एवढ्यासाठीच...

Submitted by अ. अ. जोशी on 14 January, 2012 - 21:29

एवढ्यासाठीच तुझे मी गंठण नाही
की तुझा आहे पण कुठले आंदण नाही

चार कोसांवरती आहे घरटे अपुले
एवढेही जवळ आपल्या आपण नाही

वेगळी झालीस कशाला कळले नाही
हे खरे की, प्रगतीला मी कारण नाही

सोडले, धरलेस कधी, मी निघून गेलो
खेळण्यासाठी मी कुठली गोफण नाही

तू कुणाला वगळावे हा तुझाच निर्णय
ए! तुझ्या यादीत कुठेही मीपण नाही

मी कशाला दरवाज्यावर गुंतुन राहू
मी तुझा गुरखा नाही की तोरण नाही

गुलमोहर: 

वेगळी झालीस कशाला कळले नाही
हे खरे की, प्रगतीला मी कारण नाही... मर्मभेदक... छान आहे गझल..

उत्तम गझल! चार वेळा वाचली.

चार कोसांवरती आहे घरटे अपुले
एवढेही जवळ आपल्या आपण नाही

वेगळी झालीस कशाला कळले नाही
हे खरे की, प्रगतीला मी कारण नाही

तू कुणाला वगळावे हा तुझाच निर्णय
ए! तुझ्या यादीत कुठेही मीपण नाही

>>

हे तीन त्यातील सर्वोकृष्ट वाटले

अभिनंदन

-'बेफिकीर'!

(२३ मात्रांच्या ओळी आहेत. हे एक नावीन्य वाटले. )

चार कोसांवरती आहे घरटे अपुले
एवढेही जवळ आपल्या आपण नाही

तू कुणाला वगळावे हा तुझाच निर्णय
ए! तुझ्या यादीत कुठेही मीपण नाही >>> फार आवडले... मस्तच