उगीच शान्पट्टी नाय चालायची
भंकस करायची नाय
बोलेतो तुमच्या आणि माझ्यात
लै फरक हाय
मै है बारा वर्षाचा
तुमी तीस, चाळीस, साठीचं असाल
रोज मी सिग्रेटीची पाच पाकिटं सपिवतो
हे ऐकुन काय हसाल
रातच्याला पेग बी घेतो
नशा चढंस्तवर पेतो
निप्चित पडुन -हायल्यावर
मागनं मालक येतो
एक वाजतोय झोपताझोपता
सकाळ माझी हुती चार वाजता
होटेलातली टेबलं खुर्ची लावायची
इडली डोशाची वाटणं वाटायची
दंड अशे भरुन येत्यात राव
भंकस न्हाई करायची
च्यामायला दिवसभर
भजी-वड्याचे तुकडे, खरकटी साफ करायची
कदी कचरा काढताना गि-हाइकाला झाडू लागला तर
त्याचीबी थप्पड खायची
सायेब.....! उगीच शान्पट्टी नाय चालायची
तुमी.... आज येताय राव डोसा खायला
फॆमिलीरूममधी बसून मॆडमचा गालगुच्चा घ्यायला
"शिकत का न्हाईस र" इचारुन फुकाचा ग्रेटनेस तुमी दावणार
तिकडून सरकार अल्पवय कामगार करत चुना लावणार
आमचा मालक तरी बरा रं तुमच्यापरास
दिवस-रात काम करुन घेतो तरी
मनीऒर्डर तरी पाठवतो घरास
सायेब.. ही कामं न्हाईत खायची
म्हनून इचारतो
काय करनार तुमी आमच्यासारख्यांसाठी?
न्हाई न्हवं, मग गप भजी खायची
आन, घरची वाट धरायची
पायजेल तर मी देतो बिल, पर फुकट भंकस नाय करायची
फारच विदारक सत्य. बालमजुरी
फारच विदारक सत्य. बालमजुरी कुणासाठी गरजेचीही असते.
फारच विदारक सत्य. बालमजुरी
फारच विदारक सत्य. बालमजुरी कुणासाठी गरजेचीही असते.+१.
जळजळीत वास्तव - सुन्न
जळजळीत वास्तव - सुन्न करणारे.........
कवितेची मांडणी उत्तमच, जबरदस्त.......
कविता आवडली. बालमजुरी
कविता आवडली.
बालमजुरी कुणासाठी गरजेचीही असते.+१+१
पाषाणभेद, विभाग्रज, शशांक,
पाषाणभेद, विभाग्रज, शशांक, दिपकः कृतज्ञ आहे.
सुंदर कविता
सुंदर कविता
आवडली
आवडली
खरंय. आपण काय करतो अशांसाठी?
खरंय. आपण काय करतो अशांसाठी? फक्त भंकस ! केवळ मोठ्या हॉटेलात टिप देतो. टपरीवर किंवा एस्. टी. स्टँडवरच्या हॉटेलात नाही देत. डोळे उघडवणारी कविता आहे तुमची प्रद्युम्न.
छान कविता. आवडली. बालमजुरी
छान कविता. आवडली.
बालमजुरी कुणासाठी गरजेचीही असते.+१+१