जाईचे फूल

Submitted by संजय पठाडे on 30 November, 2011 - 22:18

हसरे चांदणे
नभातून सांडले
जाईच्या फुलात
गंध ओले ओले

शुभ्र-शुभ्र फुले
चांदण्यात नहाली
जाईची काया
टंच भरलेली

फुलांची कांती
ओठ स्पर्शू गेले
ह्रदयात काहूर
अंग शहारलेले

शरदाच्या चांदण्यात
जाईचे मोहरणे
तुझ्या-माझ्या मनात
प्रितीचे बहरणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा एकदम मस्त
फक्त फुलाची कांती ओठ हुंगण्या गेले >>>> या जागी >>> फुलाची कांती ओठ स्पर्शण्या गेले >>>> हे बघा योग्य वाटतेय का ???