काही कविता अशाही असतात

Submitted by अनुराधा सोनम on 11 October, 2011 - 02:44

काही कविता अशाही असतात
उमजूनही त्या लिहायच्या नसतात
उगीचच शब्दात पकडायच्या नसतात
सात सुरांत गायच्या नसतात.

काही कविता अशाही असतात
शाई बरोबर वाळवायच्या असतात
कुणालाही दाखवायच्या नसतात
मनाच्या कोपर्यात ठेवायच्या असतात

काही कविता अशाही असतात
आपल्यालाच उगाच भोवतात
जणू पिंगा घालत राहतात
भवताली फिरत राहतात

काही कविता अशाही असतात
नुसतीच एक लय असते
तिला शब्दांची सयचं नसते
काही कविता अशाही असतात
-- 'अनुराधा ' सोनम

गुलमोहर: 

काही कविता अशाही असतात
उमजूनही त्या लिहायच्या नसतात
उगीचच शब्दात पकडायच्या नसतात
सात सुरांत गायच्या नसतात.<<<<< मस्त Happy