एवढ्यासाठीच तुझे मी गंठण नाही
की तुझा आहे पण कुठले आंदण नाही
चार कोसांवरती आहे घरटे अपुले
एवढेही जवळ आपल्या आपण नाही
वेगळी झालीस कशाला कळले नाही
हे खरे की, प्रगतीला मी कारण नाही
सोडले, धरलेस कधी, मी निघून गेलो
खेळण्यासाठी मी कुठली गोफण नाही
तू कुणाला वगळावे हा तुझाच निर्णय
ए! तुझ्या यादीत कुठेही मीपण नाही
मी कशाला दरवाज्यावर गुंतुन राहू
मी तुझा गुरखा नाही की तोरण नाही
दिनांक 4 डिसेंबर 2011 रोजी भरत नाट्य मंदिरात सुचेतानंत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या, ग्रामीण जीवन शास्त्रज्ञ कै. आप्पासाहेब उर्फ एस.आर. भागवत यांच्या जीवनावर आधारीत 'निराळा योगी...' या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, आणि स्थानिक स्वराज्य संस्था पुणे चे संचालक श्री. एस.जी. चव्हाण यांच्या हस्ते झाले. गुंजवणे येथील श्री. गुलाबराव रसाळ, सरपंच श्री. लिम्हण आणि भागवतांबरोबर काम केलेले श्री.