विष्टंभी आरंभ करोनी अवष्टंभ गाठावे
सूर्योदयबिंदू वाटेतील अलगद खुडून घ्यावे
त्या बिंदूंची रेष केशरी लवलवती बनवावी
गगनछताच्या चांदणनक्षीवरुनी हळू फिरवावी
स्पर्शाने अलवार विस्कटून अवघी चांदणनक्षी
विरून जाईल-त्या विरण्याला एक दिवाणा साक्षी
उरेल- तो सूर्यास्तबिंदूना पश्चिम क्षितिजी खुडण्या
आजही जाईल, गळ्यात माळून लखलखत्या चांदण्या
अपार उधळित तेजशलाका आकाशातिल रत्ने
उजळून देतील मावळतीला अनाहूत स्पर्शाने
अनामिक नक्षत्रे त्यातील मावळत्या चांदण्या
तेज शिंपडित जातील क्षितिजाखाली गात विराण्या
बराखाडीतील शब्द, स्वप्नी आले असे काही ऐकतोय खूप म्हणे वाढलय 'मी' पण
आम्हाला अजून कळलच नाही
सुरक्षित चौकटीत
जगणारा माझा चेहरा
वेल फेड वेल पेड
दिसणारा माझा
तजेलदार चेहरा
मला आणि माझ्या
चौकटीतले बांधवांना
आवडतो
त्याला चौकट सुरक्षितता देते
संरक्षण देते
आणि मी शिकतो
चौकटीतले शिक्षण
करतो चौकटीतलं
लग्न ,...
पण चौकटीचा तुरुंग
मला जाणवत नाही
माझ्या कुटुंबाला
कारण मी
माझ्या कुटुंबासहित
चौकटीबाहेर
कधीच उडत नाही
स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या...
करते सगळ्या धरतीला
आपल्या प्रेमाने प्रफुल्लित
तिलाही छोटसं का होईना
प्रीतीचे रान मिळू द्या....
स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....
स्त्री गुरुकिल्ली आहे
माणसाच्या नशिबाची
जीवनात आपल्या
तिला जागा महान मिळू द्या.....
स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....
बलिदान देते क्षणोक्षणी
प्रत्येकाच्या सुखासाठी
तिलाही आनंदाची तहान मिळू द्या....
काटे वाट्यास आले, हे ना सांगावयाचे
केले जखमी फुलांनी, कोणा सांगावयाचे?
नव्हता अंधार नशिबी, हे तो खरे जरीही
मज पोळले दिव्यांनी, कोणा सांगावयाचे?
जो मार्ग चाललो तो, होता खरे सुगंधी
ते रान केतकीचे, कोणा सांगावयाचे?
सत्यात उतरली स्वप्ने, नसता ध्यानीमनी हे
उडवून झोप ती गेली, कोणा सांगावयाचे?
झाल्या असतील कविता, मागे काही बऱ्याही
मज काळजी नव्याची, कोणा सांगावयाचे?
©निखिल मोडक
सांग ग सखी
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप...
हृदय तर पहिलाच घायाळ झालं होतं
आता डोळ्यांनाही लागलंय तुझच वेड
फुकट मध्ये कसला करून बसलो मी
हा मनस्ताप......
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप.....
चोरून चोरून तुला बघणं
तुझ्या मागे मागे फिरणं
मला बघून तुझं गालातल्या गालात हसणं
तुझ्या हसण्याला बघून
माझ्या आनंदाला राहत नाही माप.....
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप.....
ओळखलंत का मला ?
हो मी तोच तुमच्या अंतरंगातला,
आनंदात नाचणारा,
अनं दुःखात बुजून बसणारा,
ओळखलंत का मला ?.....मी तुमचं मन....
वाऱ्यासारखा वाहणारा,
नदीसारखा खळखळणारा,
काकवीच्या गोडव्यासारखा,
जिभेवरती रेंगाळणारा,
ओळखलंत का मला ?.....मी तुमचं मन....
मनाच्या गाभारी, आत्मा हा विठ्ठल
आत्मपरीक्षण, तीच वारी
जे जे असे पिंडी, तेची रे ब्रह्मांडी
ओळख आत्म्याची, तीच वारी
पश्चात्ताप हेची, चंद्रभागा स्नान
सोडी काम क्रोध, तीच वारी
पावित्र्य जपावे, उणे ना वागावे
सन्मार्गे चालावे, तीच वारी
देह हा नश्वर, आत्मा हा ईश्वर
आत्म्याचे पूजन, तीच वारी
कर सर्वशक्तीनीशी प्रहार नियती
प्रतिकार करण्यास आता तयार मी
पराजीत परतशील हा शब्द माझा
लावलीस पणाला जरी सर्व माया
बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझा
गुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझा
समयचक्राच्या कैदेची तु ही कैदी
अजून किती वेळ छळशील मला
संधी मीच नेहमी देत राहिलो तुला
गैरफायदा त्याचाच तु नेहमी उचलला
पण पुरे झाले; आता पुनः संधी देणार नाही
तुझी दखल आता मी खपवून घेणार नाही
साद घालू लागले ते गाव माझे
उमटले मातीत तेथे नाव माझे
पावले रक्ताळली वाटेत केव्हा
मांडले पून्हा तरी मी डाव माझे
लगडले टप्पोर मोती जोंधळ्याला
पेरले मातीत भक्तीभाव माझे
वाहती जखमा जुन्या पून्हा नव्याने
ओळखीच्या माणसांचे घाव माझे
सांडले तू गंध तेथे त्या फुलांचे
आजही घेतात येथे ठाव माझे
© दत्तात्रय साळुंके
वृत्त मंजुघोषा -
गण:- - र त म य- राधिका, ताराप, मानावा, यमाचा
एकाच शब्दात दोन ल एकापाठोपाठ = गा
जोडाक्षरा आधी लघु = गुरू जर लघु अक्षरांवर जोडाक्षराचा आघात होत असेल