मायबोलीने मनाची एक ख्नन्त दुर केली
अनेक वर्षे संगणक क्षेत्रात काम केले तरी मराठी पाने आंतर्जालावर (अजून सगळे मराठी प्रतीशब्द माहित नाहीत). वाचली नव्हती. सध्या ती वाचायचा योग आला, आणि नंतर गेले २ महिने फार खन्त वाटत होती. (शुध्द-अशुद्ध नव्हे, पण विचित्र मराठी वाचून). नुसते साधे मराठी वाचण्याची तळमळ लागली होती.
आज सुदैवाने मायबोलीची ओळख झाली. अजून सगळे वाचले नाही, पण खूप वाचले. कल्पना नव्हती की नवीन पिढी इतक्या दमाचे मराठी लिहू शकते. कविता, विनोद, कथा, अनुवाद (शेरलॉक होम्स) आणि इतर सदरे (Comments ना काय म्हणतात? शेरा? प्रतिसाद?).