Submitted by SuhasPhanse on 15 July, 2012 - 04:55
पडू द्या सरिवर सरी
(चालीसाठी शिर्षकावर क्लिक करा.)
वीज कन्यका तळपत पाहुनी,
मेघ गर्जना करी ।
पडू द्या सरिवर सरी हो सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥धृ॥
आकाशाशी नाते जोडी धरतीशी हो सरी,
पर्जन्याच्या सरी ।
पर्जन्याचे तांडव मांडी कृष्णमेघ अंबरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥१॥
घेऊनी तांडा मेघांचा हो आला शिरावरी,
भरुनी पाण्याच्या घागरी
सह्याद्रीचा कृष्ण अडवितो, धो धो पडती सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥२॥
गुलमोहर:
शेअर करा
छान गीत.
छान गीत.
आकाशाचे नाते जोडति धरतीशी हो
आकाशाचे नाते जोडति धरतीशी हो सरी,...........
......वाचताना असे केल्यावर अर्थ लागला
सह्याद्रीचा कृष्ण अडवितो, >>>>>>>बेहद सुन्दर !! व्वा व्वा !!
हेडफोन नसल्याने चाल ऐकू शकलो नाही क्षमस्व!!