घराच्या अगदी पुढ्यात एक वाळलेलं झाड आहे …
पानं गळून गेलेलीत सगळी … हिरवा ठीपकाही नाही ….
दाटीने असलेल्या बारीक फांद्या… वाळलेल्या ..पण
एकमेकांच्या आधाराने नेट धरून उभ्या
रोज संध्याकाळी
दुरून उडत आलेल्या …
प्रत्येक फांदीवर बसलेल्या चिमण्या दिसतात
गजबजलेल्या… जणू चीमण्यांचेच झाड
ठरलंय आमचं,
'झाडावर जागा त्यांची …त्यांच्यावर नजर माझी'
माझ्या खोलीच्या खिडकीतून रम्य दिसतो हा नजारा
पाऊस आला कि मात्र मी आवर्जून खिडकी बंद करते
मग बंद खिडकीत फडफडत येउन बसतात त्या
कप्प्यां कप्प्यात ……. निवाऱ्याला …. अगदी हक्काने
पावसापासून जपून ……. तरीही जरा जरा भिजतच
ठरलंय आमचं,
जूनच्या सुरवातीलाच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. कित्येकदा ठरवूनही जाणे जमले नव्हते. अखेर अगदी दिड दिवसांसाठी जाता आले.
पुण्यातून निघालो तेव्हा ब-यापैकी ऊन होते परंतू वाटेत हवा बदलत गेली. मधूनच लांबवर ढगांनी दर्शन द्यायला सुरुवात केली.
वाटेतल्या या देवळाने मन वेढून घेतले. चालत्या गाडीतूनच क्लिक करण्याचा मोह आवरला नाही
आपण ज्याला ब्रम्हकमळ म्हणतो, पण जे प्रत्कक्षात एक कॅक्टस आहे ते
आमच्या वाबळे मावशींच्या टेरेस मध्ये ते असे फुलले होते, मोजा बरं
अन त्यातल्या एकाचा हा क्लोज अप
नमस्कार लोकहो !
अमेरिकेतली भटकंती चालू आहे. मागच्या महिन्यात ४ जुलैला माउंट व्हिटनीला जाऊन आलो! फारा वर्षांची 'तमन्ना', 'मनिषा','इच्छा', 'आकांक्षा' इ.इ. पूर्ण झाली!
मंडळी,
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ट्रेक दरम्यान काही मजेशीर किस्से अनुभवायला मिळाले असतीलचं … जसे कि एखाद्या गावातल्या मामांनी टाकलेली सणसणीत थाप, किंवा एखाद्याचा झालेला पोपट (?), … गावातल्या मामाची जरा जास्तंच झालेली आणि त्यातून त्याने सांगितलेली उलट-सुलट माहिती … किंवा करायला गेलो एक आणि झाले भलतेच …वगैरे वगैरे …
जमल्यास असले अनुभव इथे सगळ्यांना Share करा …अशी विनंती
माझ्याकडून पहिला किस्सा :
खुटेदरा ट्रेक दरम्यान रामपूर गावातल्या तानाजी मामांनी दुर्ग किल्ल्यावर 'सिंह' सुद्धा आहेत असा ठणकावून सांगितलं होतं :
कृपया कोणाला प्लस व्हॅलीची माहिती असेल तर इथे लिहाल का?
कुठे आहे? कसे जायचे? पुण्याहून आणि मुंबईहून जायला किती वेळ लागेल?
दरीत उतरल्यावर किती चाल आहे? कितपत सोपं वा कठीण आहे?
आणि अजून जी तदनुषंगिक माहिती असेल ती...
कोणी जाऊन आला असाल तर आपले अनुभवही लिहाल का?
भर पावसात माळशेज घाटात अथवा इतर कुठेही डोंगर दर्यांच्या, निसर्गाच्या समवेत रमताना काय वाटतं त्याचं शब्दरुप.
अनंत
१)
२)
जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...