चावट

शृंगार ५

Submitted by अनाहुत on 31 August, 2015 - 07:12

एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .

शृंगार ४

Submitted by अनाहुत on 26 August, 2015 - 12:48

मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .

" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "

" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "

" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "

शृंगार ३

Submitted by अनाहुत on 24 August, 2015 - 13:13

उठतो तर रोजच पण आज उठलो ते जरा लवकरच . एवढ्या सकाळी , सॉरी पहाटे उठायच म्हणजे थोडे श्रम पडलेच . नुसत गजर लावून चालत नाही , तो वाजल्यावर जाग यायलाही हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरूणातून बाहेर याव लागत . मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो . आजपासून जिम सुरू करायची थोडी फिटणेस पाहिजे ना राव . स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो . तिला कालच सांगितल होत जिमला सोबत येण्याबद्दल . तिनेही जिम केली तर लवकर फरक पडणार होता , म्हणून हा सगळा खटाटोप .तिला आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला . ती अशी काही वसकन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो .

शृंगार २

Submitted by अनाहुत on 22 August, 2015 - 03:03

आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत . पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा . एवढी माणस वाढली तेवढया लोकल नाही वाढल्या .

शृंगार १

Submitted by अनाहुत on 21 August, 2015 - 05:49

उरोज नितंब आणि तसलेच काही शब्द असलेल पुस्तक होत ते . शेजारी बसलेला मुलगा ते वाचत बसला होता . छे नुसत अस काही वाचुनही लोक एक्साईट होतात . नाही म्हणजे आपण एक्साईट व्हायला हव कि नको . काही हरकत नाही , पण आता आपले दिवस कर्तृत्व दाखवण्याचे , कृती वाचत बसण्याचे नाहीत . पण काय हरकत आहे अस वाचून स्फुरण चढणार असेल तर . हं किती दिवस झाले बायकोशी नीट बोलणही झाल नाही .

Subscribe to RSS - चावट