ढगांच्या राज्यात

Submitted by अवल on 4 August, 2013 - 01:56

जूनच्या सुरवातीलाच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. कित्येकदा ठरवूनही जाणे जमले नव्हते. अखेर अगदी दिड दिवसांसाठी जाता आले.
पुण्यातून निघालो तेव्हा ब-यापैकी ऊन होते परंतू वाटेत हवा बदलत गेली. मधूनच लांबवर ढगांनी दर्शन द्यायला सुरुवात केली.

IMG_5331 copy.jpg

वाटेतल्या या देवळाने मन वेढून घेतले. चालत्या गाडीतूनच क्लिक करण्याचा मोह आवरला नाही

IMG_5343 copy.jpg

अचानक एका वळणावर समोरचा छोट्याशा घाटाचा रस्ता फार सुरेख दिसला. खरे तर पावसाचे थेंब गाडिच्या काचेवर होते, तरी मोह झालाच

IMG_5353 copy.jpg

राजगुरू नगर नंतर आम्ही चुकून एका छोट्याशा वाटेला वळलो. पण चुकलो हे फार छान झाले. अतिशय सुरेख, मांडून ठेवल्या सारख्या छोट्या छोट्या गावांनी आमचे स्वागत केले. एका नंतर एक सुबक गाव, गावं कसली २०-२५ घरांच्या वस्त्या, त्यांची शेतं, गावानजीकच्या छोट्याशा नद्या, प्रत्येक गावानंतर लागणारी छोटीशी टेकडी, सारेच कसे स्वपनवत. त्या रस्तावर आम्ही इतके गुंगून गेलो की क्लिक कराचेही भान राहिले नाही. आता फार हळहळ वाटते, पुन्हा मुद्दाहून तिथून जावेच आता .
बराच लांबचा पण फार सुरेख वळसा घालू आम्ही भिमाशंकरच्या ब्लू मोरान ला पोहोचलो. अतिशय सुरेख, शांत रिसॉर्ट !
आमचे स्वागत याने केले.
IMG_5372 copy.jpg

सारे भिमाशंकर ढगांच्या दुलईत बसलेले. धुकं, नाही ढग ! अगदी ८ फुटावरचेही दिसत नव्हते. शनिवारचा पूर्ण दिवस ढगांच्या राज्यात आम्ही पार हरवून गेलो.

IMG_5374 copy.jpgIMG_5379 copy copy.jpg

अक्षरशः आमच्यापासून ५-६ फुटावरचा हा कुत्रा इतका अंधूक दिसत होता

IMG_5382 copy.jpg

हे आमचे कॉटेज

IMG_5385 copy.jpg

मग रात्रभर पाऊस मस्त कोसळला. अन सकाळी जराशी उघडिप झाली. मग काल जे फोटो काढले तेच फोटो पुन्हा काढले. दोन्हीतला फरक लक्षात येईल एव्हढा

Copy IMG_5393 copy.jpgCopy IMG_5394 copy.jpg

दुस-या दिवशी पाय निघत नव्हता पण इलाज नव्हता. निरोप घेऊन आम्ही निघालो.

copy IMG_5430 copy.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती - फोटो फारच मस्त आहेत पण .......
.....हे सगळं वर्णन खूप अपुरे वाटतंय - फोटोही फार नाहीएत - जरा हातचे राखून लिहिलेस की काय ???

खूप छान. १४वर्षापूर्वी भीमाशंकर केले होते ते आठवले, ढग आपल्यासमोर असतात, अप्रतिम अनुभव असतो.

धन्यवाद अवल, परत एकदा तुमच्यामुळे अनुभवायला मिळाले.