संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क.
खातेस कि खाऊ?:
असं आमच्या कॉलनीतल्या एक मावशी आपल्या मुलींना विचारायच्या. अर्थातच वाढलेलं जेवण संपवा हा हेतू असायचा, आणि जर का त्यांच्या मुलींनी संपवलं नाही, तर त्या हे जेवण संपवायच्या आणि .....पुढे काय होत असेल ते इथे सांगायची गरज नाही, त्या मावशी बऱ्या पैकी "खात्या-पित्या घरच्या" असत.
मी देखील " खायच्या आधी खायचं " "खाताना खायचं" आणि "खाल्यानंतर खायचं" अश्याच काही वातावरणातून आलेली आहे.
जवळचे मित्र-मैत्रिणी सोबत पण बौद्धिक-कला इत्यादी विषयांवर बोलुन झालं कि विषय कधी खाण्यावर वळतो हे कळतच नाही.
अगदी सहजतेन
जेव्हा कुणी देते फेकून
तयार सुंदर अन्न
मुले खात नाही म्हणून
वा जास्त झाले म्हणून
माझ्या अंगावर येतो शहारा
अस्वस्थ होते मन
कुपोषितांच्या झुंडी
धावतात मनातून
आक्रंदत बुभूक्षितागत
मोठमोठ्याने ओरडत
अन्न अन्न अन्न
संस्कारात जपलेली
अन्नपूर्णा अन
भेदरून उभी असते
कचराकुंडीचा काठ
घट्ट हातात धरून
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.
माझ बाळाला आता ९ महिने पुर्ण झाले, पण अजुनहि तो बसत नाहि किवा रान्गत हि नाहि. पन तो पोटावर मागे मागे सरकतो. डॉ ने सान्गितले आहे कि जर का १५-२० दिवसात त्यात प्रोग्रेस् झाला नाहि तर physiotherapy करावि लागेल. डॉ म्हणतात कि तुम्हि त्याला स्वत बसवु नका, तर आइ म्हनते कि आपन त्याला आधार देउन बसवल्याशिवाय तो कसा शिकनार?
डॉ ने सान्गितले आहे कि रोज त्याला कोवळ्या उन्हात ठेवा, पन आमच्या घरात उन येतच नाहि, तरि रोज १५-२० मि. अम्हि त्याला उन्हात घेउन जातो, आता पावसाळ्यात ते सुद्धा नाहि मिळ्नार.
तरी मुल कितव्या माहिन्यात आधारा शिवाय बसु लागतात?? याबद्दल कोनि मार्ग्दर्शन करु शकेल का?