Submitted by pradyumnasantu on 29 December, 2011 - 20:59
घरच्यांची मागणी वाढलीय
सेक्रेटरी, घरच्यांची मागणी वाढलीय
पन्नास लाखांची गरज येउन पडलीय
जी सरकार, मग हुकूम काय!
ऒर्डर काढा आणखी काय
एपीसी मलिकला दाखवा उस्मानाबाद
शर्माला औरंगाबाद
पाटीलला पुणे
पण सरकार, मुंबईत
ते आहेत खुशीत
त्यांना काहीच नाही उणे
म्हणून तर दुस-या गावाची करुन द्या भेट
आणि फेरबदलीसाठी आठ लाखाचा लावा रेट
फेरबदली करताना याला पुणे, त्याला उस्मानाबाद अन त्याला औरंगाबाद
हजर होण्यासाठी काढा व्हीप
चार्ज घेतल्याची करुन घ्या खात्री
मुंबई मागायला परत येतीलच तेव्हा
दहादहा पेटीची लावा कात्री
सरकार, हे चोपन लाख होत्यात
पन्नास मला द्या, चार भरा तुमच्या खात्यात
जी सरकार आता या कामाचाच नंबर पहिला
आपण लंचला जाण्याच्या आत ऒर्डर आणतो सहीला
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ब्येस्ट. आमचं काम व्हनार का?
ब्येस्ट. आमचं काम व्हनार का? .... किती?.....जरा कमी हुतील का?.....न्हाई? .... बरं मग कुटं?..... कसं?
आजची शोकांतिका.
आजची शोकांतिका.
एम. कर्णिकः आभार. आपली
एम. कर्णिकः आभार. आपली एन्॑क्वायरी पोचली. नम्रपणे कळवू इच्छीतो की ही खास देसी पध्दत आहे. दुबईत लागू होत नाही.
विभाग्रजः आभार.
विभाग्रजः आभार.
अरे बापरे, आठ लाख, म्हणजे
अरे बापरे, आठ लाख, म्हणजे आरटीओ इन्सपेक्टर, झेडपी सीईओ, किंवा डेप्युटी कलेक्टरची पोष्ट दिसतेय.
पुर्वी एमपीएस्सी फिमीयस्सी ने वरल्या पोस्ट भरल्या जात नसत त्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं नाही पण प्रमाण कमी नक्की होते अन कामे करणारे लोकं पण होती. आता आता असल्या परिक्षा पास होवून सरकारी लोकं केवळ कमवायसाठीच असल्या जागांवर जातात हे सत्य आहे. वेतनाअयोग १०० वा जरी आला तरी पैसे कमी अन काम कमी असलीच स्थिती राहील.
पाषाणभेद आभार
पाषाणभेद आभार
वास्तव.(च्या मारी
वास्तव.(च्या मारी शेक्रेट्री,पलॅन दोगांतुरच व्हता,भाईर कसा घरंगाळला)