पुणेरी हायकू -

Submitted by विदेश on 2 September, 2011 - 05:20

रस्ते डांबरी
जाहिरात सामोरी...
... गाडी खड्ड्यात !

लाल सिग्नल
वाहतूक सुसाट -
मोक्षाची वाट !

एक ते चार
दुकानदारी गार
- बाणा मराठी !

देव आमचा
बगीचा शेजाऱ्याचा
... त्रस्त कुंपण

सख्खे शेजारी
' केरा ' तून वैरात -
' खांदा ' वांध्यात !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सही.

छानच!:)