कर सर्वशक्तीनीशी प्रहार नियती
प्रतिकार करण्यास आता तयार मी
पराजीत परतशील हा शब्द माझा
लावलीस पणाला जरी सर्व माया
बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझा
गुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझा
समयचक्राच्या कैदेची तु ही कैदी
अजून किती वेळ छळशील मला
संधी मीच नेहमी देत राहिलो तुला
गैरफायदा त्याचाच तु नेहमी उचलला
पण पुरे झाले; आता पुनः संधी देणार नाही
तुझी दखल आता मी खपवून घेणार नाही
रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती.
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]
*********************
दुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….