ओळखलंत का मला ?
हो मी तोच तुमच्या अंतरंगातला,
आनंदात नाचणारा,
अनं दुःखात बुजून बसणारा,
ओळखलंत का मला ?.....मी तुमचं मन....
वाऱ्यासारखा वाहणारा,
नदीसारखा खळखळणारा,
काकवीच्या गोडव्यासारखा,
जिभेवरती रेंगाळणारा,
ओळखलंत का मला ?.....मी तुमचं मन....
एकट्यात तुझ्यात तुलाच शोधणारा,
कष्टी होऊन डोळ्यातून बरसणारा,
भावनांचा गुलदस्ता मी,
कधी कोमेजलेला तर कधी,
रंगांनी बहरलेला,
ओळखलंत का मला ?.....मी तुमचं मन....
आता सगळं बदलून गेलय,
सुख शोधन कठीण झालयं,
दगदगीच जीवन तुझं,
मलाच काहीस हरवू लागलंय,
ओळखलंत का मला ?.....मी तुमचं मन....
हो आता हे बदलून जाईल,
पुसत चाललेला मी बाहेरून येईल,
आजूबाजूला नजर फिरवं,
मिळतील सारे माझ्याच सारखे,
त्यांना थोडा वेळ तर दे,
हातात तुझ्या हात घे,
माझे विचार त्यांना दे,
त्यांचे समजून मला दे,
पुसत चाललेला मी स्पष्ट होऊ लागेल,
दूर चाललेले तुझ्या जवळ येतील,
आयुष्य फक्त असाच फुलू शकत,
माझ्या असण्यानेच सगळं घडू शकत,
ओळखलंत का मला ?.....मी तुमचं मन....
ओळखलंत का मला ?.....मी तुमचं मन....
अतिसुंदर....
अतिसुंदर....
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!