चमचमत्या स्वप्नांत गढून गेलो

Submitted by pradyumnasantu on 30 December, 2011 - 14:58

चमचमत्या स्वप्नांत गढून गेलो

एकच क्षण ऒक्सिजनच्या नळीशी चाचपडलो
आणि चमचमत्या स्वप्नांत गढून गेलो
*
करोडपती होण्याच्या अभिलाषेने
कौन बनेगाच्या पाय-या चढून गेलो
अमिताभजींच्या एकेक सवालाची वाट लावली
पाच कोटीचा सवाल शेवटी आला
काय करू कसे करू करत एका क्षणी अंदाज मारला
तीर निशाण्यावर बरोबर लागला
करेक्ट उत्तर ताडून गेलो
नोटांच्या वर्षावात बुडून गेलो
आणि पुन्हा चमचमत्या स्वप्नांत गढून गेलो
*
विंबल्डनची नशीली हिरवळ
प्रतीस्पर्धी नदाल राफेल
असा केला त्याने खेळ
मला वाटले माझी भरलीच वेळ
पण मीही नव्हतो कम ग्रेट
सर्व्हिस ब्रेक करुन घेतला सेट
राफा बॆग भरून पळाला
आणि मी सतराव्यांदा ग्रॆंड-स्लॆम चषक उंचावला
हजारो लोकांच्या साक्षीने
फेडररचे रेकॊर्डसुध्दा मोडून गेलो
पुन्हा चमचमत्या स्वप्नांत गढून गेलो
*
रेसच्या मैदानात
मी धावतोय पी.टी. उषाच्या जोडीत
कधी ती पुढे, कधी मी
पाठीवर पडणार का शाबासकीची थाप?
आणि........
अचानक मला लागते धाप
श्वास घ्यायला होतो ताप
ऒक्सिजनच्या नळीशी चाचपडतो
नळी सापडत नाही, घुसमटतो
करोडोंच्या नोटांत गुदमरतो
टेनिसच्या ट्रॊफींत अडखळतो
बिछान्यावरच उन्मळतो
मित्रांनो मी घाबरुन गेलो
पुरता भेलकांडून गेलो
चमचमती स्वप्नं चुरमडून गेलो
अनोळखी पाय-या चढून गेलो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मीही कविता वाचून गेलो.
आवडल्याचा प्रतिसाद टाकून गेलो.