कादंबरी
शृंगार ९
कुणाला बस लागते , कुणाला गाडी लागते पण कोकणात कुणाला बोट लागत असेल अस वाटल नव्हत . असो असेल कोणीतरी माझ्यासारखा बाहेरचा . बाकी कोकणातून परतताना या अथांग सागरातून प्रवास करण्याची कवी कल्पना दूर होऊन मला वास्तवात आणण्याच काम केल होत त्या बोट लागलेल्याने . बाकी पुर्वी लोक घोड्यावरून प्रवास करायचे त्यांच काय ? त्यांनाही .... असो.
शृंगार ८
सकाळी बराच उशीरपर्यंत झोपलो होतो . जाग आली आणि पाहिल तर मंजू अजूनही झोपली होती . ती इतका वेळ कधी झोपत नाही म्हणून पाहिले तर तिने डोळे उघडले आणि तिला बराच त्रास असल्याच जाणवल . ऑफिसला सुट्टी असल्यामुळे फार घाई नव्हती पण तिचा त्रास जरा जास्त वाटला त्यामुळे नुसता आराम न करता डॉक्टरांकडे जाण्याबद्दल तिला सुचवल . ती सुरूवातीला नाही म्हणाली पण तिला जास्त त्रास होत असावा ज्यामुळे ती तयार झाली डॉक्टरांकडे यायला .डॉक्टरांकडे पोहोचल्यावर पटकन नंबर मिळाला .
मना तुझे मनोगत - ३
आधीच्या भागानंतर बरीच गॅप आल्यामुळे आधीच्या भागांची लिंक देतो आहे.
मना तुझे मनोगत - १ - http://www.maayboli.com/node/54052
मना तुझे मनोगत - २ - http://www.maayboli.com/node/54066
*************************************************************************************************************
"हॅलो..."
"तू फोन करणार होतास ना?"
"हो.. म्हणजे, योगेशला विचारतो. त्याला माहिती असेल कदाचित." राहुलनी फोन योगेशला दिला.
"हॅलो...., मी योगेश बोलतोय.."
"सॉरी, फोनवर राहुल आहे कळालच नाही मला!"
"हो..."
"तुझ्या घरी फोन केला होता तेव्हा तू राहुलकडे आहेस असं सांगितल तुझ्या आईनी.."
कथा (भाग ४)
"अहो सर कशाला विषाची परीक्षा घ्यायला निघाला आहात तुम्ही ? आणि बाकी फक्त तुम्ही तुमच्यापुरता निर्णय घेत असता तर माझा काही अधिकारही नव्हता तुम्हाला विरोध करायचा पण तुम्ही इतक्या मुलांना सोबत घेऊन जायचं म्हणत आहात मी कशी परवानगी देऊ ? आणि ज्यांना घेऊन जाणार आहात त्या मुलांच्या पालकांची परवानगी नको का ? आणि एकदा का त्यांना समजलं की मुलांना कुठे घेऊन जायचं म्हणत आहात तर शाळेवरची कौलच काय पण आपल्या डोक्यावरचे केसही शिल्लक राहणार नाहीत . "
" ते का सर ? "
" अहो इतके जोडे पडल्यानंतर केस राहतील का ? "
" ते नाही सर मी म्हणतोय ते लोक अस का करतील ? "
कथा (भाग ३)
आज अमावस्या सुर्य मावळताच जंगलाने एकदम भेसूर रूप धारण केलं होतं . एक वेगळाच अपशकुन असल्यासारख वातावरण झालं होतं . त्या तशा वातावरणात एक आकृती हळूहळू निघाली होती . वारा वाहायचा थांबला होता आणि ती भयाण शांतता काळजाचा थरकाप उडवत होती .
====================================
"काय मग मॅडम काय मग कशी झाली म्हैशीची सवारी ? फार मजा आली असेल ना ." - सुरभि
"मग काय फार मजा आली . अशी सवारी कधी केली नाही ." - निशा
"ए चल ना मग आपण पण जाऊया मलाही करायची आहे अशी सवारी ."
छे काय पण इच्छा म्हणे म्हैशीवर बसायचं आहे .
" कुठे जायचं ? "
शृंगार ७
आज पार्टी चांगली झाली आणि चांगल्या नियोजनामुळे तशी लवकर आवरली . १०.३० वाजत होते . मंजूला फोन करून येत असाल्याबद्दल सांगितल . शक्य तितक्या लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न होता . बरीच गडबड करुनही ११.३० वाजले घरी पोहोचायला . बेल वाजवली आणि दार उघडण्याची वाट पाहू लागलो . मंजूने अर्धवट झोपेत दार उघडल .
" अग हे काय आज अजून साडीवरच , गाऊन नाही ? "
" ते जरा मघाशी खाली जाऊन आले आणि मग आल्यावर थोडा वेळ बसले त्यात कधी डोळा लागला कळलच नाही . "
" ए पण मस्त दिसते आहेस अशी . "
" काय मस्त दिसते आहे , केस विस्कटलेले , साडीही कशी झाली आहे . "
" ए काय करते आहेस ? "
शृंगार ६
रूटिन लाईफ सुरू होत मधुन अधुन बायकोला डॉक्टरांकडे जाण्यासाठी गळ घालत होतो . पण ती काही यायला तयार होत नव्हती आणि आमच ब्रम्हचर्य पालन सुरू होत . नविन अस काही घडत नव्हत .
पण त्या दिवशी ऑफिसमध्ये थोडी नविन चर्चा सुरू होती . दळवी काका रिटायर होणार होते पुढच्या आठवड्यात त्यामुळे त्याबद्दल चर्चा सुरू होती . बाकी आमच्या ऑफिसचा बहुतेक स्टाफ हा जुनाच होता . सगळे कलिग जुनेजानतेच होते आणि मी जॉईन झालो तेव्हापासून फारसा बदलही नाही . त्यामुळे सर्वांना काकाच म्हणतो .
शृंगार ५
एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .
शृंगार ४
मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .
" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "
" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "
" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "