घमघमत्या संध्याकाळी निशीगंध उमलला होता
बागेत झुकून क्षणी एका म्हटलास, "लग्न करशील का?"
बोलले न काही तेव्हा पण आता सांगू पाहे
त्या महागहन प्रश्नावर मी विचार करते आहे
अध्यापन माझे काम, दर साल परीक्षा घेते
पण या तुझिया प्रश्नाचे उत्तर मज अवघड वाटे
करी प्रयत्न पारखणीचा, हर मुद्दा परखुन पाहे
त्या महागहन प्रश्नावर मी विचार करते आहे
एकदा पाहिले तुजला घालता कुणाशी वाद
मुळी ऐकवला मज नाही तो शिव्याभरा संवाद
मुखी तुझ्या का बरे सांग अशी गटारगंगा वाहे ?
या महागहन प्रश्नावर मी विचार करते आहे
एकदा आपण दोघेही मज साडी घेण्या गेलो
पंचवीस रुपयांसाठी भांडलास परत मग आलो
कंजूषपणाची तुझिया मज घृणा येउनी राहे
त्या प्रश्नावर म्हणुनच तर मी विचार करते आहे
मी अशिच एकदा तुझिया फोटो-अल्बमवर गेले
पोर्नोग्राफीची चित्रे पाहून चकित मन झाले
अशी विकृत का आवड रे मनि तुझ्या विहरते आहे?
या महागहन प्रश्नावर मी विचार करते आहे
मी आले जवळ मुद्द्याच्या, प्रश्नाचे उत्तर घेउन
सांगेन कठोरपणाने मी फूल तुला एक देउन
परी पुनर्तपासून उत्तर वाटही मी पाहू चाहे
अजुनही तुझ्या प्रश्नावर मी विचार करते आहे
त्या ओल्या सायंकाळी म्हातारी केविलवाणी
उभि होती दीनपणाने, "द्या भाकर मजला कोणी"
नखशिखांत भिजलेली ती कुडकुडत थरथरत होती
जर देव कुणी ना मिळता यमराजाला बळि जाती
पाहून भुकेल्या तिजला धरुनी कर तू घरि नेले
शुश्रूषा स्वच्छता करुनी नव वसन छान नेसवले
भरपेट अन्न भरवून तू निरोप दिधला तिजला
तुज अनुत्तीर्ण करण्याचा इरादाच माझा थिजला
घमघमलि परत एक शाम, निशिगंध पुन्हा दरवळले
घेउन तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तेथे आले
मज पाहून आनंदाने
वदलास "च्यायला भवाने"
झणी बंद तोंड तव केले मी आनंदाने फार
वदले "या लग्नाला मी केव्हाही आहे तैय्यार"
(अध्यापक मी जातीची मुळी चूक न कधी करणार)
ह्म्म ..... अध्यापिकेने
ह्म्म ..... अध्यापिकेने अखेरीस माणसाताला माणूस ओळखला ... छान
उल्हासजी: प्रतिसादाबद्दल
उल्हासजी: प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.
फारच छान
फारच छान
पाषाणभेदजी, अभिवादन.
पाषाणभेदजी, अभिवादन.
"च्यायला भवाने">>>?
"च्यायला भवाने">>>?
अध्यापिकेने अखेरीस माणसाताला माणूस ओळखला+१.
आवडली.
उल्हासजीना अनुमोदन.
उल्हासजीना अनुमोदन.
उल्हासदांना अनुमोदन. छान
उल्हासदांना अनुमोदन. छान कविता.
विविध छटांचा सुंदर
विविध छटांचा सुंदर अविष्कार...
विभाग्रज, फालकोर आभार
विभाग्रज, फालकोर आभार
आवडली...खुप छान
आवडली...खुप छान
सुंदर कविता. लयबद्ध आणि गेय
सुंदर कविता. लयबद्ध आणि गेय देखील.
अध्यापिकेला इतका विचार करायला त्याने वेळ दिला आणि तो वाट बघत राहिला. "च्यायला भवाने, गेलीस उडत" असे म्हणाला नाही इथवरच त्याला पासिंगपुरते (३५/१००) मार्क्स द्यायला हरकत नव्हती. नंतरचे अर्थातच फर्स्ट क्लासचे मार्क्स.
कविता "पास्ड विथ डिस्टिंक्शन" !
दिपक, एम. कर्णिक मनःपूर्वक
दिपक, एम. कर्णिक मनःपूर्वक आभार
अतिशय सुंदर मैफील भरलीये
अतिशय सुंदर मैफील भरलीये इथे. कवी तर वस्ताद आहेतच पण श्रोते देखील नेमके दर्दी तेच जमलेत. अशा दर्दींच्या सभेत मी काय बोलू ? कविता आवडली इतकंच
किरणजी आपणतर दर्दीयोंके दर्दी
किरणजी आपणतर दर्दीयोंके दर्दी आहात.
अत्यंत आभारी आहे.
मस्त.
मस्त.
विजयराव: आपल्याकडून कौतुक
विजयराव: आपल्याकडून कौतुक होणे सद्भाग्याचे वाटते.
मस्त, आवडली
मस्त, आवडली
छान कविता आहे ! आवडली !
छान कविता आहे ! आवडली !
हम्म...शितावरून भाताची
हम्म...शितावरून भाताची परीक्षा केली तर! बाकीच्या अनुत्तीर्ण झालेल्या पेपर्समधे पण हळुहळू उत्तीर्ण होतीलच विद्यार्थीमहाशय अशा अध्यापिकेमुळे! (आणि ते होणेही आवश्यक आहे)
छान कविता.