Submitted by samurai on 26 October, 2011 - 07:09
पाहिले तर मजकडे सगळेच आहे ,
फक्त हाती माझिया तव हात नाही
हाय इथल्या या निसर्गाला कुणाची ,
की उरी उरलीच कुठली वाट नाही
केव्हढे भरतीस फेसाळून आले ,
पण किनारी ओढणारी लाट नाही
दूर चाफ्याचे मनोहर झाड आहे ,
फुलूनही त्याचे सुकेपण जात नाही
ती फुक्या काही क्षणांची साथ नव्हती ,
काहुनी कळली तुला ही बात नाही
आसमंती बघ खुणा पुसल्या कधीच्या ,
गोठली चंद्रात पुरती रात नाही
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कविता थोडीफार गझलसदृश
कविता थोडीफार गझलसदृश वाटली.
ही द्वीपदी अधिक आवडली.
“केव्हढे भरतीस फेसाळून आले ,
पण किनारी ओढणारी लाट नाही”
तस् पाहिल तर कविता झक्कास
तस् पाहिल तर कविता झक्कास जमल्ये...
फक्त हाती माझिया तव हात नाही....क्या बात है ..
>> फुलूनही त्याचे सुकेपण जात
>> फुलूनही त्याचे सुकेपण जात नाही
व्वा!
सुंदर्!खुप आवडली!शुभ दीपावली!
सुंदर्!खुप आवडली!शुभ दीपावली!
झाड +१
झाड +१