जीवनाचे गाणे !

Submitted by विदेश on 20 October, 2011 - 10:53

पूर्व जन्मी पुण्य गाठी
चालू जन्मी पाप पाठी

गॅस नाही हो मिळत
घास नाही तो गिळत

पेट्रोलचा किती जाळ
रॉकेलचाही दुष्काळ

रेशनला रांग मोठी
माल संपल्याची पाटी

दिसे भांग तुळशीत
असे माल भेसळीत

म्हणे पापभीरू मन
हवे पांढरेच धन

नको लाचलुचपती
नको भ्रष्ट उचापती

नेकीनेच चालू रस्ता
खात खात खूप खस्ता

एका डोळयात ते हासू
दुजा डोळ्यात ये आसू

महागाईची अंगाई
रोज सरकार गाई

दरबारी झोप जडे
डोळे आमचे उघडे

असे कष्टातले जिणे
बने जीवनाचे गाणे !

गुलमोहर: 
शब्दखुणा: