चिऊताईचं घर होतं......
दर पावसाळ्यात पाऊस पाहुणा बनून गॅलरीत अवतरतो. झाडांच्या कुंड्यांना अंघोळी घालून अनेकदा गॅलरीतून हॉलमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. कुंड्यांमधील मातीबरोबर युती करून तो गॅलरीत यथेच्छ चिखलफेक करून मोकळा होतो. मग, चिकचिक… चिडचिड…! हे टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी गॅलरीला बारदाण लावून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, पाऊस नसला की मग हवाही आत यायला नाक मुरडायची. परस्पर बारदाण्याला शिवून निघून जायची. मग, ठरलं असं की बारदाण्याचा थेटरातील पडद्यासारखा वापर करायचा. पाऊस आला की पडदा खाली पाडायचा, इतर वेळी तो गुंडाळी करून वरच्या बाजूला बांधून ठेवायचा. गेल्या दीडेक महिन्यापासून हे सुरू होतं.