बालगीत
बाळ आणि चिऊताई
बाळाची आई
थुळु थुळु पापा
थुळु थुळु पापा
चला चला चला आंबो करायाला
थुळु थुळु पापा बाळ खुदकला
थपा थपा थपा पापा खेळायाला
फुगे छोटे मोठे चला धरायाला
उन उन पापा कसा आवडला
खेळतच र्हावे वाटे माझ्या बाळा
भुडुश्शा आवडे माझ्या सोनुल्याला
पण नको वाटे डोके ओले त्याला
पापण्या या हळू मिटू का लागल्या
चला गुडुप्गाई आता करायाला ...
गुरगुट्या भातु....
गुरगुट्या भातु....
गर्रम गर्रम
गुरगुट्या भातु
त्यावर थोडी
आमटीऽ ओतू
लोणकढं तूप
पहा तुम्चं रुप
लोणच्याचा खार
जिभलुला धार
खातंय कोण मुटुमुटु
पाऽर सगळं चाटु पुसु
डोळे आता मिटुमिटु
खेळु नंतर लुटुपुटु ....
' बुढ्ढीका बाल -' (बालगीत )
लाल लाल लाल लाल
घेऊन आलो बुढ्ढीका बाल ..
या बाळानो आजोबा या
आईला आजीला घेऊन या ..
कापसापेक्षा मऊ मऊ
किती लुसलुशीत हा खाऊ ..
सशासारखा दिसे लोभस
खाल तर तोंडात पाणी फस्स ..
ओठ लाल गाल लाल
तोंडामधली जीभ लाल ..
जिभेवर आहे क्षणात गडप
पुन्हा घालाल खाऊवर झडप ..
ताई माई लौकर या
संपत आला खाऊ घ्या ..
लाल लाल लाल लाल
बुढ्ढीका बाल खा करा धमाल . .
.
" चिऊ चिऊ चिडकी - "
नाटक काय ? हम्म्म... (बालगीत)
मुसूमुसू मुसूमुसू रडतंय कोण ?
हातांमागे दडतंय कोण
दोन बोंटाचा झाला कोन
गुपचुप बघतात डोळे दोन
कुठुनी आला राज कुमार
बोटां वरती होऊन स्वार
दुडुदुडु दुडुदुडु पळू लागता
खुदकन झाले रडू पसार
गुदुगुदु गुदुगुदु गुदगुल्या
खुदूखुदू खुदूखुदू खुदखुदल्या
नाटSSSक काय ? हम्म्म...
-सत्यजित.
एक मुलगा बारका
पडू द्या सरिवर सरी
पडू द्या सरिवर सरी
(चालीसाठी शिर्षकावर क्लिक करा.)
वीज कन्यका तळपत पाहुनी,
मेघ गर्जना करी ।
पडू द्या सरिवर सरी हो सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥धृ॥
आकाशाशी नाते जोडी धरतीशी हो सरी,
पर्जन्याच्या सरी ।
पर्जन्याचे तांडव मांडी कृष्णमेघ अंबरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥१॥
घेऊनी तांडा मेघांचा हो आला शिरावरी,
भरुनी पाण्याच्या घागरी
सह्याद्रीचा कृष्ण अडवितो, धो धो पडती सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥२॥