेलचाही दुष्काळ

रेशनला रांग मोठी
माल संपल्याची पाटी

दिसे भांग तुळशीत
असे माल भेसळीत

म्हणे पापभीरू मन
हवे पांढरेच धन

नको लाचलुचपती
नको भ्रष्ट उचापती

नेकीनेच चालू रस्ता
खात खात खूप खस्ता

एका डोळयात ते हासू
दुजा डोळ्यात ये आसू

महागाईची अंगाई
रोज सरकार गाई

दरबारी झोप जडे
डोळे आमचे उघडे

असे कष्टातले जिणे
बने जीवनाचे गाणे !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.....धुंद.....

Submitted by अन्नू on 17 October, 2011 - 08:31

rose image.jpg

इतकी जवळ येऊ नकोस कि माझी सवयच होऊन जाईल,
पाहू नकोस अशी कि प्रेम होऊन जाईल;
तुझ्या या भावनांना तू मनामध्येच राहू दे, नाहीतर-
ओठांच्या या गर्म श्वासांना पुन्हा एक बहाणा मिळून जाईल.........

-तुझी एक गोड आठवण.

काही कविता अशाही असतात

Submitted by अनुराधा सोनम on 11 October, 2011 - 02:44

काही कविता अशाही असतात
उमजूनही त्या लिहायच्या नसतात
उगीचच शब्दात पकडायच्या नसतात
सात सुरांत गायच्या नसतात.

काही कविता अशाही असतात
शाई बरोबर वाळवायच्या असतात
कुणालाही दाखवायच्या नसतात
मनाच्या कोपर्यात ठेवायच्या असतात

काही कविता अशाही असतात
आपल्यालाच उगाच भोवतात
जणू पिंगा घालत राहतात
भवताली फिरत राहतात

काही कविता अशाही असतात
नुसतीच एक लय असते
तिला शब्दांची सयचं नसते
काही कविता अशाही असतात
-- 'अनुराधा ' सोनम

गुलमोहर: 

तुझी भेट व्हावी असे वाटले

Submitted by क्रांति on 17 September, 2011 - 10:29

तुझी भेट व्हावी असे वाटले अन् तुझ्या आठवांचे थवे हासले
पिसारे किती सप्तरंगी क्षणांचे मनाच्या रित्या अंगणी नाचले!

तुझी भेट व्हावी असे वाटले, मी तुझी वाट शोधीत आले खरी,
न वारा तुझा की न चाहूल आली तुझी, फक्त डोळ्यांत आल्या सरी!

तुझी भेट व्हावी असे वाटले तोच आला तुझ्या वेणुचा नाद रे
खरा तो असे की असे भास? काही कळेना मला, घाल तू साद रे

तुझी भेट व्हावी असे वाटले त्या क्षणी भेट झालीच नाही कधी,
किती वाट पाहू इथे एकटी मी? तुझा अंत ना पार लागे कधी

तुझी भेट व्हावी असे वाटले की मनाच्या तळाशी जरा वाकते,
तुला पाहते, बोलते मी तुझ्याशी, क्षणी चोरकप्पा पुन्हा झाकते!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पुणेरी हायकू -

Submitted by विदेश on 2 September, 2011 - 05:20

रस्ते डांबरी
जाहिरात सामोरी...
... गाडी खड्ड्यात !

लाल सिग्नल
वाहतूक सुसाट -
मोक्षाची वाट !

एक ते चार
दुकानदारी गार

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता