स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या...
करते सगळ्या धरतीला
आपल्या प्रेमाने प्रफुल्लित
तिलाही छोटसं का होईना
प्रीतीचे रान मिळू द्या....
स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....
स्त्री गुरुकिल्ली आहे
माणसाच्या नशिबाची
जीवनात आपल्या
तिला जागा महान मिळू द्या.....
स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....
बलिदान देते क्षणोक्षणी
प्रत्येकाच्या सुखासाठी
तिलाही आनंदाची तहान मिळू द्या....
स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....
मोठमोठ्या विकासाच्या इमारती
असू द्या तुमच्या नावावर
तिच्या हिश्यात निदान
प्रगतीचे घर लहान मिळू द्या.....
स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....
कुठे बलात्कार कुठे आत्याचार
कुठे विनयभंग तर कुठे जाच
स्त्री जन्माची त्यांना वाटते लाज
चला बदलूया ही विचारसरणी
करूया स्त्री जातीचा इतका आदर
की स्त्री जन्मावर त्यांना अभिमान मिळू द्या....
स्त्री शब्द नाही सामर्थ्य आहे
तिला योग्य सन्मान मिळू द्या....
मुस्ताक अली शायर.....
7887481053
ही गझल नाही!
ही गझल नाही!