कादंबरी

समुद्र किनारा - भाग २

Submitted by नंदिनी on 5 October, 2013 - 04:36

कर्कश वाजणार्‍या फोनमुळे साराला जाग आली. बेडवर उठून तिने उशी खालचा मोबाईल शोधला, पण मोबाईल तिथे नव्हता, कसेबसे डोळे चोळत ती बेडवरून उठली, आणि वाजणारा मोबाईल नक्की कुठे वाजतोय ते बघायला लागली. मोबाईल नेहमीप्रमाणे किचनमधे मायक्रोवेव्हवर होता. झोपेतच तिने फोन घेतला “हॅलो” ती म्हणाली.

पलिकडे नक्की कोण होतं हे माहित नाही, पण धनु, बॉलीवूड, न्युजपेपर असले शब्द ऐकून हा रॉंग नंबर नाही, इतकं तिच्या लक्षात आलं. पलिकडचा माणूस जाम वैतागलेला होता, तमिळमधून काय बडबडत होता, ते मात्र तिला अजिबात समजलं नाही.

समुद्रकिनारा

Submitted by नंदिनी on 4 September, 2013 - 10:19

समुद्र विशाल असतो, अमर्याद असतो, अथांग असतो.
पण प्रत्येक समुद्राला एक किनारा असतो...
आणि तो किनारा त्या समुद्राला थोपवून धरतो. हा किनारा त्या समुद्राची सीमा असतो.
किनार्‍याकडे स्वत:ची काहीच शक्ती नसते. बघायला गेलं तर जमिनीचा एक तुकडा...
पण समुद्राला थांबवायची कला मात्र त्या किनार्‍यामधे असते.
किनारा.... त्या समुद्रासाठी विश्रांतीचं शेवटचं ठिकाण.
किनारा.... त्या समुद्राची अखेर.
किनारा.... त्या समुद्राची सुरूवात....
घणाघाती येणार्‍या लाटांशी सतत युद्ध खेळत किनारा तिथेच असतो, अविचल, अविरत.

ऑफिस (१)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

देशपांडे बाई मतिमंद आहे. म्हणजे तशी कधीकधी हुशारही आहे, पण अशी हुशार असताना देखील मतिमंदच दिसणारी आहे. इन्क्रीमेंट घेताना, नाकारताना देखील मतिमंदच दिसणारी आहे. रवी म्हणतो ही ड्युप्लिकेट मतिमंदता आहे.

रवी पेट्रोलपंप आहे. शिवाय लावालाव्या करणारा आहे. शिवाय साळसूद आहे. शिवाय सतत काहीतरी मदत करू का- असं झाडून सार्‍यांना विचारणारा आहे. त्याचा आणि एकंदरच सार्‍यांचा साहेब, म्हणाजे कुलकर्णी मास्तर अत्यंत चक्रम पद्धतीचा हुशार आहे, आणि रवीला त्याचं - तू प्लीज फक्त मला मदत कर. इकडे तिकडे उगाच मदत करत तडफडू नकोस - हे रोजचं पालुपद सार्‍यांचं पाठ झालं आहे.

प्रकार: 

'टारफुला' - शंकर पाटील

Submitted by साजिरा on 17 April, 2012 - 08:06

'लिंब इजंला धार्जिणा असतो' या वाक्याने एकेकाळी मनावर गारूड केलेलं. साहित्य आणि साहित्यप्रकारांतलं फारसं काही कळत नसण्याच्या काळात अभ्यासाच्या पुस्तकांत कथा कादंबर्‍यांची पुस्तकं ठेऊन गुपचूप वाचायचो, शिवाय आधीच्या इयत्तेत असताना थेट बारावीपर्यंतची मराठीची पुस्तकं आसुसल्यागत वाचायचो, तेव्हा. पुढे हे वाक्य 'संदर्भासहित स्पष्टीकरण द्या'मध्ये प्रश्नस्वरूपात आलं तेव्हाही परीक्षकांना कंटाळा येईस्तोवर त्यावर लिहिलं जायचं. आता अभ्यासक्रम संपला, आणि परीक्षाही. पण शंकर पाटलांच्या लक्षात राहून गेलेल्या अनेक वाक्या-वाक्प्रचारा-शब्दप्रयोगांसारखंच हे चार शब्दांचं वाक्य जे मनात कोरलं गेलं, ते कायमचं.

विषय: 

निराळा योगी चे प्रकाशन...

Submitted by अ. अ. जोशी on 16 December, 2011 - 12:02

दिनांक 4 डिसेंबर 2011 रोजी भरत नाट्य मंदिरात सुचेतानंत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या, ग्रामीण जीवन शास्त्रज्ञ कै. आप्पासाहेब उर्फ एस.आर. भागवत यांच्या जीवनावर आधारीत 'निराळा योगी...' या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, आणि स्थानिक स्वराज्य संस्था पुणे चे संचालक श्री. एस.जी. चव्हाण यांच्या हस्ते झाले. गुंजवणे येथील श्री. गुलाबराव रसाळ, सरपंच श्री. लिम्हण आणि भागवतांबरोबर काम केलेले श्री.

गुलमोहर: 

रसग्रहण स्पर्धा - 'बिंदूसरोवर' : ले. राजेन्द्र खेर

Submitted by अवल on 20 August, 2011 - 02:01

' बिंदूसरोवर' - ले. राजेन्द्र खेर
विहंग प्रकाशन : डिसेंबर २००८
मूल्य १६०/- रु. पृष्ठसंख्या - २०८
bindusarovar_0.jpg
मुखपृष्ठ बघून मी एकदम थांबलेच दुकानात. खजिन्याची पेटी, अक्राळ-विक्राळ राक्षसांचे चेहरे, हवेत उडणारी भूतं, गूढरम्य वातावरण, ढगात चमकणारी वीज, एक तेज:पुंज चेहरा; सगळं सगळं मला माझ्या बालपणात घेऊन गेलं. आणि आपसुक हात पुढे झाले 'बिंदूसरोवरा'ला घ्यायला !

विषय: 

तो -भाग १

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 22 May, 2011 - 14:48

तो नेहमी रात्रीच लिहायला बसायचा. लिहीताना अडलंच कुठे तर मग पहात बसायचा खिडकीतून समोरच्या लॅंपपोस्टाकडे. मग त्या लॅंपपोस्टाचा पिवळा आणि त्याच्या टेबललॅंपमधल्या सीएफेलचा पांढरा मिळून एक फिकट पिवळा जो रंग त्याच्या टेबलवर खेळत असे त्यावर तो परत एकदा लिहू लागे विनासायास.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी