Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47
सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)
हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.
चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक्च्युअली भीती वाटवणे हा
एक्च्युअली भीती वाटवणे हा प्रकार ते लोक प्रामुख्याने साऊंड आणि लाईट या माद्यमातून साधताना दिसतात. प्रत्यक्ष कथानकात भीती वाटण्यासारख्या गोष्टी कमीच मिळतात.
रामसे वगैरेंच्या चित्रपटातही एखाद्या हवेलीत गाडले गेलेले प्रेत वगैरेच असायचे.
भीती आणि रहस्य, खुनी कौन...?,
भीती आणि रहस्य, खुनी कौन...?, भूत भविष्य स्वप्न बघायची दैवी देणगी वगैरे मालमसाला असलेल्या षिणेमांसाठी हा धागा आहे. उद्या भुक्कडवर षिणेमा निघाला तर तोही इथेच येईल.
मला भीती वाटलेले ( त्या त्या
मला भीती वाटलेले ( त्या त्या वयात)/ आवडलेले
वह कौन थी
गुमनाम
पोल्टरगाईस्ट १,२
फ्रायडे द १३थ
ओमेन १,२,३
एक्सॉरसीस्ट
सिक्स्थ सेंन्स
रात
डरना मना है
ड्र्याकुला
फ्लाय
स्क्रीम १,२
अजुन आठवेल तसे लिहीन.
मंगळसुत्र ( रेखा, अनंत
मंगळसुत्र ( रेखा, अनंत नाग)
गहराई ( अनंत नाग, पद्मिनी कोल्हापुरे)-- फार भीती दायक. (अरुणा विकास चे डायरेक्शन)
जानी दुश्मन ( एकदम हस्यास्पद भुत)
बाकी सगळे रामसे बंधु फेम.
तसाच वेगळा देवराई होता. त्यात वेगळीच कल्पना होती.
सायको, हीचकॉक चे बरेचसे जसा
सायको, हीचकॉक चे बरेचसे जसा वर्टीगो इ.इ.
सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर,
सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च<<<
असा सिनेमा म्हटलातर मला इंग्रजी ' Dead head ' हा सिनेमा आवडलेला. या सिनेमात वर लिहलेले सर्व काही आहे.
मी टी वी वर नाटक पाहिले
मी टी वी वर नाटक पाहिले होते.. कथा कुणाची व्यथा कुणाला.. त्यात एका माणसाला लिफाफा जिभेने ओला करुन चिकटवायची सवय असते... त्याचा खून करण्यासाठी सायनाइड लावलेला लिफाफा त्याला देतात. पण कुणीतरी दुसर्च माणुस तो लिफाफा चाटत आणि मरतं. कसं सुचतं लोकाना हे??
जामोप्या अशीच एक घटना सोनीवर
जामोप्या अशीच एक घटना सोनीवर लागणार्या 'CID' या मालिकेत दाखवली होती. इथे लिफाफ्या ऐवजी पुस्तक असते. आणि त्या मरणार्या माणसाला बोटाला थुंकी लावून पाने उलटायची सवय असते.
ती परकीय कल्पना आहे. अगाथा
ती परकीय कल्पना आहे. अगाथा ख्रिस्ती का कोण ते आठवत नाहीये पण वाचलीये मी ती मूळ कथा.
जगातलं कोणतही रहस्य ख्रिस्ती
जगातलं कोणतही रहस्य ख्रिस्ती बाईच्या पुस्तकात कुठेतरी असतेच.
जामोप्या ,हल्ली भुताटकीप्रेम
जामोप्या ,हल्ली भुताटकीप्रेम जोरात उफाळते आहे तुमचे, भुताचा अनुभव घेतला कि काय?:-P
मोअर ऑर लेस
मोअर ऑर लेस
जे जे भेटिजे भूत ते ते मानिजे
जे जे भेटिजे भूत ते ते मानिजे भगवंत
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भुमंडळी, भेटतू भुता !
हॉरर ,थ्रिलर ,भूत चित्रपटांचा
हॉरर ,थ्रिलर ,भूत चित्रपटांचा जगभर वापरला जाणारा फॉर्म्युला असा असतो....
तरुणांचे टोळके असते ते फिरायला(पिकनिक गटग ई ई?) जाते. प्रत्येक बाब्याबरुबर त्याची बाय असते, एखादाच एकटा दुकटा प्राणि असतो, एखादा टग्या प्रणयराधनासाठी मैत्रीणिबरोबर टोळी सोडून लांब जातो. तिथे कायतरी 'झोल' होतो. मग सगळे तिथे जातात आणि एकेक करत गायब होतात....
मेलेलं मांजर.... ,
गरम चुंबनदृश्य(याचीच सगळे वाट बघत असतात)....
संपला कि राव षिणुमा.
मोहनराव..... तुम्ही
मोहनराव.....
तुम्ही सुचविलेल्या गटातील एक जबरदस्त चित्रपट म्हणजे...."ब्लड सिम्पल". शीर्षकातील रक्तावरून हा भुताटकीचा किंवा स्मशान पिशाच्च-हडळींचा वाटू शकेल; पण तसे नसून केवळ चार पात्रांभोवती गुंफलेली 'फॅमिली' कहाणी, जी एकमेकाच्या संशयावरून रक्तरंजीत कशी होत जाते हे सव्वातासाच्या या चित्रपटात अशी काही उलगडत जाते की पाहाणारा हतबुद्ध होऊन जातो.
१९८४ सालचा हा चित्रपट एथेन आणि जोएल कोएन या बंधूनी आपल्या पहिला प्रयत्न म्हणून दिग्दर्शित केला होता. दोघांनीही अजून पंचविशी ओलांडली नव्हती. आज ही जोडी एक प्रथितयश दिग्दर्शक म्हणून ओळखली जाते. त्यांच्या 'नो कंट्री फॉर ओल्ड मेन' ला २००७ ची "सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, पटकथा आणि सहाय्यक अभिनेता' अशी चार महत्वाची "ऑस्कर्स" मिळाली होती; पण या चित्रपटाच्या यशाचे रहस्य आहे ते त्यांच्या २८ वर्षापूर्वीच्या 'ब्लड सिम्पल' मध्ये.
मात्र चित्रपटाच्या थरारपणाची अनुभती सर्वार्थाने घ्यायची असेल तर मध्यरात्रीच पाहिला पाहिजे....अन् तोही मोबाईल बंद करून.
अशोक पाटील
मला आवडलेले सस्पेन्स
मला आवडलेले सस्पेन्स सिनेमे
गुमनाम - based on Agatha Christie's "Ten little indians"
धुन्द - Based on Agatha Christie's " Unexpected guest"
खोज
खामोश
शिकार
बीस साल बाद (जुना) - based on 'Hound of Baskervilles'
कोहरा - based on Du Maurier's 'Rebecca'
यकीन - हा 'लव्ह बर्ड्स' या मराठी नाटकावर आधारित होता
तीसरी मंझिल, जुवेल थीप
तीसरी मंझिल, जुवेल थीप
"ब्लड सिम्पल">> +१.
"ब्लड सिम्पल">> +१. जबरदस्त.
paranormal activity 1 नि ओमेन १ सुद्धा अचूक जमलेले रसायन आहे. ओमेन १ मधे शेवटचे द्रुष्य कळस आहे.
बीस साल बाद, कोहरा, गुमनाम हे
बीस साल बाद, कोहरा, गुमनाम हे माझेही फेव्हरेट्स. महल आवडला नाही. पूनम की रात सुध्दा टुकार वाटला.
इंग्लीशमध्ये हमखास टरकवणारा म्हणजे एक्सॉरसीस्ट. हा पूर्ण पहायची अजूनही हिंमत नाही. श्यामलनचे सिक्स्थ सेन्स आणि साईन्ससुध्दा आवडतात. चांगले वाटलेले आणि आत्ता आठवताहेत असे - मिरर्स, द मिस्ट.
हॉरर फिल्मः जीपर्स किपर्स.
हॉरर फिल्मः जीपर्स किपर्स. एकुण तीन आहेत परंतु पहिला चाबुक! खटिया खडि व्हायची गॅरंटी!
इथे रिव्ह्यु वाचा: http://www.imdb.com/title/tt0263488/
जामोप्या, खिचडी झाली. या
जामोप्या, खिचडी झाली.
या प्रत्येक कॅटगरीची वेगळी यादी पाहिजे.
दिनेशदा आणि अशोकदा आले.. आता
दिनेशदा आणि अशोकदा आले.. आता धागा व्यवस्थित बांधला जाईल!!
द ब्रिड - कुत्रे भिववतात.. हल्ली बर्याचदा चॅनेल्सवर चालू असतो.
राँग टर्नचा एखादा भाग जरी बघितला तरी बाकीचे पहाण्याची आवश्यकता नाही. सेम थिम. बघू नये अशी काही हिडीस दृश्ये.
चकवा... अनुमोदन. पूर्वार्धात खिळवतो. माझ्या लक्षात राहिलीये ती एका दृश्यात कोकणातील किर्र रात्री लांबवरुन ऐकू येणारी आरती..
खरं तर मराठी साहित्यात वाचतांनाही दातखीळ बसेल अशा ताकदीच्या कथा आहेत पण चित्रपटाच्या उत्तरार्धात ताकदीने खिळवून ठेवेल असा मराठी पूर्ण भयपट अद्याप आलेला नाही.
@ हेम ~ थॅन्क्स फॉर द
@ हेम ~
थॅन्क्स फॉर द कॉमेन्ट.
रॉन्ग टर्नच काय पण त्या गठ्ठयातील हरेक मालिका उत्तरोत्तर हिडिस होत गेल्याचाच दाखला आहे. त्यात सर्वात मोठा बिल्ला द्यायचा असेल तर तो 'सॉ' ला द्यावा लागेल. पहिल्या भागातील कथेची नाविन्यता दुसर्या भागात ओसरली आणि पुढे तर तो सारा प्रकार सहनशीलतेच्या पल्याड गेला. तसेच 'फायनल डेस्टिनेशन'. पाच भाग झाले पण आता पहिल्या पंधरा मिनिटातच समजते सार्यांची कशी वाट लागणार.
मराठी साहित्यात तुम्ही म्हणता तशा कथा जरूर आहेत. उदा. रत्नाकर मतकरींची 'जेवणावळ'. पण निर्मात्याला अडीच तासाच्या चित्रपटासाठी तितकी ताकदीची पटकथा बांधून देणारा तितकाच समर्थ लेखक मिळत नाही [ही खंत मराठीतील दोन दिग्दर्शक यशवंत भालकर आणि अमोल पालेकर यानी येथील एका व्याख्यानमालेत व्यक्त केली होती. धंद्यासाठीही गाण्याच्या नाचाच्या वगैरे तडजोडी कराव्या लागतात. आता 'जेवणावळी'त डान्स कसा आणायचा ?
इंग्रजी चित्रपटांमध्ये कथानक कितीही अल्पकाळ घटनांचे असले तरी त्याची वेगवान हाताळणी प्रेक्षकाला खिळवून टाकते. उदा. 'फोनबूथ'....किती छोटा जीव आहे या कथेचा ! पण एखादा फोनबूथ हा चित्रपटाचा किती जिवंत विषय होऊ शकतो हे चित्रपट पाहाताना उमगतेच. आता येऊ घातलेला 'ए.टी.एम.' हा चित्रपटही याच पठडीतील. दोन तरूण एक्झेक्युटीव्ह आणि त्यांची एक मैत्रिण तिघे रात्री १.०० वाजता पार्टीहून घरी परतताना हाय वे वरील एका एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी थांबतात....आणि पुढे ? चित्रपट एटीएमच्या बूथमध्ये सुरू होतो आणि संपतोही तिथेच. एका ओळीची कथा, पण त्यावर तितकाच जबरदस्त क्षमतेचा सस्पेन्स चित्रपट निघू शकतो. हे हॉलिवूडमध्येच होते.
@ दिनेशदा ~ तुमच्या मताशी सहमत. मलाही एकाच विषयामध्ये इतक्या चित्रविचित्र उपविभागाची गर्दी वाटलीच होती. एकच कॅटेगरी घेऊनही हा विषय खुलविता आला असता. पण मोहनरावांना ते मी थेट सांगू शकलो नाही, हेही खरेच.
असो, पण हे सगळे विषय एकत्र
असो, पण हे सगळे विषय एकत्र असले तरी चालेल.. तसेही दरवर्षी दर्जेदार म्हणावे असे मोजकेच सिनेमे या कॅटॅगरीत असतात.... जुन्या रहस्य्मय चित्रपटांची नावे, लिंक मिळाल्यास बरे होईल.
मराठीतही रहस्यकथा पूर्वी चांगल्या होत्या की.. नूतन डॉ लागू यांचा पारध टी वी वर पाहिला तेंव्हा आवडला होता.
जुन्या हिंदी पैकी '३६ घंटे' तुम्ही उल्लेख केलेल्या ए टी एम पठडीतलाच होता.
दिनेशदा, तुम्ही विषय स्प्लिट करुन इथे किंवा नवीन लेख लिहिलेत तरी आवडेल.
जे चित्रपट पाहून बरेच दिवस
जे चित्रपट पाहून बरेच दिवस झोप लागली नाही असे -
१. हा खेळ सावल्यांचा
२. Omen
३. Exorcist
4. Rear Window
5. Birds
6. Carrie
7. Slince of the Lambs
मला चकवा पाहून भिती
मला चकवा पाहून भिती वाटलेली.
देवराई भितीपेक्षा दया वाटलेली अतुल कडे पाहून. ते स्क्रिझोचे लक्षणं पाहून.
भिती वाटलेले ईंग्रजी मूवी
what lies beneath( हिंदीतील रीमेक पहिला 'राज' बिप्स व तिचा कोण तो पहिला बीफ तो)
silence of the lamb
आणखी बरेच काही ईग्लिश मोवीज आहेत. ईग्रंजी मूवीत खरे तर भिती पेक्षा स्क्रॅपीनेस/ग्रोस ज्यास्त असतो...
मला संजय दत्त, सुनिल शेट्टी
मला संजय दत्त, सुनिल शेट्टी यांचा रुद्राक्ष सुद्धा आवडला होता.
अशोकदा, तो प्रतिसाद लिहीतांना
अशोकदा, तो प्रतिसाद लिहीतांना माझ्या डोळ्यासमोर 'जेवणावळ' च होती.
आयला, पुराना मंदिर कोणालाच
आयला, पुराना मंदिर कोणालाच नाय आवडला? मी एकटाच की काय?
तूनळीदुवा
-गा.पै.
Pages